RAMDASI PURUSHOTTAM

About Author

Birth Date : 10/09/1955


PURUSHOTTAM RAMDASI IS A PROFESSOR OF ECONOMICS FOR 34 YEARS IN ONE OF THE INTERNATIONALLY KNOWN COLLEGES. FROM AN EARLY AGE, HE HAS BEEN OBSESSED WITH READING. GRADUALLY, AS THE SEEDS OF WRITING TOOK DEEP ROOTS IN HIS MIND. WRITING IN MOTHER TONGUE, MARATHI HAS BECOME HIS VERIFIABLE PASSION. HE STARTED WRITING PLAYS FOR ALL INDIA RADIO’S BROADCASTING SERVICES. BEING A PROFESSOR IN COLLEGE, HIS VORACIOUS READING INCREASED SUBSTANTIALLY AND THE HORIZON OF WRITING EXPANDED IN REAL SENSE. HIS STORIES AND NOVELS ON VARIOUS TOPICS ARE POPULAR IN MAGAZINES AND DIWALI SPECIAL EDITIONS. ACADEMICALLY, HE HOLDS A MASTER’S DEGREE IN ECONOMICS AS WELL AS IN SOCIAL SCIENCES AND A DIPLOMA IN HIGHER EDUCATION. HE HAS A KEEN INTEREST IN PSYCHOLOGY AND PHILOSOPHY.

पुरुषोत्तम रामदासी यांनी नेस वाडिया महाविद्यालयात जवळजवळ ३४ वर्षं अर्थशास्त्राचं अध्यापन केलं. आकाशवाणी पुणे केंद्रावरील युववाणीसाठी त्यांनी श्रुतिकालेखन केलं आणि प्रसारणातही सहभाग घेतला. आकाशवाणीवरून त्यांची मराठी आणि हिंदी नभोनाट्यं प्रसारित झाली आहेत. अंतर्नाद, हंस, किस्त्रीम, मेनका, माहेर, धनंजय, चंद्रकांत, नवल, मिळून साNयाजणी, पुरुष उवाच इ. मासिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, दीर्घकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. झरीना का क्या होगा या शॉर्ट फिल्मचे लेखन त्यांनी केले आहे. झेनोफोबिया, मामाचा झाला मामा इ. कथासंग्रह, कातळातील झरे ही कादंबरी इ. साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. दिवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित वाचकांची निवड या स्पर्धेत धनंजय दिवाळी अंकातील तांडव कथेस प्रथम पारितोषिक, एकच प्याला चहाचा या नभोनाट्यास अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक इ. पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
BAICHI GOSHTA Rating Star
Add To Cart INR 300
DESTINATION Rating Star
Add To Cart INR 210

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more