ROBERT JAMES WALLER

About Author

Birth Date : 01/08/1939


ROBERT JAMES WALLER SPENT HIS CHILDHOOD IN A SMALL TOWN OF ONLY 900 INHABITANTS CALLED ROCKFORD IN THE STATE OF IOWA, USA. HIS FATHER HAD A SMALL FARMING BUSINESS AND HIS MOTHER WAS A HOMEMAKER. HE COMPLETED HIS EDUCATION AT UNIVERSITY OF NORTHERN IOWA AND INDIANA UNIVERSITY. HE THEN TAUGHT MANAGEMENT, ECONOMICS AND MATHEMATICS AT THE UNIVERSITY OF NORTHERN IOWA FROM 1968 TO 1991.

अमेरिकेच्या आयोवा राज्यातील रॉकफर्ड नावाच्या केवळ ९०० वस्तीच्या छोट्याशा गावात रॉबर्ट जेम्स वॉलर यांचं लहानपण गेलं. त्यांच्या वडिलांचा छोटासा शेतीउद्योग होता आणि आई गृहिणी होती. युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न आयोवा आणि इंडियाना युनिव्हर्सिटी येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पुढे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न आयोवा येथे त्यांनी व्यवस्थापनशास्त्र, अर्थशास्त्र, गणित हे विषय १९६८ ते १९९१ या काळात शिकवले. मात्र, १९७५-७६ या एक वर्षाच्या काळात त्यांनी ओहायो राज्यातील कोलंबस येथे असलेल्या बॅटेल मेमोरियल इन्स्टिट्यूट या संस्थेत काम केले. निर्णयक्षमता आणि प्रश्नांची उकल या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं असून, अनेक व्याख्यानेही दिली आहेत. अमेरिकेतील विविध सरकारी, तसंच शैक्षणिक संस्थांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केलं आहे. महाविद्यालयातील जीवनात उत्कृष्ट बास्केटबॉलपटू म्हणून नाव कमावलेल्या रॉबर्ट जेम्स वॉलर यांनी सुमारे वीस वर्षं संगीतज्ञ म्हणून काम केलं आहे. त्याचप्रमाणे आपला छायाचित्रणाचा छंद जोपासण्यासाठी त्यांनी जगभर भ्रमंती केली आहे. त्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात विपुल लेखन केलं असून द ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीच्या ६४ आवृत्त्या निघाल्या. त्याच्या एक कोटी वीस लाख प्रती छापण्यात आल्या आणि एकंदर ३६ जागतिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. न्यू यॉर्क बेस्ट सेलर लिस्ट मध्ये सतत १६४ आठवडे सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक म्हणून राहण्याचा मान या कादंबरीनं मिळवला. टेक्सास राज्याच्या पश्चिम भागात सध्या ते निवांत आयुष्य जगतात. त्यांच्या सोबत त्यांची मैत्रीण लिंडा, तसेच ४ कुत्री, २ घोडे आणि २ मांजरेसुद्धा राहतात. अजूनही ते अर्थशास्त्र व गणित या विषयाच्या अध्ययनाबरोबरच संगीत, छायाचित्रण, लेखन असे सर्व छंदही जोपासतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ADWAIT Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more