SHIVAJI SAWANT

About Author

Birth Date : 31/08/1940
Death Date : 18/09/2002


AFTER COMPLETING HIS EDUCATION UP TO FYBA, SHIVAJI SAWANT COMPLETED A SHORTHAND AND TYPEWRITING COURSE IN COMMERCE. HE WORKED AS A TEACHER AT RAJARAM PRASHALA KOLHAPUR FOR TWENTY YEARS. HE WORKED IN PUNE FOR SIX YEARS IN LOK SHIKSHAN MAGAZINE OF MAHARASHTRA GOVERNMENTS EDUCATION DEPARTMENT. THROUGH DEEP STUDY OF MAHABHARATA, HE CREATED MASTERPIECES LIKE MRITYUNJAYA.

एफ.वाय.बी.ए पर्यंत शिक्षण झाल्यावर शिवाजी सावंतांनी वाणिज्य विषयाच्या लघुलिपी आणि टंकलेखन यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. राजाराम प्रशाला कोल्हापूर या ठिकाणी वीस वर्षे अध्यापनाचे कार्य त्यांनी केले. पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याच्या लोकशिक्षण मासिकामध्ये त्यांनी सहा वर्षे काम केले. महाभारताच्या सखोल अभ्यासातून त्यांनी मृत्युंजय सारखी अजरामर कलाकृती निर्माण केली. इतर अनेक पुरस्कारांसह दिल्लीतील ज्ञानपीठ संस्थेचा मूर्तिदेवी पुरस्कार या कादंबरीला मिळाला. मृत्युंजय हिंदी, गुजराथी, मल्याळम्, बंगाली, राजस्थानी, कन्नडसह इंग्रजीतही भाषांतरित झाली आहे. पुढे त्यांच्या छावा, युगंधर या पुस्तकांनीही अमाप प्रसिद्धी मिळवली. मृत्युंजय व छावा कादंबरीवर आधारित नाटकांचे लेखनही केले. १९८३ मध्ये बडोदा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काही काळ ते कार्यरत होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 12 total
ASHI MANE ASE NAMUNE Rating Star
Add To Cart INR 180
CHHAVA - NATAK Rating Star
Add To Cart INR 150
CHHAWA Rating Star
Add To Cart INR 675
KANCHANKAN Rating Star
Add To Cart INR 140
KAVADASE Rating Star
Add To Cart INR 190
MORAVALA Rating Star
Add To Cart INR 110
MRUTYUNJAY Rating Star
Add To Cart INR 460
MRUTYUNJAY - NATAK Rating Star
Add To Cart INR 140
21 %
OFF
MRUTYUNJAY,CHHAWA AND YUGANDHAR COMB... Rating Star
Add To Cart INR 1810 INR 1437
SHELKA SAJ Rating Star
Add To Cart INR 195
28 %
OFF
SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS Rating Star
Add To Cart INR 2915 INR 2108
YUGANDHAR Rating Star
Add To Cart INR 675

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more