NEWSPAPER REVIEWचैतन्यमयी चरित्र...
या सनातन हिंदुस्थानात तीन माणसं केवळ पाच मिनिटांसाठीदेखील एकत्र येऊन एखादं कार्य पार पाडत नाहीत. प्रत्येकाची धाप-धडपड सत्ता संपादनासाठी. केवळ पोटासाठी भूक शमत नाही म्हणून ती खिश्चन धर्माकडे आकर्षित होतात असा विचार करू नका. त्यांन (दीनदुबळे, दरिद्री, खालच्या जातीत जन्माला आलेले लोक इत्यादी) तुमच्याकडून (हिंदूकडून) सहानुभूती, प्रेम, दयामाया लाभत नाही म्हणून ते धर्मांतर करतात.
हे मौलिक विचार आहेत स्वामी विवेकानंदांचे शंभरेएक वर्षांपूर्वी त्यांनी विविध ठिकाणी मांडलेले हे विचार आजच्या समस्त हिंदुस्थानींना विशेषत: राजकारण्यांना लागू पडतात. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं म्हणणाऱ्या आणि धर्मांतराचं राजकारण करणाऱ्या मंडळींनाही स्वामींनी धर्मांतराबद्दल व्यक्त केलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात.
कट्टर हिंदू धर्माभिमानी असलेल्या द्रष्ट्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या अमोघ, विद्वत्ताप्रचुर अभ्यासू भाषणाने शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत छाप पाडली. सर्वांची मनं जिंकली. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले स्वामी ४ जुलै १९०४ रोजी सदेह वैकुंठास गेले. उणेपुरे ३९ वर्ष आयुष्य लाभलेल्या या प्रेषितावर, त्यांच्या विचारांवर अनेक भाषांत पुस्तकं प्रकाशित झाली आहेत असं हे प्रेरणादायी चैतन्यमय चरित्र गौतम घोष यांनी इंग्रजीज लिहिलेलं पुस्तक The Prophet of Modern India : A Biography of Swami Vivekanand प्रकाशित झालं होतं. या सर्वांगसुंदर पुस्तकाचा अनुवाद केला आहे माधव मोर्डेकर यांनी ‘आधुनिक हिंदुस्थानचे प्रेषित स्वामी विवेकानंद’ पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतंच प्रकाशित केलं आहे.
एकूण १२ प्रकरणांतून लेखकाने स्वामीचं चरित्र उलगडून दाखवलं आहे. बालपणीचा नरेंद्र कसा हुड होता. अत्यंत तल्लखबुद्धी, चौकसपणा, चिकित्सक वृत्तीच्या तरुणाचं बालपण, त्याच्या घराण्याची परंपरा-रूढी कथन करून लेखकाने गुरू श्री रामकृष्ण परमहंस योग्य शिष्याच्या शोधात (म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या) होते. स्वामींना देवाचं दर्शन हवं होतं. ती त्यांची इच्छा श्री परमहंस यांनी कशी पूर्ण केली याचं बहारदार वर्णन लेखकाने केलं आहे. स्वामींना दिव्यत्वाची प्रचीती आणि त्याची पायाभरणी केव्हा झाली हे वाचनीय आहे. श्री रामकृष्ण परमहंसांसारखा योगी पुरुष सद्गुरुच्या रूपाने भेटल्यावर नरेंद्रचा स्वामी विवेकानंद कसा झाला याचं मनोज्ञ चित्रण यात रेखाटलं आहे.
