TARUN BHARAT 2-1-2011आदिपर्व या ऐतिहासिक कादंबरीने धुक्यात लपेटलेल्या मध्ययुगीन कालखंडाला प्रकाशात आणले आहे. छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रपितामह मालोजीराजे भोसले यांचा कालखंड १५७४ ते सप्टेंबर १६०६. म्हणजे बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतरचा. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशही, इमादशाही,बरीदशाही यांच्यातल्या लढाया व सत्तासंघर्ष यांचा कालखंड. मराठा सरदार व शिलेदार यांच्यात महाराष्ट्रात हिंदुपद बादशाही स्थापन करता येण्याच्या शक्यतेचा विचारही कधी मनात न येण्याचा कालखंड. परकीय सत्तेची इमानाने चाकरी करण्याचा, वतनासाठी एकमेकांशी झुंजण्याचा आणि महाराष्ट्राच्या, भल्याचा विचार मनात नसण्याचा हा कालखंड होता.
त्यातील एक मोठे राज्य म्हणजे निजामशाही. अहमदनगर ही त्याची राजधानी वऱ्हाड, बीड, पुणे, नाशिक हे चार प्रांत, कोकणातील चौल व रेवदंडा आणि कल्याण हा भूभाग निजामशाहीत मोडत असे.
वेरूळला भोसले घराणे राहायचे. घृष्णेश्वर हे भोसल्यांचे दैवत. मालकर्ण भोसले हे मूळ पुरुष. त्यांना मालोजी व विठोजी असे दोन मुलगे. दोन वर्षांच्या अंतराचे. मालोजी उर्फ बाबाजी तीन वर्षांचे असताना त्यांचे वडील मालकर्ण एका जुझात मारले गेले तेव्हा विठोजी जेमतेम एक वर्षांचा होता. मालकर्ण यांच्याकडे वेरूळगाव वावी, मुंगी, बनसेंद्रे, देऊळगाव, जिंती, हिंगणी, बेरडी यांचे निजामशाही वतन होते. मालकर्ण वारल्यावर शहाने हा सरंजाम जप्त केला. पदरात दोन मुले असलेल्या आऊसाहेबांकडे खासगीतला काही भाग, वाड्या, मोकादम्या एवढे उरले. त्यानी त्या आधारावर पतिमागे घर सांभाळले. मुलांना मोठे केले. बाबाजींच्या पत्नीचे नाव रेखाऊ. मालोजी वसुलीचे काम बघत. तर धाकटा भाऊ विठोजी फडाचे जमाखर्चाचे काम करायचा. मालोजी सोळा वर्षांचे असताना आजीकडे हट्ट धरून त्यांनी शिलेदार बनण्याचा विचार स्पष्ट केला. त्यावेळी निजामशाहीत सिंदखेडचे जाधवराव, मुधोळचे घोरपडे, म्हसवडचे माने, मलवडीचे घाटगे, फलटणचे वणगोजी राजे नाईक निंबाळकर असे नामवंत सरदार होते. फलटणचे वणगोजीराव, (मूळ नाव अनंगपाळ) यांचा दरारा मोठा होता. राव वणंगपाळ बारा वजिरांचा काळ, असा त्यांचा लौकिक होता. निजामशाहीत त्यांचा दरारा होता. बाबाजींनी त्यांच्या कानांवर मुलाचा हट्ट घातला.
