SURAJ YENGDE

About Author


SURAJ ENGDE IS THE INAUGURAL POSTDOCTORAL FELLOW AT THE SHORENSTEIN CENTER FOR ANTI-RACIST INSTITUTIONAL ACCOUNTABILITY AT THE HARVARD KENNEDY SCHOOL. HE HAS WORKED WITH MANY RENOWNED INTERNATIONAL ORGANIZATIONS IN GENEVA, LONDON, NEW YORK. HE IS THE CO-EDITOR OF CAST A GLOBAL JOURNAL OF SOCIAL EXCLUSION.

सूरज एंगडे हार्वर्ड केनेडी स्कूलमधील, वंशवादविरोधी संस्थात्मक उत्तरदायित्वासाठी आयोजित केलेल्या शोरेनस्टिन सेंटरचा पहिलाच पोस्ट डॉक्टरल फेलो आहे. जीनिव्हा, लंडन, न्यू यॉर्क येथील अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत त्यानं काम केलं आहे. कास्ट अ ग्लोबल जर्नल ऑफ सोशल एक्सक्ल्यूजन या पत्रिकेचा तो सहसंपादक आहे. इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाइम्स, इकॉनॉमिक एंड पॉलिटिकल वीकली, अल जझीरा, द हिंदू, हफिंग्टन पोस्ट, मेल एंड गार्डियन, साऊथ एशिया: जर्नल ऑफ साऊथ एशियन स्टडीज एंड सोशल ट्रान्सफॉर्मेशन आणि यांसारख्या इतर काही वर्तमानपत्रं-माध्यमांतून त्याचं लेखन प्रकाशित झालं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CASTE MATTERS Rating Star
Add To Cart INR 460

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more