बौद्ध हा हिंदू धर्माचाच एक भाग. या दोन्ही धर्मांच्या परस्परावरील संबंधावर भाष्य करताना स्वामींनी खिश्चन-यहुदी धर्माची तुलना त्यांच्यातील संबंधाशी केली आणि विचारवंतांना सडेतोड उत्तर दिलं. कर्म, भक्ती, राग इत्यादी योगाची महती स्वामींनी पाश्चिमात्त्यांना पटवून दिली. वेद आणि वेदांत या दोघांचं सार म्हणजे सामर्थ्य, स्वामी म्हणत, ‘हिंदूनी आपल्या धर्माचा त्याग बिलकूल करू नये.’ अंधश्रद्धेवर स्वामींनी कडाडून टीका केली. देश-परदेशातील या भटकंतीत स्वामींना भेटलेल्या व्यक्ती, ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले मौलिक विचार इत्यादीचा सचित्र समावेश यात आहे. स्वामीच्या घराण्यातील थोर पुरुष, त्यांचे सद्गुरू, त्यांची पत्नी, शारदा माता, स्वामींचे गुरुबंधू यांच्या जीवनाचा वेध घेऊन लेखकाने परदेशात भेटलेल्या भगिनी निवेदिता आणि अन्य पाश्चिमात्य शिष्यांचा परिचय करून दिला आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यामागील उद्देश,कन्याकुमारीला स्वामींनी केलेली तपश्चर्या इत्यादींचा अनोखा मागोवा यामागील उद्देश, याचं सुंदर चित्रण यात केलं आहे.
शेवटच्या प्रकरणात लेखकाने स्वामींचा शेवटचा प्रवास वर्णन करताना त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यावेळची त्यांची शांत वृत्ती या साऱ्या घटनांची नोंद समस्त वाचकांना करून दिली आहे. दिव्य दूरदृष्टी लाभलेल्या या प्रेषित योगी पुरुषाची सचित्र चरित्रात दुर्मिळ अप्रकाशित अशी छायाचित्रे आहेत. स्वामींचे विविध वस्त्रांतील, विविध मूड दर्शविणारी छायाचित्रे पाहणे हा एक आनंद योग म्हणावा लागेल.
हे चरित्र वाचताना हे अनुवादित चरित्र आहे हे अजिबात जाणवत नाही. एवढा सुंदर अनुवाद मोर्डेकरांनी केला आहे. सर्वार्थाने उत्कृष्ट निर्मितीमूल्य लाभलेल्या या ग्रंथाचं देखणं मुखपृष्ठ केलं आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आज हिंदुस्थानात सर्व स्तरांवरील वातावरण गढूळ, गलिच्छ झालं आहे. अल्पसंख्याकांची वाढती लोकसंख्या, त्यांची वाढती धार्मिकता, माथेफिरूपणा, उपद्रवता, हिंदूची असहायता यात बहुसंख्याक भरडले जात आहेत. बहुसंख्याक हिंदूना पुन्हा मानाने जगवण्यासाठी हा सनातन देश सामर्थ्यशाली, बलशाली व्हावा यासाठी ‘यदा यदा हि धर्मस्य...’ या गीतावचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्टा योगी, प्रेषित महापुरुषाने अवतार घ्यावा.
अक्षय प्रेरणादायी, चैतन्यमयी स्वामीचं चरित्र सर्वांनीच विशेषत: सर्वधर्मसमभावाची फुकाची पाठराखण करणाऱ्या विचारवंतांनी जरूर अभ्यासावं.
-नंदकुमार रोपळेकर ...Read more
DAINIK PUDHARI 29-08-2004असामान्य बुद्धिमत्ता...
नवजात अर्भकाची सर्वसाधारण ठेवण पाहून दत्त कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. त्याच्याकडे पाहिले की, त्याच्या आजोबांची दुर्गाप्रसादांची आठवण चटकन यावी. त्याचा तोंडावळा बहुतांशी आजोबांच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता होता. त्या आजोबांनी आपल्ा जीवितकालात अचानक संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून लौकिकाकडे पाठ फिरवलेली होती. या बालाकाच्या रूपाने त्या संन्यस्त जीवाने पुन्हा एकदा या जगात प्रवेश तर नसेल केला, असा एक विचार त्या सर्वांना कळत न कळत चाटून गेला. पहा, काही का असेना घरात वंशचा दिवा तर प्रज्वलित झाला ना! बस्स.
नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे याचा खल सुरू झाला. भरपूर घुसळण झाली. काहींनी सुचवले, ‘आजोबांच्या वळणावर गेला म्हणता तर त्यांचेच नाव... दुर्गाप्रसाद ठेवा ना!’ मात्र, मातोश्री भुवनेश्वरीदेवींनी सुचवले, ‘लक्षात घ्या, माझा छकुला साक्षात श्री वीरेश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे त्याचे नाव ‘वीरेश्वर’ च ठेवायचे. दुसरा विचार नको...! भुवनेश्वरांच्या या सुचनेशी प्रत्येकजण सहमत झाला. अर्थात, आणखी एका रिवाजाप्रमाणे पाळण्यातले नाव पाळण्यातच राहिले. सारेजण त्याला ‘बिल्ले’ या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. पुढे त्यातही बदल झाला. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखी एक नाव पुढे आले... नरेन्द्रनाथ! पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन ‘नरेन’ हे नाव जवळच्या लोकांच्या तोंडात बसले.
