NATWAR GANDHI

About Author


GANDHI WAS BORN IN MUMBAI, INDIA. HE GRADUATED FROM UNIVERSITY OF BOMBAY, ATLANTA UNIVERSITY, AND LOUISIANA STATE UNIVERSITY. HE STARTED TO WORK IN 1957.[1] HE WAS SPECIAL ASSISTANT TO JIM FLORIO. HE WAS ASSISTANT PROFESSOR OF ACCOUNTING AT THE UNIVERSITY OF PITTSBURGH. FROM 1976 UNTIL 1998, HE WAS AN ADJUNCT PROFESSOR AT AMERICAN UNIVERSITY, GEORGETOWN UNIVERSITY, AND THE UNIVERSITY OF MARYLAND.[2] HE WAS THE CHIEF FINANCIAL OFFICER, FOR THE DISTRICT OF COLUMBIA, FROM 2007 TO 2013.[3][4] IN OCTOBER 2012, SEC HAS LAUNCHED AN INQUIRY INTO AUDITS HANDLED BY THE D.C. OFFICE OF THE CHIEF FINANCIAL OFFICER, REQUESTING ALL REPORTS FROM THE OFFICES INTERNAL AFFAIRS UNIT DATING TO JANUARY 2010.[5] THE WASHINGTON POST STORY HIGHLIGHTED THAT GANDHI HAS COME UNDER INTENSE SCRUTINY IN RECENT WEEKS BECAUSE OF HIS LONG-STANDING POLICY OF KEEPING THE AUDITS OUT OF PUBLIC VIEW.[5] IN 2019, GANDHI PUBLISHED HIS AUTOBIOGRAPHY STILL THE PROMISED LAND.

नटवर गांधी यांचे जन्मगाव गुजरातेतील सावरकुंडला. मुंबई विद्यापीठातून बी.कॉम केले. १९६१ ते १९६५ पर्यंत मुंबईतील मूळजी जेठा मार्केटमध्ये मिलच्या पेढ्या आणि अन्य कंपन्यांमध्ये नोकरी. उच्च शिक्षण घेण्यासाठी १९६५ साली अमेरिकागमन. तेथे एम.बी.ए.आणि पी.एच.डी. पदव्या प्राप्त केल्यावर युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, अमेरिकन युनिव्हर्सिटी तसेच अन्य युनिव्हर्सिटींमध्ये अध्यापन. १९७५-१९९७ दरम्यान अमेरिकन काँग्रेसची वॉच डॉग एजन्सी जनरल अकाउन्टिंगच्या ऑफिसात टॅक्स पॉलिसी व अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर काम. १९९७ साली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन इथे टॅक्स कमिशनरपदी नेमणूक. त्यानंतर तेथेच चीफ फायनान्शिअल ऑफिसर पदाची २००० ते २०१४ सालापर्यंत जबाबदारी सांभाळली. अमेरिकन कर व आर्थिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल श्री. नटवर गांधी ह्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गुजरात राज्याची प्रतिष्ठा व गौरव वाढविल्याबद्दल १९९६ साली त्यांना विश्वगुर्जरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. गांधींचे कार्यक्षेत्र अर्थव्यवहार व बजेट हे असले तरी त्यांची स्वाभाविक अभिरुची म्हणजे कविता! त्यांच्या स्वरचित कवितांतून परदेशी वास्तव्य करणार्‍या भारतीयांची आपल्या जन्मभूमीप्रती असलेली प्रीती प्रकट होते. त्यासोबतच,अमेरिकेतील वास्तव्य, विविध धर्मविचार, अनेकविध राजकीय विचारप्रवाह तसेच मृत्यूची अनिवार्यता यांविषयी लिहिलेल्या कवितांमधून त्यांनी कवी या नात्याने गुजराती साहित्यात आगळ्यावेगळ्या विषयांची भर घातली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
EKA APARICHIT GANDHICHI AATMAKATHA Rating Star
Add To Cart INR 460

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more