SURESHCHANDRA NADKARNI

About Author

Birth Date : 24/12/1929
Death Date : 22/07/2011


AFTER PASSING FIRST RANK FROM PUNE UNIVERSITY, DR. NADKARNI RESEARCHED SNAKES AND INSECTS FOR TEN TO TWELVE YEARS. WHILE TEACHING AT WADIA COLLEGE, PUNE, HE PUBLISHED MORE THAN FIFTEEN BOOKS ON ZOOLOGY. DR. NADKARNI WAS FAMOUS AS A GREAT SPORTSMAN. HE RECEIVED MANY NATIONAL AWARDS IN CRICKET, TENNIS, BADMINTON, KHOKHO, WRESTLING, HOCKEY, MALLAKHAMBA, BRIDGE.

पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर डॉ. नाडकर्णींनी दहा-बारा वर्षे सर्प व कीटकांवर संशोधन केले. पुण्याच्या वाडिया कॉलेजमधे अध्यापन करताना त्यांची प्राणिशास्त्रावर पंधराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. डॉ. नाडकर्णी उत्तम क्रीडापटू म्हणून प्रसिद्ध होते. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, खोखो, कुस्ती, हॉकी, मल्लखांब, ब्रिज या खेळांत त्यांना अनेक राष्ट्रीय बहुमान प्राप्त झाले. अखिल भारतीय, आंतरराज्य स्पर्धांचे संयोजन, तसेच पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य क्रीडामंडळावर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. क्रीडा स्पर्धांसाठी मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी या चारही भाषांतून समीक्षण करणारे ते एकमेव समीक्षक होते. त्यांच्या क्रीडा-ज्ञानकोश या ग्रंथाला १९८९ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ते पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांचे जनक आहेत. पुण्यात गादीवरील कुस्ती या आधुनिक क्रीडाप्रकाराची सुरुवात त्यांच्यामुळे झाली. डॉ. वसंतराव देशपांडे व ग़जल सम्राज्ञी बेगम अख्तर यांच्या सहवासामुळे त्यांच्या मनात संगीत-गायनाची आवड व समज निर्माण झाली. ते उत्तम तबलावादक होतेच; तसेच सतार, जलतरंग वादनाचा अभ्यासही त्यांनी केला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी लिहिलेल्या उर्दू काव्यातील हुब्बे वतन का जलवा (देश-प्रेम) या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती ही पदवी मिळाली होती. त्यांच्या ग़जल या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक महामंडळाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. मराठी नियतकालिकांतून त्यांची सूर आणि शब्द व गाजलेली गीते ही सदरे, तसेच सिनेगीतांवरील टीका व टिप्पणी या लेखमालाही प्रकाशित झाल्या. मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू भाषांचे संमिश्र मुशायरे भरवण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने शिकाऊ ग़जल रचनाकारांसाठी इस्लामपूर येथे १९८७ साली प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन डॉ. नाडकर्णी यांनी केले होते. अन्य व्यासंगांमध्ये फलज्योतिष, हस्तसामुद्रिक आणि हस्ताक्षर यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला होता. ते उत्तम फोटोग्राफीही करत आणि उत्तम शिकारी म्हणूनही ओळखले जात. त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि लघुपट यांच्यासाठी लेखन केले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
ADNYATACHE VIDNYAN Rating Star
Add To Cart INR 240
GAZAL Rating Star
Add To Cart INR 290
NOSTRADEMASCHI BHAVISHYAVANI Rating Star
Add To Cart INR 140
PRUTHVIVAR MANUS UPRACH! Rating Star
Add To Cart INR 160
24 %
OFF
SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET- 4 ... Rating Star
Add To Cart INR 830 INR 627

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे... अमरावती-पुणे

जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचनात आले आणि वैदर्भीय भाषेत उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ती म्हणजे -`अरे भल्ल्या मस्त आहेत बॉ या गप्पा!` प्रापंचिक, कार्यालयीन कामकाजातील गमतीजमती, आलेले बाका प्रसंग अशा ४५ कथांचा समावेश असलली ही मेजवानी खूपच रुचकर झालेली आहे. त्यात वैदर्भीय भाषेच्या लहेज्याची फोडणी पडल्यामुळे गप्पा अजूनच स्वादिष्ट ! प्रत्येक कथाप्रसंगांना समर्पक शीर्षक हे सुद्धा या पुस्तकाचे वैशिष्ट्ध ! आपल्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गमतीशीर, भावनिक प्रसंगांची आठवण ह्या गप्पा करून देतात. यातील सर्वोत्तम भावनिक साद घालणाऱ्या कथा म्हणजे `गव्हातले खडे` आणि `पुरणामागची वेदना.` लहानपणी सिनेमा बघण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड अर्थातच `हेराफेरी` वगैरे उत्तमच... मजेशीर... सर्व कथा वाचून पूर्ण झाल्यावर एक विचार मनात आला तो म्हणजे ह्या कथाप्रसंगांचा एक स्वतंत्र `गप्पांच्या मैफिली`चा किंवा `स्टैंड अप कॉमेडी` कार्यक्रम होऊ शकतो. हे पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे घेऊन सर्वांनी ह्या गप्पांमध्ये मिसळून जावे हीच विनंती ! जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more