SUSHMITA BANERJEE

About Author

Death Date : 04/09/2013


SUSHMITA BANERJEE, ALSO KNOWN AS SUSHMITA BANDHOPADHYAY AND SAYEDA KAMALA, WAS A WRITER AND ACTIVIST FROM INDIA. HER WORKS INCLUDE THE MEMOIR KABULIWALAR BANGALI BOU BASED ON HER EXPERIENCE OF MARRYING AN AFGHAN AND HER TIME IN AFGHANISTAN DURING TALIBAN RULE.

सुस्मिता बंदोपाध्याय आणि सईदा कमला या नावानेही त्या प्रसिद्ध होत्या. कोलकता येथे मध्यमवर्गीय कुटुंबात सुस्मिता यांचा जन्म झाला. अफगाणिस्तानमधील जानबाज खान या व्यावसायिकाशी २ जुलै, १९८८मध्ये विवाहबद्ध होऊन त्या अफगाणिस्तानात पोहोचल्या. घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या या विवाहामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अनुभवाने खचून न जाता त्यांनी तेथे जुळवून घेतले. पण त्याच वेळी त्यांनी बुरखा घालण्यास आणि तालिबानी फतव्यास कडाडून विरोध केला. ना\सगचे शिक्षण घेतलेल्या सुस्मिता यांनी तेथील खेड्यात स्त्रियांसाठी एक क्लिनिक सुरू केले. त्यांच्या या समाजोपयोगी कामामुळे तालिबानींनी त्यांच्यावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. यातूनच ५ सप्टेंबर, २०१३ रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांची त्यांच्या घराच्याबाहेर गोळ्या घालून हत्या केली. सुस्मिता यांनी १९९५ साली आपल्या वैवाहिक जीवनावर आधारित लिहिलेली ‘काबुलीवाल्याची बंगाली बहू’ ही पहिली कादंबरी खूप गाजली. २००३ साली त्यावर ‘एस्केप प्रÂॉम तालिबान’ हा हिंदी चित्रपटही प्रर्दिशत झाला होता. त्यानंतर ‘तालिबानी अत्याचार : देश व विदेश’, ‘मुल्ला ओमर, तालिबान व मी’ (२०००), ‘एक बोलही खोटा नाही’ (२००१) या पुस्तकांनाही लोकप्रियता लाभली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KABULIWALYACHI BANGALI BAYKO Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.