* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668568
  • Edition : 5
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN DAY-TO-DAY LIFE, WE COME ACROSS MANY WORDS AND DEFINITIONS. THE STUDENTS LEARN MANY THEOREMS AND OBSERVE MANY APPARATUS IN THEIR SCHOOLS. BUT, IF WE GIVE IT A SERIOUS THOUGHT THEN WE WILL REALIZE THAT MANY OF THEM ARE NOT FULLY AWARE OF THE MEANINGS OF THIS NAMES, DEFINITIONS OR APPARATUS. THE WHOLE PURPOSE BEHIND THE PUBLICATION OF THE BOOK "A TO Z` WAS TO HELP EVERYONE TO OVERCOME THIS DIFFICULTY. IN THIS BOOK, WE HAVE STARTED WITH THE MEANINGS AND EXPLANATIONS OF WORDS IN AN ALPHABETICAL ORDER. WE HAVE TRIED TO MAKE IT EASIER BY DRAWING FIGURES WHEREVER NECESSARY. THE AUTHOR HAS SO FAR WRITTEN DIFFERENT BOOKS ABOUT THE SCIENTIFIC TOYS, AND EXPERIMENTS. WE ARE SURE THAT THE READERS WILL ENJOY THIS BOOK AS WELL.
रोजच्या व्यवहारात विज्ञानातील अनेक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. शालेय विद्याथ्र्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञानावर आधारित अनेक सिद्धांत व उपकरणे अभ्यासली जातात; परंतु त्यांंचे अर्थ कित्येकदा माहीत नसतात. त्यासाठीच ‘A ूर्द ैं विज्ञान’ची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात इंग्रजी ‘A’ या आद्याक्षरापासून र्‘ैं’ पर्यंत जास्तीत जास्त शब्दांची आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढून समजण्यास सोपी अशी मांडणी केली आहे. वैज्ञानिक खेळण्यांची, प्रयोगांची मनोरंजक पुस्तके देणाNया डी. एस्. इटोकर यांचे हे वेगळे पुस्तक बाल, कुमार वाचकांबरोबर आबालवृद्धांनाही आवडेल असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ATOZVIDNYAN #ATOZVIDNYAN #ATOZ #विज्ञान #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarShekhar Kadge

    Best E-BOOK OFF WORLD`S

  • Rating StarDAINIK DESHDOOT 14-12-2008

    आजचे युग हे विज्ञान युग आहे. या युगात विज्ञानाची नवनवी क्षितीजं सामोरी येत आहेत; पण याने अचंबित होण्यापेक्षा आपल्या इतिहासात डोकवायला हवे. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान हवे. आपल्याकडे वेदकाळात विज्ञान प्रगत अवस्थेत होतं. अणू-परमाणू यांचा विचार, खगोल, भविषय यांचा अभ्यास, वैद्यकशास्त्र तंत्रज्ञान या अनेक क्षेत्रांत भारतीय शिखरावर होते, परंतु सततची आक्रमणं आणि जेत्यांची भूमिका, आपला न्यूनगंड यामुळे आपली संस्कृती दुय्यम मानून आपण दुर्लक्ष केले अन् पाश्चात्यांपुढे मान डोलवून ते सांगणारे विज्ञान आजचे सत्य मानू लागले. चीनमध्ये उत्खननात अल्युमिनियमची भांडी सापडली. हडप्पा मोहंजोदडोचा इतिहास अजून काय सांगतो? रामायण-महाभारत काळातील विमानं, शस्त्र-अस्त्र यांची वर्णने नीट वाचून वेध घेतला तर किती वेगळं सत्य सामोरं येतं. गुरुशिष्य, परंपरा, ज्ञान दडवण्याची वृत्ती, शहरीकरण, मनातला स्वत:चा देश व संस्कृतीबाबतचा न्यूनगंड, ग्रंथालये, विश्वविद्यालयांचा नाश, जाळपोळ इ. मुळे आपलं ज्ञानभांडार नाहिसे झाले. या पुस्तकाच्या दोन भागात पृथ्वीवरील विविध भागांत, विविध क्षेत्रांत प्राचीन काळी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली होती आणि ज्या प्रगतीचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत अशाच प्रगतीचा विचार केला आहे. आद्य रुग्णालये, शस्त्रक्रिया, आरसे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दागिने, शिवणकाम, फॅशन, उद्यानशास्त्र, लटकत्या बागा, खेळ, खगोलशास्त्र, भविष्यदर्शी हाडे आणि चिनी संस्कृती अशा या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेचा वेध घेतला तरी पुस्तकाचे मूल्य लक्षात येते. या साऱ्या मांडणीत इतिहास अपरिहार्यपणे येतोच. साम्राज्यांची पडझड, वेगळ्या धर्माचा परिचय यामुळे लोकजीवनावर होणारा परिणाम, त्यांचे जीवनमान, राहणी याच्या वाचनातून आजच्या काळाशी संदर्भ लावत वाचत गेल्यास आपल्यासमोर अनेकविध जीवनाचे पैलू स्पष्ट होत जातात. इ.स.पू. १९०० च्या सुमारास शेतकरी फळे काढण्यासाठी माकडे कामाला लावत होते. नांगराचा पहिला पुरावा इ.स.पू. ३००० च्या जवळपास मिळतो. इ.स. १०० ते ८८० च्या दरम्यान एस्किमो हस्तीदंतात कोरलेले गॉगल्स वापरत. खय्याम म्हटल्यावर शायरी आठवते; पण मुळात तो एक प्राचीन खगोल शास्त्रज्ञ होता असे अनेक संदर्भ, पुरावे या पुस्तकात वाचकाला अडकवून ठेवतात. या पुस्तकाच्या दुसNया भागात पण साडेचार हजार वर्षापूर्वीचे माहिती तंत्रज्ञान हा पहिला लेख. यानंतर दळणवळण, रस्ते, जलमार्ग, नकाशे, नौदल, दीपगृह, होकायंत्र, रणगाडे, कुपनलिका विद्युत घट, तोफा, धरण, कालवे, शेती औजारे अन शेवटचा लेख आहे आपल्या पूर्वजांचं तंत्रज्ञान आणि आपण. अशाप्रकारे नामशेष झालेल्या प्राचीन तंत्रज्ञानाची अपूर्व ओळख या पुस्तकातून करून दिलेली आहे. आपल्या देशाचा हा अपूर्व ज्ञानठेवा या पुस्तकातून मांडलेला आहे. तो पुढच्या पिढीला माहिती व्हायला हवा म्हणून ही पुस्तके घ्यायला हवीतच. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more