* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: 26-11 MUMBAI ATTACKED
  • Availability : Available
  • Translators : PROF.MUKUND NATU
  • ISBN : 9788184982046
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
INTERVIEW WITH LET`S REPRESENTATIVE, ABDULLAH MUNTAZIR, BY THE ONLY INDIAN JOURNALIST HARINDER BAWEJA INSIDE THE HEADQUARTERS OF JAMAAT-UD-DAWA, IN MURIDKE, PAKISTAN; WHERE AJMAL AMIR KASAB, THE LONE SURVIVING TERRORIST, WAS TRAINED FOR THE ATTACK.BRINGING TOGETHER THE CAREFUL RESEARCH AND ANALYSES OF RENOWNED JOURNALISTS AND POLICE OFFICIALS, 26/11 MUMBAI ATTACKED EXPLICATES THE REALITY BEHIND THE BRAZEN ATTACK ON INDIA`S SOVEREIGNTY IN NOVEMBER 2008 WHEN TEN HEAVILY ARMED TERRORISTS HELD AN ENTIRE CITY TO RANSOM BY THE SHEER FORCE OF THEIR ZEALOTRY. THE SCENE-BY-SCENE ACCOUNTS, INCISIVE ANALYSES, AND AN EXCLUSIVE INTERVIEW WITH A LET REPRESENTATIVE ALONG WITH A DESCRIPTION OF ITS TRAINING CAMP IN MURIDKE, PAKISTAN, REVEAL HOW THE FAILURE OF INDIAN INTELLIGENCE AGENCIES LANDED MUMBAI IN THE QUAGMIRE OF TERRORISM.PAYING HOMAGE TO THE BRAVE SECURITY OFFICERS WHO LOST THEIR LIVES FIGHTING THE TERRORISTS, 26/11 MUMBAI ATTACKED REITERATES THE CHILLING REALITY THAT INDIA IS UNDER GRAVE THREAT AND THE CLOCK IS TICKING BEFORE THE NEXT BIG ATTACK.
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंट–ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ‘ये है बम्बई मेरी जान...’ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ‘ज्युलिओ रिबेरो’ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHY&TRUESTORIES #26-11 #MUMBAIATTACK #MUKUNDNATU #HARVINDERBAWEJA #TERRORISTATTACK
Customer Reviews
  • Rating Starदेव कामत

    कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंट–ओबेरॉय पर्यंच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ‘ये है बम्बई मेरी जान...’ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ‘ज्युलिओ रिबेरो’ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (बोरीबंदर स्टेशन), कामा हॉस्पिटल, द न्यू ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस वगैरे स्थळांवर दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला, हाताँब फेकले. बऱ्याच निरपराध नागरिकांचा त्यात नाहक बळी गेला. लाल किल्ला आणि संसदभवन यावर पूर्वी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापेक्षा व्याप्ती आणि तीव्रता या बाबतीत मुंबईतील हा हल्ला अधिक मुंबईतील हा हल्ला अधिक प्राणघातक आणि भयावह होता. या हल्ल्याचे नियोजन अधिक काटेकोर होते. या हल्ल्यासाठी बत्तीस अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते आण त्यापैकी दहा जणांना कराचीहून समुद्र मार्गे पाठवण्यात आले. गुजरातमधील पोरबंदर येथे या अतिरेक्यांनी एमव्ही कुबेर ही मासेमारी बोट हस्तगत करून मुंबई गाठली. एका डिंगीतून मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर उतरून आपल्या ५ टीम केल्या आणि वेगवेगळ्या पूर्व नियोजित ठिकाणी जाऊन बाँबस्फोट आणि गोळीबार करून साठ तास मुंबईला वेठीला धरले. प्रारंभी पोलिसांनी या अतिरेक्यांना तोंड दिले. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे (एटीएस प्रमुख), अशोक कामठे, विजय साळस्कर वगैरे पोलीस अधिकारी जबरदस्त जखमी झाले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी पुढे आले. तीन दिवसात या दलाचे १८ जवान बळी पडले. दहा पैकी नऊ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. दहावा अतिरेकी कसाब याला जिवंत पकडण्यात आले. या हल्ल्याविषयी वेगवेगळ्या पत्रकारांना लिहायला सांगून, त्याचे संकलन करण्याचे महिला पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ठरवले. ‘तहेलका’ या वृत्त–नियतकालिकाच्या न्यूज अँड इन्व्हेस्टिगेशन्स विभागाच्या त्या संपादिका आहेत. ‘कारगिल–एक अकथित कथा’ या त्यांच्या पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला आहे. २६/११ मुंबईवरील हल्ला या पुस्तकात या हल्ल्यातील प्रमुख स्थळी घडलेल्या घटनांचे नाट्य शब्दांच्या माध्यमातून उभे करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी हजर असणारे आणि वृत्तांकन करणारे हे पत्रकार लेखक असल्याने, संबंधितांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर घडलेल्या घटनांच्या चित्रणात तपशीलवार भर घातलेली असल्याने हे पुस्तक विश्वासार्ह दस्ताऐवजाच्या दर्जाला पात्र झाले आहे. वृत्तवाहिन्यांना शोधक कंटेन्ट पुरवणाऱ्या ‘तहेलका’ या संस्थेद्वारे अनेक सनसनाटी प्रकरणांना वाचा फोडणारे आणि सध्या आजतक या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार आशिष खेतान यांचे या पुस्तकात हॉटेल ताजमधील अंधारयात्रा (४० पृष्ठे) हॉटेल ओबेरायमधील धुमश्चक्री (२० पृष्ठे), कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास (५० पृष्ठे) असे तीन लेख आहेत. दृश्य एक, दृश्य दोन अशा नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी विविध घटना शब्दबद्ध केल्या आहेत. दहशतवादी आणि सूत्रधार यांच्यातील महत्त्वाची संभाषणेही त्यात समाविष्ट केली आहेत. ताजमधील कर्मचाऱ्यांना शौर्याचीही साक्षेपाने नोंद केली आहे. ‘मार्कोसनी चेंबर्समधील सुमारे दोनशे जणांचे प्राण वाचवले’ (७१), ‘हॉटेलमध्ये खासदार असल्याचे कळल्यानंतर त्या खासदाराला ओलीस धरा किंवा ठार मारा असा आदेश या घटना टीव्हीवरून पाहणाऱ्या या हल्ल्याच्या पाकिस्तानमधील सूत्रधारांनी दिला.’ (६८) या सारखे तपशील या हल्ल्याचे गांभीर्य आणि संबंधित व्यक्तींचे मनोधैर्य प्रकट करतात. आशिष खेतान यांच्या या तीन लेखांनी पुस्तकाची निम्मी पृष्ठे व्यापलेली आहेत. कराची ते मुंबई प्रवासाचे तारीख - वेळेनुसार पुनर्रचित केलेले नाट्य अतिरेक्यांच्या चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखतीतून एटीएसच्या कार्यालयातील नोंदीवरून, आंतरराष्ट्रीय फोनवरील संभाषणातून, कसाबच्या कबुलीजबाबातून आपल्यापुढे उभे राहते. अतिरेक्यांनी वापरलेल्या बोटीचे तपशीलही त्यांनी एखाद्या बेस्टसेलर पाश्चात्य थ्रिलरच्या शैलीत दिले आहेत. सीएनएन-आयबीएनचे प्रमुख वार्ताहार जॉर्ज कोशी यांच्या लेखात बोरीबंदर स्थानकावरील हल्ल्याची हकीकत आली आहे. कसाब आणि इस्माईल हे अतिरेकी गोळ्यांचा वर्षाव करून प्रवाशांना मारत होते. तेथून ते चालत आझाद मैदानापर्यंत गेले. आलब्लेस हॉस्पिटलच्या मागाच्या दाराशी पोचले. दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडत पुढे जात राहिले. मेट्रोजवळ त्यांनी पोलीस निरीक्षक साळसकर यांच्यावर गोळी झाडली. त्यांचे प्रेत गाडीतून बाहेर फेकून अतिरेकी पोलीस जीपमधून पळाले. इस्माइल ड्रायव्हिंग करीत होता. विधानभवनाकडे त्याने पोलीस जीप नेली. पोलिसांनी तिचा मागचा टायर गोळीने टिपला. गाडी वळवताना कलंडली इस्माईलने धाक दाखवून तेथे असणाऱ्या शरण यांच्या स्कोडा गाडीची किल्ली मिळवली. इस्माईलने ती चौपाटीकडे नेली. पोलिसांनी उभ्या असलेल्या अडथळ्याशी गाडी न थांबल्याने गोळ्या झाडल्या. ईस्माइल मेला एके-४७ घेतलेला कसाब मेल्याचे सोंग करून रस्त्यावर पडला. तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम... मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 20-03-2011

    २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (बोरीबंदर स्टेशन), कामा हॉस्पिटल, द न्यू ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस वगैरे स्थळांवर दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला, हाताँब फेकले. बऱ्याच निरपराध नागरिकांचा त्यात नाहक बळी गेला. लाल किल्ला आणि संसदभवन यावर पूर्वी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापेक्षा व्याप्ती आणि तीव्रता या बाबतीत मुंबईतील हा हल्ला अधिक मुंबईतील हा हल्ला अधिक प्राणघातक आणि भयावह होता. या हल्ल्याचे नियोजन अधिक काटेकोर होते. या हल्ल्यासाठी बत्तीस अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते आण त्यापैकी दहा जणांना कराचीहून समुद्र मार्गे पाठवण्यात आले. गुजरातमधील पोरबंदर येथे या अतिरेक्यांनी एमव्ही कुबेर ही मासेमारी बोट हस्तगत करून मुंबई गाठली. एका डिंगीतून मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर उतरून आपल्या ५ टीम केल्या आणि वेगवेगळ्या पूर्व नियोजित ठिकाणी जाऊन बाँबस्फोट आणि गोळीबार करून साठ तास मुंबईला वेठीला धरले. प्रारंभी पोलिसांनी या अतिरेक्यांना तोंड दिले. