TARA PARKER-POPE

About Author


TARA PARKER-POPE AUTHOR OF THE ‘WELL’ COLUMN, IS ONE OF THE NEW YORK TIMES MOST POPULAR AND MOST E-MAILED JOURNALISTS. SHE WROTE FOR THE WALL STREET JOURNAL BEFORE MOVING TO THE TIMES. HER WORK IS REGULARLY FEATURED ON TELEVISION AND RADIO. SHE HAS APPEARED ON TODAY, GOOD MORNING AMERICA, CNN, CHARLIE ROSE AND NUMEROUS NATIONAL PUBLIC RADIO SHOWS.

तारा पार्कर-पोप या द न्यू यॉर्क टाइम्स वर्तमानपत्रात वाचकांचा आवडता, सुप्रसिद्ध स्तंभलेख वेल ब्लॉग लिहित असतात. यामधून दैनंदिन जीवनातल्या निर्णयांचा, उत्तम स्वास्थ्य राखण्यावर होणारा परिणाम या मुद्द्यावर अधिक भर दिला जातो. टाइम्स मध्ये कार्यरत होण्यापूर्वी, तारा पार्कर-पोप या द वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये वैयक्तिक स्वास्थ्य या विषयाच्या स्तंभलेखक म्हणून काम करत होत्या. त्या द सेकंड सेन्चुरी अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन हेल्थ केअर फ्रॉम द कोलंबिया युनिव्र्हिसटी स्कूल ऑफ नर्सिंगच्या मानकरी आहेत. टूडे शो, गुडमॉर्निंग अमेरिका, सीएनएन, एनपीआर या वाहिन्या व इतर काही प्रमुख वृत्तवाहिन्या यांमधून त्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होत असतात. त्यांची सुकन्या लॅनी, तीन कुत्रे आणि तीन मांजरी यांच्यासोबत पोन्सील्वेनिया राज्यातल्या बक्स काउन्टीमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. वेल या स्तंभाच्या या लेखिका द न्यू यॉर्क टाइम्स मधल्या, नावाजलेल्या पत्रकारांपैकी एक पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. वाचकांकडून त्यांना प्रशंसेच्या भर ई-मेल येणाऱ्यांमध्ये असतात. टाइम्स मध्ये रुजू होण्यापूर्वी त्या द वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये लिखाण करत असत. त्यांच्या लिखाणावर रेडिओ व टीव्ही या माध्यमांमधून नियमितपणे अनेक कार्यक्रम होत असतात. टुडे, गुड मॉर्निंग अमेरिका, सीएनएन, चार्ली रोझ यांसारख्या कार्यक्रमांमधून त्या अनेकवेळा टीव्हीवर झळकल्या आहेत आणि नॅशनल पब्लिक रेडिओच्या अनेक कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झाल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHUBH SHUBHMANGAL Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more