SANJEEV PARALIKAR

About Author

Birth Date : 30/11/1955
Death Date : 19/05/2015


HE HAS CONDUCTED MANY WORKSHOPS ON TOPICS LIKE BEHAVIOR STYLE, LEADERSHIP DEVELOPMENT, PERSONALITY DEVELOPMENT. MORE THAN EIGHT THOUSAND PEOPLE HAVE BENEFITED FROM HIS WORKSHOPS. TODAY, SANJEEV PARLIKAR IS THE EXECUTIVE DIRECTOR OF INNOV SOURCE SOLUTIONS.

वर्तन शैली, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास ह्यांसारख्या विषयांवर अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. आठ हजारांहून अधिक लोकांनी त्यांच्या कार्यशाळेचा फायदा घेतलेला आहे. आज संजीव परळीकर हे इनोव्ह सोर्स सोल्युशन ह्या कंपनीमध्ये एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आहेत. तत्पूर्वी नऊ वर्षे ते जीटीएल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये ट्रेनिंग विभागात, ला\नग अ‍ॅन्ड डेव्हलपमेंटचे जनरल मॅनेजर ह्या हुद्यावर कार्यरत होते. त्याआधी ते युनायटेड कार्बन ह्या कंपनीत पर्सनल मॅनेजर ह्या हुद्यावर वर्षभर काम करत होते. त्याआधी दोन वर्षे ते निकोलस पिरामल ह्या कंपनीत एम्प्लॉई रिलेशन्स मॅनेजर या हुद्यावर होते. परंतु त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात हेक्स्ट इंडिया लिमिटेड ह्या औषध निर्मितीच्या कंपनीमध्ये जनरल वर्कर ह्या पदापासून केली. कंपनीत कामगार म्हणून काम करत असतानाच त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, कॉमर्सची पदवी मिळवली आणि सात वर्षांमध्ये कामगार ह्या पदावरून ऑफिसर ह्या पदापर्यंत बढती मिळवली. त्यानंतर पर्सनल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले व पुढच्या दहा वर्षांत असिस्टंट मॅनेजर ह्या पदापर्यंत त्यांची प्रगती झाली. परंतु त्यापुढे बढती मिळणे अशक्य झाल्यामुळे सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी निकोलस पिरामल ह्या कंपनीकडे आपला मोर्चा वळवला. लेखकाकडे गेल्या तीस वर्षांतील व्यावसायिक आयुष्यातले अनेक अनुभव आहेत, तेच त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 9 of 9 total
CHAR SHABDA DYAVE-GHYAVE Rating Star
Add To Cart INR 70
CHAR ZABARDASTA FUNDE Rating Star
Add To Cart INR 80
KELYANE HOT AAHE RE Rating Star
Add To Cart INR 150
PALYA VYAKTIMATVACHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 120
PUDHAKAR GHYA : PRABHAVI VYAKTIMATVA... Rating Star
Add To Cart INR 270
26 %
OFF
SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS Rating Star
Add To Cart INR 930 INR 691
VIKRIKAUSHALYA SHIKA UTTAM VIKRETA BANA Rating Star
Add To Cart INR 70
YALA JIVAN AISE NAV Rating Star
Add To Cart INR 100
ZATPAT VYAKTIMATVAVIKAS : SWAPARIVAR... Rating Star
Add To Cart INR 70

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more