मालोजी व विठोजी लवकरच वणगोजीराजांकडे शिलेदारीत दाखल झाले. कोल्हापूर मुक्कामी मालोजींनी अचानक घाला घालू पाहाणा-या आदिलशाही तुकडीला पेचात पकडून प्रसंग निभावून नेला. निजामशहीवरचे संकट समूळ नष्ट वेâले. वणगोजी राजेंनी निजामशाहीकडे मालोजी, विठोजींची शिफारस केली. त्यांच्या आजोबांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना पुन्हा देण्यात यावा, असा तोंडी अर्ज केला. शहाने भोसलेबंधूंना, प्रत्येकी १५०० शिलेदारांची सरदारी, राजे ही किताबत शिवनेरी किल्ला व पुण्याचे वतन तर दिलेच आणि आजोबांच्या जप्त केलेला सरंजामही दिला. इथून भोसलेबंधुंच्या कर्तबगारीला वाव मिळत गेला. योजकता, झुंजाची आखणी, सैन्याची व्यूहरचना, शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेणे, नजरबाजांची योजना करणे, रयतेवर प्रेम करणे, परोपकारी वृत्ती, देव धर्म, संतमहंत यांच्यापुढे लीन होणे यामुळे मालोजी सर्वांना प्रिय होत गेले. बघता बघता त्यांचे नाव मोेठे झाले. त्यातच त्यांचे लग्न वणगोजी राजेंची कन्या दीपा हिच्याशी झाले. हा संबंध उभयपक्षी हिताचा झाला. निजामशाही नेकजात मराठा सरदारांवर अवलंबून होती. त्यात आता मालोजी राजे भोसले यांची गणना होऊ लागली. मालोजीराजे यांनी नगरचे सावकार शेषाप्पा यांचा विश्वास संपादन केला तर निजामशाहीतील महत्त्वाची व्यक्ती व दफ्तरातील जबाबदार व एकूणच माहीतगार अशी महत्त्वाची व्यक्ती निळोपंत यांच्याशीही संबंध वाढवले. त्यामुळे निजामशाहीत कोठे काय चालले आहे. याची त्यांना खबर मिळायची.
हा काळ अंदाधुंदीचा होता. मनगटशाहीचा होता. दगाबाजी, फंदाफितुरीचा होता. निजामशाहीत खुद्द शहाला आणि त्याच्या सरदारांनी सदैव जागृत राहावे लागे. त्यात निजामशाहीत खुद्द वजिराने बगावतीचे वर्तन केले. पंधराव्या शतकात भारतात पोर्तुगीजांचे पाऊल पडले. दीवदमण ते गोवा हा सागरी भाग निजामशाहीचा. चौल, रेवदंडा, कल्याण (खाडीमार्गे) इथे पोर्तुगीजांचा सतत त्रास असे. (त्याबरोबर जंजि-याच्या शिद्दीचा त्रास तर कानीकपाळी ठेवलेलाच. त्यावेळी स्त्रियांच्या तोंडी नेहमी म्हटले जायचे, ‘आजबाई सारवा । उद्या बाई तारवा’ म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरी सुखरुप आहात. हौस म्हणून घर, अंगण सारवा. त्यावर रांगोळी रेखा. पण शिद्दीचे सैनिक कधी छापा टाकतील आणि पुरुषांची कत्तल करून, लुटालूट करून, घरांना आगी लावून बायकांना फरपटत आपल्या गलबतांकडे नेतील याचा काही नेम नाही. आदिलशहाचा एक सरदार फितूर होऊन निजामशहाला ३०० हत्तींची भेट आणि शेकडो होन घेऊन शहाकडे त्याने आसरा मागितला. शहाने त्याचा मोठा गौरव केला. मनसब दिली. शाही किताब दिला. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेटवून दिले. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेâवूâन दिले. आदिलशहाने चिडून नगरकडे फौजा वळवा, यावर तह करताना निजामशहांना नवीन बांधलेला किल्ला पाडण्याची अट आदिलशहाने घातली.
