SEEMA GOSWAMI

About Author


HE IS A NOVELIST AND SENIOR JOURNALIST OF HINDUSTAN TIMES. HE IS KNOWN FOR HIS COLUMN SPECTATOR IN SUNDAY MAGAZINE BRUNCH ON TV AS WELL AS HINDUSTAN TIMES. HE STARTED HIS CAREER AS A POLITICAL JOURNALIST WITH SUNDAY, INDIAS BEST-SELLING WEEKLY.

या कादंबरीकार व हिंदुस्थान टाइम्स च्या वरिष्ठ पत्रकार आहेत. टी.व्ही.च्या तसेच हिंदुस्थान टाइम्स च्या ब्रंच या संडे मॅगॅझिनमधील त्यांच्या स्पेक्टॅटर या स्तंभलेखनामुळे सुपरिचित आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात संडे या भारतातल्या बेस्ट सेलर साप्ताहिकामधून राजकीय पत्रकार म्हणून केली. वेगवेगळ्या सार्वत्रिक निवडणुकांचे रिपोर्टिंग करताना तत्कालिक दोन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्याही मुलाखती घेतल्या होत्या. पत्रकार म्हणून काम करताना त्यांना जगभर प्रवासही करावा लागला. १९९५मध्ये ग्राफिटी या नावाने रविवारी प्रकाशित होणारी पुरवणी सुरू केली. जी त्यासारख्या प्रकाशित होणाऱ्या पुरवण्यांसाठी आदर्श ठरली. २००४पर्यंत संस्थापक संपादक म्हणून ग्राफिटी साठी त्यांनी काम केले. ही पुरवणी जीवनशैली आणि ऐषारामाच्या जीवनाविषयीची भारतातील पहिली पुरवणी ठरली. या संपादकीय कामात त्यांना असलेली फॅशन या विषयातील सर्व माहिती त्यांनी पणाला लावली आणि जगभर आपल्या लेखनकौशल्याने त्या सुप्रतिष्ठित झाल्या.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
WOMAN ON TOP Rating Star
Add To Cart INR 150

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more