VIJAYA RAJADYAKSHA

About Author

Birth Date : 05/08/1933


VIJAYABAIS EDUCATION IS M.A., PH.D. DONE HE ATTENDED ELPHISTON COLLEGE AND SNDT. WORKED AS HEAD OF MARATHI DEPARTMENT IN MAHILA UNIVERSITY. ALSO M.PHIL. AND SUCCESSFULLY GUIDED MANY STUDENTS OF PH.D. MARATHI CRITIC AND WRITER MANGESH VITTHAL RAJADHYAKSHA WAS HER HUSBAND. HE HAS PUBLISHED 18 COLLECTIONS OF STORIES, 5 LITERARY COLLECTIONS AND 7 REVIEWS AND MANY EDITED BOOKS. VIJAYABAIS STORY CONVEYS A CERTAIN VALUE AND IS CHARACTERIZED BY A FLUID, POETIC STYLE.

विजयाबाईंची शिक्षण एम.ए., पीएच.डी. झाले. त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच एम.फिल. व पीएच.डी.च्या अनेक विद्याथ्र्यांना यशस्वी मार्गदर्शन केले. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.त्यांचे १८ कथासंग्रह, ५ ललित लेखसंग्रह आणि ७ समीक्षाग्रंथ तसेच अनेक संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विजयाबाईंची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते आणि तरल, काव्यात्म शैलीने अशी कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. त्यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार तर कवितारती या समीक्षा लेखसंग्रहास रा. श्री. जोग समीक्षा पारितोषिक व राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ समीक्षाग्रंथास साहित्य अकादमीचा आणि कै. केशवराव कोठावळे पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सचिव पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अध्यापक गौरव पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा साहित्यरत्न पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.इंदूर येथे २००१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. इतर विविध संस्थांवरही त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला तसेच सूत्रसंचालन केले. शाळा व महाविद्यालयांसाठी पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ज्ञानपीठ पारितोषिक परीक्षक समिती, चित्रपट परीक्षण मंडळ, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाप्रमाणेच अन्य अनेक संस्थांच्या त्या सदस्य होत्या. त्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी होत्या. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराच्या सल्लागार मंडळाच्या त्या सदस्य आहेत.महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार-२०१९
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
AKHERACHE PARV Rating Star
Add To Cart INR 220
AVATI BHAVATI Rating Star
Add To Cart INR 140
UTTARARDH Rating Star
Add To Cart INR 240
34 %
OFF
VIJAYA RAJADYAKSHA COMBO-3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 600 INR 399

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more