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे (एटीएस प्रमुख), अशोक कामठे, विजय साळस्कर वगैरे पोलीस अधिकारी जबरदस्त जखमी झाले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी पुढे आले. तीन दिवसात या दलाचे १८ जवान बळी पडले. दहा पैकी नऊ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. दहावा अतिरेकी कसाब याला जिवंत पकडण्यात आले. या हल्ल्याविषयी वेगवेगळ्या पत्रकारांना लिहायला सांगून, त्याचे संकलन करण्याचे महिला पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ठरवले. ‘तहेलका’ या वृत्त–नियतकालिकाच्या न्यूज अँड इन्व्हेस्टिगेशन्स विभागाच्या त्या संपादिका आहेत. ‘कारगिल–एक अकथित कथा’ या त्यांच्या पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला आहे. २६/११ मुंबईवरील हल्ला या पुस्तकात या हल्ल्यातील प्रमुख स्थळी घडलेल्या घटनांचे नाट्य शब्दांच्या माध्यमातून उभे करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी हजर असणारे आणि वृत्तांकन करणारे हे पत्रकार लेखक असल्याने, संबंधितांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर घडलेल्या घटनांच्या चित्रणात तपशीलवार भर घातलेली असल्याने हे पुस्तक विश्वासार्ह दस्ताऐवजाच्या दर्जाला पात्र झाले आहे. वृत्तवाहिन्यांना शोधक कंटेन्ट पुरवणाऱ्या ‘तहेलका’ या संस्थेद्वारे अनेक सनसनाटी प्रकरणांना वाचा फोडणारे आणि सध्या आजतक या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार आशिष खेतान यांचे या पुस्तकात हॉटेल ताजमधील अंधारयात्रा (४० पृष्ठे) हॉटेल ओबेरायमधील धुमश्चक्री (२० पृष्ठे), कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास (५० पृष्ठे) असे तीन लेख आहेत. दृश्य एक, दृश्य दोन अशा नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी विविध घटना शब्दबद्ध केल्या आहेत. दहशतवादी आणि सूत्रधार यांच्यातील महत्त्वाची संभाषणेही त्यात समाविष्ट केली आहेत. ताजमधील कर्मचाऱ्यांना शौर्याचीही साक्षेपाने नोंद केली आहे. ‘मार्कोसनी चेंबर्समधील सुमारे दोनशे जणांचे प्राण वाचवले’ (७१), ‘हॉटेलमध्ये खासदार असल्याचे कळल्यानंतर त्या खासदाराला ओलीस धरा किंवा ठार मारा असा आदेश या घटना टीव्हीवरून पाहणाऱ्या या हल्ल्याच्या पाकिस्तानमधील सूत्रधारांनी दिला.’ (६८) या सारखे तपशील या हल्ल्याचे गांभीर्य आणि संबंधित व्यक्तींचे मनोधैर्य प्रकट करतात. आशिष खेतान यांच्या या तीन लेखांनी पुस्तकाची निम्मी पृष्ठे व्यापलेली आहेत. कराची ते मुंबई प्रवासाचे तारीख - वेळेनुसार पुनर्रचित केलेले नाट्य अतिरेक्यांच्या चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखतीतून एटीएसच्या कार्यालयातील नोंदीवरून, आंतरराष्ट्रीय फोनवरील संभाषणातून, कसाबच्या कबुलीजबाबातून आपल्यापुढे उभे राहते. अतिरेक्यांनी वापरलेल्या बोटीचे तपशीलही त्यांनी एखाद्या बेस्टसेलर पाश्चात्य थ्रिलरच्या शैलीत दिले आहेत. सीएनएन-आयबीएनचे प्रमुख वार्ताहार जॉर्ज कोशी यांच्या लेखात बोरीबंदर स्थानकावरील हल्ल्याची हकीकत आली आहे. कसाब आणि इस्माईल हे अतिरेकी गोळ्यांचा वर्षाव करून प्रवाशांना मारत होते. तेथून ते चालत आझाद मैदानापर्यंत गेले. आलब्लेस हॉस्पिटलच्या मागाच्या दाराशी पोचले. दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडत पुढे जात राहिले. मेट्रोजवळ त्यांनी पोलीस निरीक्षक साळसकर यांच्यावर गोळी झाडली. त्यांचे प्रेत गाडीतून बाहेर फेकून अतिरेकी पोलीस जीपमधून पळाले. इस्माइल ड्रायव्हिंग करीत होता. विधानभवनाकडे त्याने पोलीस जीप नेली. पोलिसांनी तिचा मागचा टायर गोळीने टिपला. गाडी वळवताना कलंडली इस्माईलने धाक दाखवून तेथे असणाऱ्या शरण यांच्या स्कोडा गाडीची किल्ली मिळवली. इस्माईलने ती चौपाटीकडे नेली. पोलिसांनी उभ्या असलेल्या अडथळ्याशी गाडी न थांबल्याने गोळ्या झाडल्या. ईस्माइल मेला एके-४७ घेतलेला कसाब मेल्याचे सोंग करून रस्त्यावर पडला. तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम... मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more