VIKTOR E. FRANKL

About Author

Birth Date : 26/03/1905
Death Date : 02/09/1997


DR. VIKTOR FRANKL WAS A FAMOUS AUSTRIAN NEUROLOGIST AND PSYCHIATRIST. FROM 1940 TO 1942, HE SERVED AS THE CHIEF OF NEUROLOGY AT THE ROTHSCHILD HOSPITAL. HE SPENT THREE YEARS IN AUSCHWITZ AND OTHER CONCENTRATION CAMPS DURING WORLD WAR II.

डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल हे ऑस्ट्रियातील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट व सायकिअ‍ॅट्रिस्ट होते. १९४० ते १९४२, रॉथशिल्ड हॉस्पिटल येथे त्यांनी न्यूरॉलॉजी विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ऑशवित्झ आणि इतर काही यातनातळांवर तीन वर्षे घालवली. १९४६पासून १९७०पर्यंत ते व्हिएन्ना न्यूरॉलॉजिकल पॉलिक्लिनिक येथे मुख्य अधिकारी होते. हार्वर्ड येथे आणि पिट्सबर्ग, सॅन दिएगो आणि डॅलास या विद्यापीठात ते अतिथी प्राध्यापक होते. यु.एस. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांच्यासाठी लोगोथेरपी हा स्वतंत्र विभाग तयार केला. जगभरातील अनेक विद्यापीठांकडून त्यांना २९ डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले आहे.द अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशन यांनी डॉ. फ्रॅन्कल यांना ऑस्कर फिस्टर पुरस्कार बहाल केला. फ्रॅन्कल यांची आतापर्यंत एकूण ३२ पुस्तके ३४ भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. जगातील पाचही खंडांमध्ये मिळून एकूण २०९ विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. द अमेरिकन जर्नल ऑफ सायकिअ‍ॅट्रीच्या मताप्रमाणे, डॉ. फ्रॅन्कल यांचे कार्य म्हणजे फ्रॉइड आणि अ‍ॅडलरनंतरचे सर्वांत अर्थपूर्ण विचार आहेत. ऑस्ट्रियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. १९९५ साली व्हिक्टर फ्रॅन्कल यांना त्यांचे जन्मस्थळ व्हिएन्ना येथील सन्माननीय नागरिकत्व प्राप्त झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ARTHACHYA SHODHAT Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more