ROBERT CRAIS

About Author

Birth Date : 20/06/1953


ROBERT KRESS IS A NATIVE OF BATON ROUGE, LOUISIANA, ON THE BANKS OF THE MISSISSIPPI RIVER. ALL OF THEM EITHER WORKED IN AN OIL REFINERY OR WERE RECRUITED INTO THE POLICE DEPARTMENT. AT THE AGE OF FIFTEEN, HE BOUGHT AND READ RAYMOND SCHANDLERS BOOK THE LITTLE SISTER AND DECIDED WHAT HE WANTED TO DO FOR THE REST OF HIS LIFE.

रॉबर्ट क्रेस मूळचे मिसिसिपी नदीच्या काठावरील लुईझियाना राज्यातील बॅटन रूझचे. सर्व जण एक तर तेल शुद्धीकरण कारखान्यात काम करत, नाही तर पोलीसखात्यात भरती होत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी रेमन्ड शान्डलर यांचे द लिटल सिस्टर हे पुस्तक विकत घेऊन वाचले आणि आयुष्यभर आपल्याला काय करायचे आहे, ते ठरवून टाकले. १९८५मध्ये त्यांनी स्वत:च्या अनुभवांवरून एल्व्हिस कोल या नायकाची निर्मिती करून लिहिलेल्या द मन्कीज रेनकोट या कादंबरीला अ‍ॅन्थनी आणि मॅक्व्हीटी पुरस्कार प्राप्त झाला आणि एडगर अ‍ॅवॉर्डसाठीही नामांकन मिळाले. इन्डीपेन्डन्ट मिस्टरी बुकसेलर्स असोसिएशन च्या, शतकातल्या शंभर रहस्यमय कादंबऱ्यामध्ये या कादंबरीचा समावेश होता. एल्व्हिस कोल, जो पाईक यांच्यावर आधारित कादंबऱ्याव्यतिरिक्त त्यांनी इतरही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी टेलिव्हिजनसाठी हिल स्ट्रीट ब्ल्यूज, कॅग्ने अँड लेसी, मायामी व्हाइस या मालिका आणि क्रॉस ऑफ फायर ही चार तासांची छोटी मालिका यांचे पटकथा लेखनही केले आहे. सध्या ते सान्ता मोनिका येथे आपली पत्नी, तीन मांजरे आणि हजारो पुस्तकांच्या सहवासात राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
THE MONKEYS RAINCOAT Rating Star
Add To Cart INR 480
TBC Classic Book
THE WANTED Rating Star
Add To Cart INR 410
TBC Classic Book
THE WATCHMAN Rating Star
Add To Cart INR 300
TBC Classic Book

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more