UTPAL V.B.

About Author


WRITER, EDITOR, TRANSLATOR AND BLOGGER. HAS ONE POETRY COLLECTION, ONE ARTICLE COLLECTION AND A FEW BOOK TRANSLATIONS (ENGLISH TO MARATHI) TO HIS CREDIT. HAS CONTRIBUTED TO THE MARATHI NEWSPAPERS, MAGAZINES AND DIWALI ISSUES. HAS BEEN A COLUMNIST WITH LOKSATTA AND DIVYA MARATHI. HAS WORKED AS AN ASSOCIATE EDITOR WITH MILOON SARYAJANI - A MARATHI MAGAZINE INSPIRED BY THE FEMINIST MOVEMENT. AREAS OF INTEREST INCLUDE SOCIO-POLITICAL THOUGHT, IDEOLOGICAL CONFLICTS, PEOPLES MOVEMENTS, CINEMA AND PHILOSOPHY. CURRENTLY WORKING WITH SAMPARK - AN ORGANIZATION ENGAGED IN POLICY RESEARCH AND ADVOCACY. HAS WORKED AS A PROFESSIONAL COPYWRITER (MARATHI AND ENGLISH).

लेखक, संपादक, अनुवादक आणि ब्लॉगर. एक कवितासंग्रह, एक लेखसंग्रह आणि काही इंग्लिश पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित. वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांतून कविता, लेख प्रकाशित. लोकसत्ता आणि दिव्य मराठी या वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन. मिळून साऱ्याजणी या मासिकात सहसंपादक म्हणून काम. सामाजिक-राजकीय विचार, वैचारिक संघर्ष, जनआंदोलनं, चित्रपट आणि तत्त्वज्ञान हे आस्थाविषय. सध्या संपर्क या धोरणअभ्यास आणि धोरणपाठपुरावा (पॉलिसी रीसर्च अँड अॅडव्होकसी) करणाऱ्या संस्थेसोबत काम करत आहे. व्यावसायिक कॉपीरायटर (मराठी आणि इंग्लिश) म्हणून काम.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
LOKSHAHICHYA HATTYESATHI Rating Star
Add To Cart INR 460

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more