सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू. पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more
Dnyaneshwar Babruvahan Gund अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....