* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A METHODICAL ENGLISH GRAMMAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665161
  • Edition : 7
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 548
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : GRAMMAR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FOR SOME REASON MARATHI STUDENTS ALWAYS TEND TO TURN AWAY FROM THE ENGLISH LANGUAGE. THEIR MINDS SEEM TO HARBOR A VAGUE FEAR ABOUT IT. THEY ARE RELUCTANT TO CONVERSE IN ENGLISH. AS A RESULT, THEY ALWAYS REMAIN LAGGARDS IN COMPETITIVE EXAMINATIONS. THE REASONS FOR THIS STATE OF AFFAIRS ARE TWO-FOLD. ONE IS A DISLIKE FOR ENGLISH GRAMMAR; AND OTHER, A PERVASIVE FEAR COMPLEX IN THE MINDS. THIS BOOK HAS BEEN SPECIALLY CONCEIVED WITH THE FOCUS ON THE STUDENT, AFTER DEVELOPING A NEW METHOD OF TEACHING AND LEARNING. IT AIMS TO HELP CONQUER THIS FEAR COMPLEX AND TO WIPE AWAY THE DISLIKE. EACH SECTION OF THE BOOK HAS BEEN PAINSTAKINGLY EDITED. IT ALSO GIVES ELABORATE MARATHI EXPLANATIONS, DOING AWAY WITH THE OBSTACLE OF TECHNICAL WORDS. THE LANGUAGE HAS BEEN PRESENTED IN A SIMPLE AND INTERESTING MANNER BY USING EASY-TO-UNDERSTAND EXAMPLES. THIS BOOK IS A MUST-HAVE FOR SECONDARY SCHOOL AND JUNIOR COLLEGE STUDENTS, AND ESPECIALLY SO FOR THOSE DESIROUS OF APPEARING FOR COMPETITIVE EXAMINATIONS AS WELL AS FOR GENERAL STUDENTS OF ENGLISH.
मराठी मुलं इंग्रजी या विषयापासून, का, कोण जाणे, सतत दूर राहतात. त्यांच्या मनांत इंग्रजीविषयी एक अनामिक भीती वसत असते. इंग्रजी मधे संभाषण करतानाही ती बिचकतात. परिणामी स्पर्धात्मक परीक्षांमधे त्यांची सतत पीछेहाट होताना दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे, इंग्रजी व्याकरणाबद्दल असलेली नावड आणि एवूण इंग्रजीबद्दल मनात घर करून बसलेला भयगंड. ही नावड नाहीशी व्हावी, म्हणून; आणि या भयगंडावर मात करता यावी, म्हणून विद्याथ्र्यांच्याच दृष्टिकोनातून व्याकरणाच्या अध्ययन-अध्यापनाची एक नवी पद्धती (शूप्द्) विकसित करून, हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. यातील प्रत्येक विभाग अत्यंत कष्टपूर्वक संपादित करण्यात आला आहे. शिवाय मराठी भाषेत विस्तारपूर्वक स्पष्टीकरण देऊन, पारिभाषिक शब्दांचा अडथळा दूर करण्यात आला आहे. सोप्या सोप्या उदाहरणांच्या साहाय्यानं इंग्रजी हा विषय सुलभ व रोचक करण्यात आला आहे. माध्यमिक शाळा, ज्यूनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी व विशेषकरून स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक या सर्वांना हा ग्रंथ सतत हाताशी ठेवावासा वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ENGLISH GRAMMAR #G.D.MORAY #LANGUAGE #SPELLING #NOUNS #PRONOUNS #ADJECTIVES #VERBS #TENSES #PHONETIC SYMBOLS #ADVERBS #INFINITIVE #PARTICIPLES #GERUND #PREPOSITIONS #CONSTRUCTIONS #TRANSFORMATION OF SENTENCES # CLAUSES #SYNTHESIS OF SENTENCES #DIRECT AND INDIRECT SPEECH # FIGURES OF SPEECH #WORD FORMATION #PUNCTUATION #WREN AND MARTINE ENGLISH GRAMMAR BOOK #OXFORD #अ मेथॉडिकल इंग्लिश ग्रामर # जी. डी. मोरे #ध्वनिचीन्हे #नामे # सर्वनामे #विशेषणे #क्रियाविशेषणे # युक्त रूप # कृदंत # शब्दयोगी अव्यये # रचना # काळांचे उपयोग # वाक्यारुपांतर # वाक्याखंड # वाक्यासंयोग # भाषालंकार # प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन # विरामचिन्हे # शब्दसिद्धी #धातुसाधित नाम
Customer Reviews
  • Rating StarSHIVMARG - MARCH 2019

