IN 2019, A HIGH-VOLTAGE POLITICAL DRAMA UNFOLDED OVER THIRTY-FIVE DAYS BETWEEN THE DECLARATION OF THE MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION RESULTS AND THE FORMATION OF THE SHIV SENA-NCP-CONGRESS GOVERNMENT IN THE STATE. THE STARTLING EVENTS THAT HAD THE ENTIRE COUNTRY GLUED TO TELEVISION SCREENS CULMINATED IN THE SWEARING IN OF UDDHAV THACKERAY AS CHIEF MINISTER ON 28 NOVEMBER 2019. THIS BOOK IS A BLOW-BY-BLOW ACCOUNT OF THE UPS AND DOWNS THAT TOOK PLACE DURING THOSE THIRTY-FIVE DAYS THAT BAFFLED EVEN HARDCORE POLITICAL PUNDITS. THE GOINGS-ON UNMASKED ALMOST ALL PARTIES AND POLITICIANS OF THE STATE AND CHANGED MAHARASHTRA`S POLITICS FOREVER. WITH EXCLUSIVE REPORTAGE AND INTERVIEWS FROM CLOSE OBSERVERS OF THE WHOLE DRAMA, 35 DAYS GOES BEHIND THE SCENES TO RECONSTRUCT WHAT TOOK PLACE DURING THE MAHARASHTRA ELECTIONS 2019.
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकांचे निकाल लागण्यापासून ते शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस आघाडी प्रेणित सरकार स्थापनेपर्यतचा ३५ दिवसांचा काळ म्हणजे जणू एका महानाट्याचा काळ होता. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंतच्या लक्षवेधी घटनांनी जनतेला टीव्ही माध्यमांशी अक्षरशः चिकटवून टाकले होते. राजकीय पंडितांनाही अचंबित करणारे या ३५ दिवसातले चढउतार या पुस्तकात संगतवार विस्ताराने समोर येतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच या काळाने सर्वच राजकीय चेहऱ्यांचे नकाब उतरवले. या विलक्षण रिपोर्ताजमध्ये या नाट्यात सहभागी असलेले आणि याचे साक्षीदार असलेल्यांच्या मुलाखतींच्या माध्यमातून पडद्यामागच्या नाट्याचा चेहराही स्पष्ट होतो.