SONALI NAVANGUL

About Author


SONALI NAWANGUL IS A WRITER, TRANSLATOR AND COMMUNICATOR. HER THREE INDEPENDENT AND SIX TRANSLATED BOOKS HAVE BEEN PUBLISHED SO FAR. SHE HAS RECEIVED SPECIAL AWARD FROM SAHITYA AKADEMI FOR TRANSLATION AND MAHARASHTRA FOUNDATION, AMERICA FOR SUSTAINED LITERARY PRODUCTION. SHE HAS BEEN THE DEPUTY EDITOR OF SPARSHGYAN, A MARATHI BRAILLE BIWEEKLY FOR THE LAST 15 YEARS. INDEPENDENT LIVING OF PERSONS WITH DISABILITIES, DISABLE’S FRIENDLY INFRASTRUCTURE, THEIR SEXUALITY ARE ALSO SUBJECTS OF HER INTEREST AND PURSUIT.

सोनाली नवांगुळ लेखक, अनुवादक व संवादक आहेत. त्यांची तीन स्वतंत्र व सहा अनुवादित पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहे. त्यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी व सातत्यपूर्ण साहित्यनिर्मितीबद्दल ‘महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका’ यांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. ‘स्पर्शज्ञान’ या मराठी ब्रेल पाक्षिकाच्या गेली 15 वर्षे त्या उपसंपादक आहेत. अपंग व्यक्तींचे स्वावलंबी जगणे, त्यासाठी मैत्रीपूर्ण पायाभूत सुविधा, त्यांची लैंगिकता हेही त्यांच्या आस्थेचे व पाठपुराव्याचे विषय आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DHARMA ANI SAMLAINGIKTA Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more