ADGAR` IS ALSO MAHADEV MORE`S NOVEL ON RURAL LIFE. ANSHI`S WASTED LIFE IS SEEN IN THIS NOVEL. ADDICTED FATHER, EXTREME POVERTY, MOTHER`S TOBACCO-FILLED CLOSET TOIL. ANSHI`S YOUTH AND EDUCATION WERE RUINED BY THIS. SHE FALLS IN LOVE WITH A GROCER NAMED BAPU. DESPITE BEING MARRIED, BAPU CHEATS THE GIRLS OF THE VILLAGE, AMONG THEM ANSHI ALSO CHEATS. ANSHI GOT MARRIED; BUT SHE DOESN`T SLEEP. THE VAGARIES OF THE VILLAGE MAKE HER WORSE. THE VILLAGE PRIEST AND HER AUNT LURE HER WITH MONEY AND SELL HER TO A KUNTANKHANA IN MUMBAI. DOES ANSHI`S LIFE SHIP KEEP GOING ASTRAY OR IS IT ON THE RIGHT TRACK?
‘आडगार’ही महादेव मोरे यांची ग्रामीण जीवनावरील कादंबरी. आन्शीचं उधळलेलं जीवन या कादंबरीतून दिसतं. व्यसनी पिता, कमालीचे दारिद्र्य, आईचे तंबाखू वखारीतले काबाड कष्ट. यांतून आन्शीचं तारुण्य, शिक्षण यांची वाताहत होते. बापू नावाच्या किराणा दुकानदाराशी तिचं प्रेम जमतं. बापू लग्न होऊनही गावातल्या मुलींना फसवत असतो, त्यांत आन्शीसुद्धा फसते. आन्शीचं लग्न होतं; पण ती नांदत नाही. गावातली भागामावशी तिला अजूनच बिघडवते. गावचा पुजारी व मावशी तिला पैशांचं आमिष दाखवून मुंबईला कुंटणखान्यात विकतात. आन्शीची ही जीवननौका अशीच भरकटत राहते की येते योग्य मार्गावर?