* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 20 MINUTES TO TOTAL FITNESS
  • Availability : Available
  • Translators : GANGADHAR MAHAMBRE
  • ISBN : 9788177665345
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN ESSENTIAL AND PRACTICAL GUIDE TO EVERYTHING YOU NEED TO KNOW ABOUT FITNESS HOW DO YOU FIND THE TIME TO EXERCISE? WHAT IS THE MOST SUITABLE EXERCISE PROGRAMME FOR YOU? HOW DO YOU ASSESS YOUR FITNESS LEVEL? HOW SHOULD YOU CHOOSE A GYM? HOW DO YOU SET UP A GYM AT HOME? WHAT EXERCISES SHOULD YOU DO IF YOU ARE PREGNANT? WHAT EXERCISES SHOULD YOU DO IF YOU ARE SUFFERING FROM HEART DISEASE, ASTHMA OR DIABETES? HOW DO YOU KEEP FIT WHEN TRAVELLING? DO YOU KNOW THE LANGUAGE OF FITNESS? THIS ACCESSIBLE AND INFORMATIVE BOOK SHOWS YOU HOW TO SOLVE YOUR SPECIFIC PROBLEMS TO ACHIEVE THE FITNESS LEVEL YOU HAVE ALWAYS LONGED FOR. THE INTERACTIVE QUESTIONNAIRES AND EVALUATION TESTS HELP DETERMINE YOUR GOALS AND PROGRAMMES, AND DETAILED EXERCISE PLANS FOR EVERY SITUATION MAKE IT POSSIBLE FOR YOU TO FIND EXACTLY WHAT YOU NEED. WHETHER YOUR GOAL IS WEIGHT REDUCTION OR BODYBUILDING, WHETHER YOU HAVE NEVER EXERCISED OR WHETHER YOU ARE LOOKING FOR WAYS TO BENEFIT MORE FROM YOUR PRESENT EXERCISE REGIME, DR SHELLY BATRA EXPLAINS THE MEDICAL THEORY BEHIND FITNESS AND THE PRACTICAL WAYS IN WHICH TO ACHIEVE IT SO THAT YOU CAN MAKE POSITIVE CHOICES TO IMPROVE THE QUALITY OF YOUR LIFE.
`दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे...` या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कार्यक्षम असूच शकत नाही. अशी कार्यक्षमता असणारी व्यक्ती ही केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तर मानसिक संतुलन सांभाळणारी, भावनात्मकदृष्ट्या समतोल आणि सामाजिक वातावरणाशी जुळते घेणारी असते. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती – फिटनेसची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यासाठीच `२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी` हे पुस्तक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DR.SHELLYBATRA #GANGADHARMAHAMBRE #HEALTHCARE #20 MINUTES TO TOTAL FITNESS #२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 13-03-2005

    व्यायामाचे महत्त्व... बदलती जीवनशैली आणि बैठे काम यामुळे बऱ्याच जणांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. तज्ज्ञ डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी धावाधाव होते. मग आपण व्यायाम करायला हवा हे लक्षात येते. आहारावर नियंत्रण, व्यायाम या गोष्टी आवश्यक आहेत हे सुद्धासमजते. प्रत्येकाने दररोज वीस मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे, असे पुस्तकाचे शीर्षक सुचवते. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद गंगाधर महम्बरे यांनी केला आहे. पुस्तकात तीन भाग आहेत. त्यामधील प्रत्येक विभागात विविध प्रकरणे आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने वाचावे, असे हे पुस्तक आहे. -डॉ. शेली बात्रा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 18-09-2005

    व्यायामाचे तंत्र आणि मंत्र... शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम लाभदायक ठरतो हे सर्वांना कळत असले, तरी फार थोड्या जणांना वळत असते. फिटनेस चाचण्या, कसरती हे सर्व खेळाडू आणि सैनिकांसाठी असतात. असाच अनेकांचा ग्रह असतो. त्यातही जे मोजके लोक ्यायाम करतात तोही बहुधा शास्त्रशुद्ध नसतो. व्यायामशाळेइतका तंतोतंत आणि शास्त्रशुद्ध व्यायाम घरच्या घरी करता येण्यासाठी ‘२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी’ हे शेली बात्रा यांचे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक आहे. ‘२० मिनिटस् टु टोटल फिटनेस’ या डॉ. शेली बात्रा यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा गंगाधर महाम्बरे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे. एकेकाळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या नवी दिल्ली येथील विख्यात संस्थेत कार्यरत असणाऱ्या आणि आता विविध रुग्णालयांत सयंत्रक (कन्सल्टंट) म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. शेली बात्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत व्यायामाचे विविध प्रकार, त्यासाठी लागणारी विविध साधने, व्यायाम करताना पाळावयाची पथ्ये, घ्यावयाची काळजी इ. विषयांची माहिती पुस्तकात नोंदविली आहे. घरच्या घरी व्यायाम करणाऱ्यांना हे पुस्त उपयुक्त टीप्स पुरविते. पुस्तकाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे अवघी वीस मिनिटे व्यायाम करून आपण तंदुरुस्त राहू शकतो. असा विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे आणि विविध तक्ते, आकृत्या आणि कोष्टकांनी व्यायामाचे अतिशय पद्धतशीरपणे विश्लेषण केले आहे. अगदी तीन-चार ओळींच्या परिच्छेदांतून पुस्तकात अनेक मौलिक माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. या पुस्तकाचे चार विभाग आहेत. प्रारंभिक विभागात व्यायामाचे महत्त्व, तुमच्या निरोगीपणाच्या पातळीचे मापन, व्यायामच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना एरोबिक व्यायाम, अ‍ॅनएरोबिक व्यायाम, सुयोग्य वातावरण, सुयोग्य पेहेराव या विषयांची माहिती देण्यात आली आहे. ‘२० मिनिटे सराव योजना’ या दुसऱ्या विभागात व्यायामाचा कार्यक्रम, वॉर्म-अप आणि शरीराला ताणण्याचे व्यायाम, ताकदीसाठी व्यायाम, तर तिसऱ्या विभागात गर्भावस्था, व्याधीवस्था आणि प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या व्यायाम प्रकारांची माहिती आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more