छोटा नरेन स्वभावताच व्रात्य होता. खूपच खट्याळ, खोडकर. इतरांनी दाखवलेली आमिषे, घातलेला धाक आदींना तो बिलकूल बघत नसे. सतत काहीतरी गडबड, धांगडधिंगा, आरडाओरडा चालूच असायचा. गप्प बसणे, उगी राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. शेवटी, भुवनेश्वरींनी त्यावर एक इलाज शोधला. नरेनला चूप करायचे झाल्यास त्याच्या डोक्यावर गार पाण्याची धार धरायची आणि धारेबरोबरच ‘शव, शिव’ असा जप करायचा. कधी कधी धाकही घालायचा. ‘सरळ वागला नाहीस ना तर शिवशंकर तुला कैलास पर्वतावर पाऊलही टाकू द्यायचे नाहीत... लक्षात ठेव!’ आणि काय चमत्कार! बिल्ले पुन्हा सुतासारखा सरळ व्हायचा. तितकाच तरतरीत, उल्हसित. थोडक्यात, असा एखादा रागाचा झटका आला, चिडाचीड झाली की आई लगेच म्हणायची, ‘काय नशीब बघा! मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हणून मी शिवशंकरांचे पाय धरले आणि भोलेनाथांनी माझ्या पदरात घातला हा दैत्य! त्यांच्या सेवकांपैकी एक!’
अर्थात, असे स्फोट हे वरकरणीचे होते, प्रत्येक घरात ते होतातच. तेवढा भाग सोडला तर नरेन एक तल्लख, बुद्धिमान, गोड आणि प्रेमळ बालक होता. कोणाकडेही दुडदुडू धावत जावे, त्याच्या मांडीवर खुशाल बसावे ही त्याची रीत होती. सगळ्यावर अगदी बिनधोक विश्वास ठेवणाऱ्या मुलांपैकी तो एक होता. लहान मुलाला भोवतालचे विश्व म्हणजे एक सततचे विस्मयकारी प्रकरणच असते. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी जगाकडे पाहत क्षणोक्षणी आनंद लुटण्याचा तो एक काळ असतो. बाल नरेन तो आनंद मनमुराद घेत असे. आपल्या दोनही ज्येष्ठ भगिनींची सतत कुरापत काढण्याची त्याला हौस होती. त्या बिचाऱ्या त्याला पुरून उरत नसत. त्याने अनेक प्राणी पाळलेले होते. त्यांच्याशी खेळणे त्याला आवडत होते. त्यातल्या त्यात घरातल्या गायीवर त्याचे भलते प्रेम होते. त्याच्या बहिणी त्या गायीला गोमाता किंवा भगवती मानून तिची पूजा करत. घरातल्या नोकरचाकरात त्याला अधिक प्रिय होता त्याचा टांगेवाला. त्याच्याकडे तो मित्र आणि दैवत म्हणूनच पाहत असे. त्या मोतद्दारचे ते दिमाखदार पागोटे, त्याचा तो किनखापी, भरजरी गणवेश आणि त्याच्या हातातील तो रुबाबदार चाबूक याची त्याला पडलेली बालसुलभ भुरळ वेगळीच होती. लहान मुलांच्या कल्पनाविलासात अशा एखाद्या व्यक्तीला फार मोठे स्थान असते. त्यात ते पूर्णपणे रमलेली असतात. छोटा नरेन त्याला अपवाद नव्हता.
