R.K.LAXMAN

About Author

Birth Date : 24/10/1924


WELL-KNOWN VETERAN CARTOONIST RASIPURAM KRISHNASWAMY LAXMAN I.E. R. K. LAXMAN WAS BORN ON 24 OCTOBER 1924 IN MYSORE. SINCE CHILDHOOD R. K DEVELOPED A PASSION FOR CARTOONS. LATER, AFTER GRADUATING WITH A BA FROM THE UNIVERSITY OF MYSORE, HE TOOK UP HIS FIRST FULL-TIME JOB WITH FREE PRESS JOURNALS. AFTER LEAVING THE FREE PRESS JOB, HE DREW CARTOONS IN THE TIMES OF INDIA FOR HALF A CENTURY.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९२४ या दिवशी मैसूर येथे झाला. लहानपणापासूनच आर. केंच्या मनात व्यंगचित्रांची आवड निर्माण झाली. पुढे मैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी फ्री प्रेस जर्नल्समध्ये पूर्णवेळाची पहिली नोकरी पत्करली. फ्री प्रेसची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी अर्धशतकभर टाइम्स ऑफ इंडियामध्ये व्यंगचित्रे रेखाटली. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. निरीक्षणातूनच पुढे त्यांनी रेखाटलेले कॉमन मॅन हे सर्वसामान्य माणसाचे प्रातिनिधिक व्यंगचित्र बरेच गाजले. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी लिहिलेली निबंधांची आणि प्रवासवर्णनांचीही अनेक पुस्तके आहेत. आर. के. लक्ष्मण यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांत पद्मभूषण (१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९८४) आदी महत्त्वाचे पुरस्कार आहेत. मराठा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी दिली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यंग्यचित्रकाराचे, रेषांबरोबरच शब्दांवरही तितकेच प्रेम करणारे लेखक आर. के. लक्ष्मण यांचे ९४ व्या वर्षी दिनांक २६ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KASA BOLALAAT! PART 1 TO 7 Rating Star
Add To Cart INR 665

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more