VIJAY AMRUTA KULANGE

About Author

Birth Date : 12/09/1976


VIJAY AMRITA KULANGE OF THE SMALL VILLAGE OF RALEGAN MHASOBACHE IN AHMEDNAGAR DISTRICT IS AN EXEMPLARY INSPIRATION FOR STUDENTS APPEARING FOR COMPETITIVE EXAMS. HIS LIFE JOURNEY IS A PERFECT EXAMPLE OF HARD WORK AND PERSEVERANCE. HE HAS A MASTERS DEGREE IN SOCIOLOGY. A 2013 BATCH IAS OFFICER, KULANGE HAS ALSO QUALIFIED SECOND IN THE STATE IN THE MAHARASHTRA PUBLIC SERVICE EXAMINATION.

अहमदनगर जिल्ह्यातील ‘राळेगण म्हसोबाचे’ या छोट्याशा गावचे विजय अमृता कुलांगे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूर्तिमंत प्रेरणास्थान आहेत. त्यांचा जीवनप्रवास खडतर परीश्रम आणि जिद्दीचं तंतोतत उदाहरण आहे. समाजशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 2013 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी असणारे कुलांगे महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेतही राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. अहमदनगर विक्री विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून तर जामखेड तालुक्यात त्यांनी तहसीलदार म्हणूनही सेवा बजावली आहे. कुलांगे सध्या ओडिशा राज्यातील गंजाम जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. अनेक सेवाभावी उपक्रमातून कुलांगे यांनी प्रशासनात सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AAJCHA DIWAS MAJHA Rating Star
Add To Cart INR 315

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more