शाहजादा मुराद दक्षिणेत चार वर्षे निजामशाही बुडवण्यासाठी मुक्काम ठोकून राहिला. तो अयशस्वी झाला. चांदबिबीने बालराजाच्या नावाने उत्तम कारभार केला. पण अंतर्गत बंडाळी व असहकार यामुळे ती अयशस्वी ठरली. पुढे तर तिची हत्या झाली. या सगळ्यांमुळे आणि त्यात सतत दोन वर्षे दुष्काळ पडल्याचे केवळ जगण्यासाठी वीस हजार माणसे विजापूरला गेली. मालोजीराजे हताश झाले. ते अतिशय दयावत्सल होते. श्री गोंद्याजवळ वाड्यासाठी पाया खोदताना त्यांना गुप्तधनाचे हंडे मिळाले. या धनातून त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचे नूतनीकरण केले. सूफी साधू शेख महंमद बाबांना मठ बांधून दिला. शिखर शिंगणापूर इथे तळे बांधले. ओसाड गावे पुन्हा नांदती केली. शेतीला उत्तेजन दिले. डॉ. प्रमिला जरग यांनी ऐतिहासिक ढंगाची भाषा निवेदनात वापरली आहे. करीणा, बितपशील, सुक्रांना नमाज, निहाल होणे, सुलतानढवा, तजुबी, गौर, बगावत, सर्पâराजी, शुक्रगुजार, फिकरमं, हिफाजत, वल्द, रिश्ता, पैगाम, फरमानवाडी, खद्याल, तरक्की, अमन, इत्तेफाक असे उर्दू अरबी फारसी शब्द लोकांच्या तोंडी रूळून गेले होते. शिया, सुनी, मेहदवी यांच्यात वैर धुमसायचे. खंडेनवमी, नवरात्र, दसरा असे सण साजरे होत. फराह, बाग, ई रहुजा हाश्त बहिश्त या बागा नगरमध्ये होत्या. भिंगार खेड्याजवळ कुत्रे कोल्ह्यांचा पाठलाग करीत असता चिडलेल्या कोल्ह्याने कुत्र्यांवर चाल केलेली शहाने पाहिली तेव्हा ही जागा शकुनाची समजूत भिंगारला अहमदनगर वसवले. प्रसिद्ध मुलुख मैदान तोफ रुमीखानने घडवली. कोल्हापूरला तेव्हा २१ तळी होती. युवराज मुराद विजयी झाला तर दिल्लीला त्याचे वजन वाढेल म्हणून त्याचे सरदार वेढा अंगचोरपणे लढतात, अशी आवश्यक माहिती लेखिका देते. डॉक्टर, प्रमिला जरग पंधराव्या आणि सोळाव्या शतकाचे शब्दचित्र काढतात. या कादंबरीतला लेखिकेने कन्सिव्ह केलेला तिला स्पुâरलेला एक प्रसंग मला कळसाध्याय वाटतो. मालोजीराजे यांचे लग्न दीपाशी झाले तेव्हा ती केवळ आठ वर्षाची होती. वेरूळला सासरी आली होती. आजेसासूबाई पुजेला बसल्या होत्या आणि ही उमा पूर्वेकडून भिंतीवर पडणारे, नाचणारे तेजाचे पट्टे हातात धरू पाहात होती.
तिचा पती मालोजी, त्याचे आजोबा मालकर्ण जुझात लढता लढता मारले गेले तेव्हा मालोजीचे वडील बाबाजी केवळ तीन वर्षांचे होते. उभा जन्म वैधव्यात करपलेल्या, कर्तव्यकठोर आऊसाहेब मुठीत सूर्याचे तेज पकडू पाहाणाNया नातसुनेला म्हणतात, मुली, आपल्या हातातून तेज निसटते. ते मुठीत पकडता येत नाही. त्या तेजाला प्रपंचात जखडून ठेवता येत नाही...’ आणि पुढे तेच घडते. जुझात मालोजी मारला जातो. उमाच्या मुठीतून तेज निसटते. सरलष्कर उर्फ सर गु-हो ही शाही, अति दुर्मिळ किताबत निजामशहाकडून मिळवलेले मालोजी राजे शहाजी व शरीफजी या बालकांना आणि उमेला पकडून ठेवता आले नाहीत.
मला हा प्रसंग स्वामीच्या शेवटी रमा सती जाते. या प्रसंगाच्या व त्यातील शेवटच्या वाक्याच्या उंचीचा वाटतो. मेहता पब्लिशिंगने राजहंसच्या द्रोहपर्व नंतर लगेचच एक उत्तम ऐतिहासिक कादंबरी पेश केलीय.
...Read more