फिरस्त्या साधू-संन्याशांचे नरेनला असलेले आकर्षण अद्भुत होते. तसा एखादा साधू वा पवित्र व्यक्ती दत्तांच्या राजवाड्यासारख्या निवासाच्या दारात अली रे आली की नरेश आनंदित होऊन हर्षभरे तिच्याकडे धाव घ्यायचा. एके दिवशी असाच एक साधू आला- ‘ॐ भिक्षांदेहि’... पुकारत! आता त्याला द्यायला नरेनजवळ काय असणार? फक्त कमरेला गुंडाळलेले नक्षीदार नेसू! तसे म्हटले तर त्याच्या ते धोतर आवडीची वस्तू होती कारण ते धोतर म्हणजे त्याची बाल्यावस्था संपल्याची खूणच होती शिवाय हे त्याचे पहिलेवहिले नेसू होते आणि तरीही त्याने मागचापुढचा कसलाही विचार न करता ते तात्काळ फेडून त्या साधूच्या हातावर ठेवलेदेखील. साधूला काय! त्याने ते गुंडाळलेले डोक्याला, नरेनला तोंडभर आशीर्वाद दिला व गेला निघून! नरेनच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना... आपले वडील साधू बनून घरातून निघून गेल्याची आठवण चांगलीच होती. ते स्वत: जरी उदार असले, साधूसंतांचा भरपूर आदर व आतिथ्य करणारे असले तरी त्या घटनेनंतर त्यांनी नरेनवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तेथून पुढे एखादा ‘साधू’ घरात आला तर नरेनची रवानगी थेट कडीकुलूपात. तो साधू निघून गेल्यानंतरच सुटका पण त्यामुळे नरेश बिलकुल विचलित होत नव्हता. दारात आलेल्या भिक्षुकाकडे खोलीच्या खिडकीतून हाताला लागेल ती वस्तू त्याच्या दिशेने फेकायचा.
मातेची मांडी हीच कोणत्याही बालकाची पहिलीवहिली शाळा. आपल्या नवसाने झालेल्या पुत्राला उत्तम शिक्षण देण्यास माता भुवनेश्वरीदेवी उत्सुकच होत्या. मातेच्या मुखातून नरेनच्या कानावर हिंदूंच्या देव-देवतांच्या वैभवशाली कहाण्या तर पडल्याच पण त्याचबरोबर त्याला भारतीय ऋषिमुनींची आणि त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचीही माहिती मिळाली त्याशिवाय भारतीय महाकाव्यातील कथाही त्याने भरपूर ऐकल्या. रोज दुपारी माताजी त्याला रामायण व महाभारतातील मजकूर वाचून दाखवत. नरेनचे त्या वाचनाकडे अगदी बारीक, सावध व एकचित्त लक्ष असे. आपल्या मातोश्रींच्या आईकडूनही त्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आजीच्या मातोश्री वैष्णवीपंथी असल्यामुळे त्यांना भगवद्गीता व वैष्णवी लोकगीते व कथा यांची शिकवण मिळालेली होती. दत्त परिवाराच्या प्रसादात अनेक फिरत्या गायकांची झुंबड उडत असे. नरेनच्या मातोश्री त्यांचे जाणीवपूर्वक आगत-स्वागत करत, त्यांच्याकडून भक्तिगीते व गीतमय पुराणकथा गाऊन घेत. त्या मागचा उद्देश एकच होता, बालवयातच नरेनला भक्तिमार्गाची गोडी लागावी. पेशाने ती माणसे भिक्षेकरी असली तरी त्यांच्या गायनातील तन्मयता, सौंदर्य प्रभावशाली होते. त्यात श्रोत्यांच्या धार्मिक भावना उद्दीपित करण्याची ताकछ होती परिणामी त्या भावना अधिक दृढ होत असतं.
नरेनच्या आईनेच त्याला बंगाली मुळाक्षरांची ओळख करून दिली. त्याला जोडूनच प्यारीचरण सरकार यांचे ‘द फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ ही त्याच्या हातात ठेवले. जगातील नानाविध, चित्रविचित्र परिस्थितीशी झगडताना आपले नैतिक आचारण कसे शुद्ध ठेवावे आणि प्रसंगी त्यातून निभावून जाण्यासाठी ईश्वराच्या चरणीच कसा आधार शोधावा- माणसाच्या आयुष्यातला सर्वांत खात्रीचा तारणहार परमेश्वरच असतो, हे नरेन आपल्या आईकडूनच शिकला. त्या त्याला नेहमी म्हणायच्या, बाळ, संपूर्ण आयुष्यात सतत निष्कलंक, निर्मळ राहा, आपला स्वत:चा सन्मान, प्रतिष्ठा यांचे जीवापाड रक्षण कर आणि त्याचबरोबर दुसऱ्याची मानहानी करू नको, मर्यादा ओलांडू नको, चित्तवृत्ती स्थिर कशी राहील याची दक्षता घे. हां, मात्र गरज पडेल तेव्हा छातीवर दगड ठेवायलाही हयगय करू नकोस...!
