U.R.ANANTMURTY

About Author

Birth Date : 21/12/1932
Death Date : 22/08/2014


UDUPI RAJAGOPALACHARYA ANANTHAMURTHY WAS AN INDIAN CONTEMPORARY WRITER AND CRITIC IN THE KANNADA LANGUAGE. HE WAS BORN IN THIRTAHALLI TALUK AND IS CONSIDERED ONE OF THE PIONEERS OF THE NAVYA MOVEMENT.

२१ डिसेंबर १९३२ मध्ये शिमोगा जिल्ह्यातल्या तीर्थहळ्ळीR तालुक्यात मेलिंगे इथं अनंतमूर्तींचा जन्म झाला. सुरुवातीचं शिक्षण पारंपरिक संस्कृत शाळेत झालं. एम. ए. झाल्यानंतर इंग्रजीचे प्रोपेÂसर म्हणून काम करतानाच कॉमनवेल्थची शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठातून १९६६ मध्ये ‘पॉलिटिक्स अ‍ॅण्ड फिक्शन इन द नाइंटीन थर्टीज’ हा प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. केरळच्या कोट्टायम इथल्या महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून १९८७ ते १९९१ पर्यंत त्यांनी काम पाहिलं. १९९२ला नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन म्हणून, तसंच १९९३ला साहित्य अकादमीचे प्रेसिंडेट म्हणून त्यांची नेमणूक झाली. ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे’ चेअरमन म्हणून दोन वेळा त्यांची निवड झाली होती. २०१२ मध्ये कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीचे ते पहिले कुलगुरू म्हणून निवडले गेले. भारतात तसंच भारताबाहेर अनेक परिसंवादांत त्यांनी लेखक, तसंच उत्तम वक्ता म्हणून भाषणं दिली आहेत. संस्कार, भव, भारतीपुरा आणि अवस्थे या त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती. निरनिराळ्या घटनांमध्ये, परिस्थितीमध्ये माणसाचे मनोव्यापार काय पद्धतीनं चालतात, याबद्दल अनंतमूर्तीचं लेखन प्रामुख्यानं भाष्य करतं. कर्नाटकातल्या ब्राह्मण समाजापुढची आव्हानं आणि घडत असणारे बदल याविषयी त्यांच्या साहित्यात ऊहापोह केलेला आढळतो. त्यांच्या बNयाचशा कादंबNयांवर चित्रपट निघाले आहेत. उदा. संस्कारा, बारा, अवास्ते, मौनी आणि दीक्षा. बायको इस्थर तसंच दोन मुलं शरत आणि अनुराधा असं त्यांचं कुटुंब आहे. १९९४ला ज्ञानपीठ पुरस्कार, १९९८ला पद्मभूषण, २००४ला साहित्य अकादमी पेÂलोशिप, २०१३ला मॅनबुकर इंटरनॅशनल प्राईजसाठी नामांकन आणि याशिवाय असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. २२ ऑगस्ट २०१४ रोजी हृदयविकारांनं त्यांचं निधन झालं. ‘सुरागी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AVASTHA Rating Star
Add To Cart INR 160
SANSKAR Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.