SWATI SHAILESH LODHA

About Author


SWATI AND SHAILESH LODHA VERY THOUGHTFULLY ESTABLISHED AN ORGANIZATION CALLED SWASH TO BRING ABOUT THE PROGRESS OF PEOPLE.

लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी स्वाती व शैलेश लोढा यांनी अत्यंत विचारपूर्वक स्वाश नावाची एक संस्था स्थापन केली. COMMUNICATION CONNOISSEUR हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम स्वत:ला समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांच्या कार्यशाळांमध्ये हास्य व शिक्षण यांचा अनोखा संगम असतो. पन्नास तासांच्या दीर्घ कार्यशाळांमध्ये भाग घेणाNया लोकांची मनोवृत्ती आणि वागणूकही बदलते. त्यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांबद्दल त्यांना अमेरिकेतील हार्डिंग विद्यापीठाकडून प्रशाQस्तपत्रही मिळाले आहे. स्वाती लोढा यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लेखनाला सुरुवात केली. एकविसाव्या वर्षी स्वाश ही संस्था स्थापन केली. आता त्या स्वाशच्या संचालिका आणि जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेच्या कार्यक्रम संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रामाणिक आणि सरळमार्गी वृत्ती लोकांना आदर्श वाटते. त्यांची शिस्त आणि चिकाटी लोकांसाठी प्रेरणादायी ठरते. शैलेश लोढा यांनी दहाव्या वर्षीच स्टेज-शो करण्यास सुरुवात केली. त्यांचे विनोदी कार्यक्रम जगभर लोकप्रिय आहेत. हजारो लोकांनी त्यांचे कार्यक्रम बघितले आहेत आणि प्रमुख वक्ता म्हणून त्यांची भाषणे ऐकली आहेत. आम्ही जेव्हा एका माणसाला बदलू शकतो, तेव्हा एक जग आम्ही बदललेलं असतं. असा या जोडप्याचा विश्वास आहे.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

`छाटीतो गप्पा` पुस्तक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे ,तसेच त्यात दिलेले अनुभव अविस्मरणीय आहेत. एकदम मस्त.

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more