PATRICK LYONS

About Author


"PATRICK LYONS GREW UP IN A HOUSE FULL OF CRIME; LITERALLY. ALMOST EVERY ROOM HAD A CRIME NOVEL LYING AROUND, SPREAD-EAGLED, FACE DOWN, HIS MOTHER’S WAYS OF BOOKMARKING. CHRISTIE IN THE BEDROOM, RENDELL IN THE KITCHEN AND CHANDLER IN THE LOUNGE. IT WAS ONLY A MATTER OF TIME BEFORE HE PICKED THESE BOOKS UP HIMSELF. PATRICK WROTE HIS FIRST CRIME STORY AT THE AGE OF TWELVE. A SCHOOL COMPETITION. HE GOT AN ‘A’. HE ALSO GOT A TALKING TO ABOUT THE AMOUNT OF VIOLENCE IN THE STORY. IT DID NOT MATTER THAT PATRICK DIDN’T WIN; HE WAS JUST THRILLED WITH HOW THE WRITING PROCESS SEEMED TO FLOW. HE’S BEEN ARRESTED BY CRIME WRITING EVER SINCE. WRITING ABOUT HIS EXPERIENCE AS AN ANGLO-INDIAN GROWING UP IN AUSTRALIA DURING THE 1970S AND 1980S IS A GOOD WAY FOR PATRICK TO EXPLORE BROADER CONCEPTS OF EXCLUSIVENESS, RACISM, IDENTITY AND DUALITY. THESE NOTIONS SUBTLY PEPPER HIS WORK, BRINGING GRIT TO HIS CHARACTERS. THE OFTEN-HILARIOUS CULTURAL CLASHES HE WITNESSED PROVIDE PLENTY OF SCOPE FOR HUMOUR, AND AN OPPORTUNITY TO REFLECT ON THE UNIVERSAL DESIRE TO BELONG. PATRICK LIVES IN MELBOURNE WITH HIS FAMILY AND A PET BEARDED DRAGON CALLED REX. HE IS NEVER FAR FROM A GOOD COFFEE."

"पॅट्रिक लायन्स अक्षरश: गुन्ह्यांनी भरलेल्या घरात वाढले. त्यांच्या प्रत्येक खोलीत गुन्हेगारी कादंबर्‍या पडलेल्या असत, कुठे उघडी पुस्तकं तर कुठे उघडून उपडी टाकलेली, त्यांच्या आईची त्या पानांच्या खुणा लक्षात ठेवण्याची पद्धत होती. बेडरूममध्ये ख्रिस्ती, स्वयंपाकघरात रेन्डेल आणि बाहेर शँडलर. असं असल्यावर त्यांनी स्वत: वाचायला सुरुवात केली नसती तरच नवल. पॅट्रिकने आपली पहिली गुन्हेगारी कथा ते बारा वर्षांचे असताना एका शालेय स्पर्धेत लिहिली. त्यात त्यांना ‘A’ मिळाला. पण त्यात असलेल्या अतिरेकी हिंसेवरून त्यांना बोलणीदेखील खावी लागली होती. ते जरी त्या स्पर्धेत जिंकले नाहीत तरी त्याने फारसा फरक पडला नाही; त्यांना त्या लिहिण्याच्या प्रक्रियेचीच भूल पडली होती. त्यानंतर त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीवर लिहिण्याचा नादच लागला. १९७० आणि १९८०च्या दशकात ऑस्ट्रेलियामध्ये वाढणार्‍या एका अँग्लोइंडियनचे अनुभव लिहिताना पॅट्रिकना अनन्यता, वंशवाद, व्यक्तित्व आणि अन्योन्यता या विस्तृत विचारांचा मागोवा घेता आला. ह्या कल्पनांनी त्यांच्या लेखनाला एक सूक्ष्म स्तर जोडला गेला, आणि त्यांच्या व्यक्तिरेखांना खोली प्राप्त करून दिली. त्यांनी अनुभवलेल्या आणि बर्‍याचदा गमतीशीर असलेल्या सांस्कृतिक चकमकींनी त्यांच्या लेखनाला विनोदाचा गाभा दिला आणि आपण कुठेतरी जोडलेले असण्याची जी एक वैश्विक गरज असते, त्याचा विचार करायला भाग पाडले. पॅट्रिक मेलबर्नमध्ये आपल्या कुटुंबांसमवेत आणि त्यांच्या पाळीव ‘बेअर्डेड ड्रॅगन’ रेक्सबरोबर राहतात. उत्तम कॉफीचं त्यांना वेड आहे."
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MASALA & MURDER Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more