RAJSHREE NAWARE

About Author


RAJSHREE NAVARE IS A CELEBRITY IN THE FIELD OF MICROWAVE COOKING. FAMOUS WRITER SHRI. RAJSHREE WAS BORN IN SHIVAJI PARK, MUMBAI, THE DAUGHTER OF ACHYUT BARVE AND MANGALA BARVE, AUTHOR OF ANNAPURNA. HE DID HIS SCHOOLING AT CANOSA CONVENT, MAHIM. HE GRADUATED FROM PODDAR COLLEGE, MATUNGA. HIS MOTHER INTRODUCED HIM TO COOKING AT A VERY YOUNG AGE.

राजश्री नवरे या मायक्रोवेव्ह कुकिंग या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहेत. प्रसिद्ध लेखक श्री. अच्युत बर्वे आणि अन्नपूर्णा च्या लेखिका मंगला बर्वे यांच्या कन्या राजश्री यांचा जन्म शिवाजी पार्क, मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कॅनोसा कॉन्व्हेंट , माहीम येथे झाले. पोद्दार कॉलेज, माटुंगा येथून त्यांनी पदवी संपादन केली. खूप लहान वयातच त्यांच्या आईने पाककलेशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी मात्र लग्नानंतरच यात रुची दाखवली. आखाती देशात बराच काळ वास्तव्य आणि इतर अनेक देशांत भ्रमंती यामुळे स्वयंपाकाची अत्याधुनिक साधने वापरून खाद्यपदार्थ बनवण्याचा त्यांना अनुभव मिळाला. हळूहळू मायक्रोवेव्ह कुकिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा छंद बनला. अनेक प्रसिद्ध शेफ्सकडून त्यांनी पाककलेचे धडे घेतले. शिवाय आई आणि सासूबार्इंकडूनही त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. २००० साली भारतात अत्यंत नवीन असलेल्या मायक्रोवेव्ह कुकिंगची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. अनेक नामांकित कंपन्यांसाठीही त्यांनी प्रात्यक्षिके केली. त्यांची सूचना देण्याची शैली आणि मायक्रोवेव्हमध्ये करता येतील अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या सोप्या कृती लोकांना इतक्या भावल्या, की दोन वर्षांच्या आतच त्यांनी पन्नासहून अधिक ठिकाणी प्रात्यक्षिके केली. भारतीय आणि परदेशी पदार्थ शिकवण्याचे वर्ग त्या चालवतात. मुंबईतील अनेक पाककृती स्पर्धांच्या परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. २००५ साली गोदरेज वं पनीच्या मायक्रोवेव्ह ओव्हन्सबरोबर दिल्या जाणाऱ्या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्याची संधी त्यांना मिळाली. नियतकालिके आणि वर्तमानपत्रांमधून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. रेडिओवरही मायक्रोवेव्ह कुकिंग या विषयावरील त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA : MICR... Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more