    इंग्रजी भाषेचा समग्र आणि सोदाहरण घेतलेला वेध... विविध कारणांसाठी इंग्रजी भाषा चांगल्या रीतीने लिहिता-बोलता येणं महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत देणं इ. हे महत्त्व लक्षात घेऊन जी. डी. मोरे यांनी ‘A Methodical English Grammar’ हे पस्तक लिहिलं. मोरे हे स्वत: इंग्रजीचे अध्यापक आहेत. विद्यार्थाना इंग्रजी शिकवताना त्यांनी नवनवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक. ध्वनिचिन्हे – उच्चार व आघात, नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे, काळ, काळांचे उपयोग, क्रियाविशेषणे, युक्तरूप, कृदन्त, धातुसाधित नाम, शब्दयोगी अव्यये, रचना, वाक्यरूपान्तर, वाक्यखंड, वाक्यसंयोग, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कथन, भाषालंकार, शब्दसिद्धी, विरामचिन्हे याबाबत सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. तसेच हे पुस्तक कसे अभ्यासावे, लिप्यंतर याविषयीही माहिती दिली आहे. या पुस्तकातील सर्व exercise ची उत्तरे शेवटी दिली आहेत. इंग्रजी हा विषय अनेक सोप्या उदाहरणांच्या मदतीने सुलभ व रोचक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. इंग्रजीमध्ये विभक्तीचे कार्य prepositions (शब्दयोगी अव्यय) कशी करतात याचं सविस्तर आणि सोदाहरण विवेचन मोरे यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी ३२ पानं खर्ची घातली आहेत. Phonetic Symbols Key To Pronunciation And Stress (ध्वनिचिन्हे, उच्चार व आघात) हे प्रकरण, या पुस्तकाचं वेगळेपण दर्शवतं. शिवाय लेखकाने केलेला सूत्रांचा वापर हा भाग महत्त्वाचा आहे. लेखकाने स्वत: सूत्रे तयार केली आहेत. या सूत्रांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि मुलं इंग्रजीचा अचूक वापर करण्यास शिकतील. या पुस्तकाची प्रस्तावनाही अभ्यासपूर्ण आहे. हे पुस्तक वाचून विद्यार्थाच्या मनामध्ये इंग्रजीविषयी गोडी निर्माण होईल. शाळा-ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी व विशेषकरून स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक, इंग्रजीचे शिक्षक या सर्वांना या पुस्तकाचा उपयोग होईल आणि यापूर्वीही अनेकांना या पुस्तकाचा उपयोग झाला असेल; कारण या पुस्तकाची ही सातवी आवृत्ती आहे. व्याकरणासारख्या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होणं, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarRATNAGIRI TIMES 28-10-2001

    आजतरी आपल्या देशात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. स्पर्धापरिक्षा, नोकरीकरिता मुलाखती इत्यादिकरिता चांगले इग्लिश हे भांडवल आहे. इंग्रजी भाषेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात व वेगवेगळया शास्त्रीय शोधांची ओळख होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे मरठी भाषेवर प्रभुत्व होते. तरीदेखील त्यांनी इंग्रजी भाषेला ‘वाघीणीचे दूध’असे संबोधले. आज अध्र्या जगात इंग्रजी भषा बोलली जाते. विज्ञान, वाणिज्य, कला व विधी शाखांमध्ये इंग्रजी हे वरदान आहे. कोणतीही भाषा आत्मसात करावयाची असेल तर त्या भाषेच्या व्याकरणाला महत्व आहे व तो एक भक्कम पाया आहे. व्याकरणाशिवाय भाषा शिकणे किंवा व्याकरणाच्या अभ्यासातून भाषा शिकणे हा एक वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण व्याकरणाने एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो व त्या भाषेतील वाक्यरचना समजण्यास सुलभता येते. आपण लिहिलेले वा बोललेले बरोबर आहे विंâवा नाही, हे व्याकरणाशिवाय समजणार नाही. आजतागायत इंग्रजीत बरीच व्याकरणाची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. पण विद्याथ्र्यांची गरज संपूर्णपणे भागविणारी व्याकरणाची पुस्तके विरळच! इंग्रजी भाषेचा एक अभ्यासक या नात्याने मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रसिद्ध केलेले जी.डी. मोरे यांचे A Methodical English Grammar हे पुस्तक संपूर्ण अभ्यासिले. मोरे हे इंग्रजी शिकविण्याच्या व्यवसायात बरीच वर्षे (जवळजवळ आयुष्यभर म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही) असल्यामुळे ते विविध थरांतील गरजा, त्यांना जाणवणाNया त्रुटी लक्षात घेऊन त्यांनी वरील पुस्तकाचे लिखाण केले आहे. नानाविध इंग्रज लेखकांच्या व्याकराणाच्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन इंग्रजी भाषेची मर्मस्थाने व बारकावे ओळखून त्यांनी सोप्या भाषेत अभ्यासकाला सहज समजेल, असे पुस्तक लिहिले आहे. मोरे यांना सर्व प्रकरणांचे प्रयोग मुलांसमोर केले आहेत. त्यासर्व प्रयोगांचे फलित म्हणजे हे पुस्तक साहजिकच त्यांचे पुस्तक वेगळे उतरले आहे. आजच्या काळी एका वर्षाच्या आत इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघालेली माझ्या ऐकिवात नाही. ए मिथॉडिकल इंग्लिश ग्रामरची दुसरी आवृत्ती बाजारात आलेली आहे. सर्व विषय मराठी भारुोत समजावून सांगितल्याने विद्यार्थी व शिक्षकांची चांगजीच सोय झाली आहे. शहरातून या पुस्तकाला मागणी आहेच पण खेड्यापाड्यातून या पुस्तकाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more