आपल्या संपूर्ण आयुष्यात नरेंद्रनाथांनी आईवर अंत:करणपूर्वक प्रेम केले. ते म्हणत, ‘जो कोणी आपल्या आईची अक्षरश: पूजा करत नाही तो कदापिही महान बनू शकणार नाही...’त्यांच्या झंझावाती आयुष्यात आलेल्या अेनक प्रसंगी त्यांनी मोठ्या अभिमानाने बोलून दाखवलेले आहे. -‘माझ्या ज्ञानाला लाभलेल्या फुलोऱ्याचे, त्याला आलेल्या बहराचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. मी तिचा परमऋणी आहे...!’
दररोज रात्री निद्रावश होण्यापूर्वी नरेनला एकच विलक्षण दृश्य दिसत होते. झोपण्यासाठी बिछान्यावर पडल्यानंतर डोळे मिटायचा अवकाश ते दृश्य आकार घ्यायचे. ‘त्याच्या भुवयांच्या मध्यभागी एक विलक्षरण शोभायमान असा प्रकाशाचा ठिपका उमटे. हळूहळू त्याचे रंग बदलत, तो पसरत पसरत सर्व शरीर व्यापून टाके. संपूर्ण शरीर त्या विस्फुटित प्रकाशात न्हाऊन निघे. जिकडे-तिकडे स्फटिकशुभ्र तेजाचा पूर लोटे. त्याचे मन या चमत्कारात गढून जात असतानाच त्याचे शरीर निद्राधीन होई. विशेष म्हणजे प्रतिदिनी त्या प्रकाराची पुनरावृत्ती होत होत. त्याने विचार केला की, असा एखादा चमत्कार म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक स्थितीच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ती येत असावी आणि म्हणून त्याने त्याची वाच्यता बरेच दिवस कोणाकडेही केली नाही. मात्र, एकदा त्याने आपल्या शाळासोबत्याला विचारले, ‘काय रे, जेव्हा तुला झोप येते तेव्हा तुझ्या भुवयांच्या मध्यभागात तुला कसला तरी प्रकाश दिसतो का?’ मित्राने उत्तर दिले- ‘नाही बाबा! तसले काही नाही दिसत!’ नरेनने त्याला सांगितले, ‘मला तसा प्रकाश दररोज दिसतो. तू देखील आठवून बघ. प्रयत्न कर तसा. बिछान्यावर पडल्या पडल्या झोपून जाऊ नकोस. काही क्षण तरी अगदी सावध रहा. पूर्ण जागा राहा. पूर्ण जागा राहा. तुलाही तो दिसेल. नक्कीच!’
पुढे नंतरच्या काळात नेमका तोच प्रश्न खुद्द नरेनला विचारणारा कोणीतरी त्याला भेटणार होता. ‘नरेन, माझ्या लेकरा, जेव्हा तू निद्रानाश होऊ पाहतोस तेवहा तुला प्रकाशकिरण दिसतात का रे?’ तो प्रश्नकर्ता होता त्याचे आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण! आयुष्याच्या अंतापर्यंत तो साक्षात्कार नरेनच्या सोबतीला राहिला. जरी आयुष्याच्या उत्तरार्धात वारंवार तसे घडत नसले किंवा त्याची तीव्रता लक्षणीय नसली तरी ती सोबत चालूच राहिली. अशा तर्हेची एखादी घटना हे नक्कीच सांगून जाते की, संबंधित व्यक्तीला एक महान आध्यात्मिक वारसा लाभलेला असून तिच्या आत्म्याने स्वत:ला ईश्वराच्या चिंतानात खोल गाडून घेण्याची शिकवण इतकी उत्तम आत्मसात केलेली होती की, त्याची ध्यानावस्था म्हणजे एक उत्स्फूर्त सहाजावस्थाच मानावी. ...Read more