* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888495
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BAPA CHEMICAL WAS CHEMICAL FACTORY IN THE CENTRAL POPULATED AREA OF MUMBAI. THE CHAIRMAN OF BAPA CHEMICAL IS RASIKBHAI PATEL. POLITICIAN SHIRGOPIKAR AND UNION LEADER JANGI CHACHA TRY TO CAPTURE IT. MAX ENGINEERING FACTORY AT KALWA BELONGS TO SHIRGOPIKAR. SCHOOL CHILDREN OF KALWA MUNICIPAL SCHOOL FAINTED DUE TO POISONOUS GAS LEAK FROM MAX ENGINEERING. DUE TO THIS ROIT OCCURED AT KALWA. PRATAPSINGH MALKAPURKAR, DIRECTOR, INDUSTRIAL SAFETY AND HEALTH (DISH) FIND OUT CAUSES OF GAS LEAK. NAGRAJ DOIJAD, FACTORY INSPECTOR VISITS BAPA CHEMICAL REGARDING ONE WORKER NAMED KRISHNA SURVE. HE WAS DEATHLY ATTACHED BY UNKNOWN PERSON. THE POLICE AND INTELLIGENCE BUREAU (IB) INVESTIGATE ABOUT THIS ATTACK. COL.PRAKASH INVESTIGATES WITH THE HELP OF PRATAPSINGH MALKAPURKAR AND AMITA PATEL INCIDENTS AT BAPA CHEMICALS. IN THE INVESTIGATION COL.PRAKASH MEETS THE FOLLOWERS OF DINE-E-LAHI RELIGION AT PARBHANI. HE COMES TO KNOW THAT FACT OF JEHADIS DECLARATION REGARDING LAND OF BHARAT DECLARED AS DAR-AL-HEARB FROM THE PAKISTANIS WHO SNEAKED IN INDIA BY ILLEGAL MEANS. SHIRGOPIKAR WITHDRAWS THE HIGH COURT PETITION AGAINST BAPA CHEMICALS DUE TO EFFORTS OF PRATAPSINGH MALKAPURKAR. DUE TO THIS DISPUT AROSE BETWEEN SHIRGOPIKAR AND JANGI CHACHA. JANGI CHACHA TRY TO CAPTURE BAPA CHEMICALS WITH THE HELP OF HAMEEDBHAI, A CRIMINAL. HAMEEDBHAI TRY TO KILL PRATAPSINGH. IN THIS MALEE POLICE INSPECTOR KILLS A WORKER OF BAPA CHEMICALS. A RIOT ERUPTS DUE TO THIS. IN THE RIOT CHLORINE GAS LEAK OCCURE. PRATAPSINGH STOPS THE GAS LEAK. MAULANA ASIF, A TERRORIST TRY TO TAKE AWAY PHOSGENE BULLETS OF BAPA CHEMICALS UNDER THE PRESUMPTION OF NECLEAR WEAPONS. COL.PRAKASH FOILS THE ATTEMPT AND KILLS ALL THE TERRIORISTS.
बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असं डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळतं. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, हे जाणून घेण्यासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AGHAT#SURYKANTJADHAV#RAJE#KARNAL#BAPACHEMICAL#MAXENGINEERING#CARBONMONOXIDELEAKAGE#VISHARI VAYU
Customer Reviews
  • Rating Starदैनिक शिवनातीर औरंगाबाद २९ नोव्हेंबर 2017

    बाह्य शक्ती आणि उद्योगविश्व यांच्यातील संघर्षाचं संयत चित्रण कामगार-मालक संघर्ष आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे अनेक प्रश्न हा विषय मराठी साहित्यात फार कमी चर्चिला गेला आहे. ज्या साहित्यकृतींमध्ये हा प्रश्न हाताळला गेला त्यामध्ये व्यवस्थापन आणि कागार यांच्यातील संघर्ष हे मुख्य सूत्र होतं. (एखाद-दुसरा अपवाद असूही शकतो.); परंतु सूर्यकांत जाधव यांनी कामगार-मालक असा संघर्ष न रंगवता बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलचे मालक रसिकभाई पटेल यांची मुलगी अमिता आणि राजे या प्रकरणात जवळ येतात आणि लग्न करायचं ठरवतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असे डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळते. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. राजे आणि कर्नल प्रकाश हे प्रकरण शांतपणे हाताळायचं ठरवतात. दरम्यान, राजकीय पुढारी असलेले मॅक्स इंजिनिअरिंग कंपनीचे मालक शिरगोपीकर आणि युनियन लीडर जंगी यांनी बापा केमिकलच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेली असते, ती केस मागे घेण्याचा निर्णय शिरगोपीकर घेतात आणि जंगी भडकतो. बाहेरच्या कामगारांना आणि युनियनला हाताशी धरून बापाच्या व्यवस्थापनाला पायाशी आणायचा जंगीचा डाव असतो; पर्यावरणाच्या मुद्द्यावरून कारखान्याच्या मालकांना अडचणीत आणायचं आणि वाटेल तेवढे पैसे उकळायचे, हा जंगीचा उद्योग असतो. आताही बापा केमिकलच्या कामगारांना तो कामावर जाण्यापासून रोखू पाहतो आणि रसिकभाई पटेलांना नेस्तनाबूत करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला असतो; पण ऐन वेळेला शिरगोपीकरांची माणसे जंगी आणि त्याच्या माणसांवर हल्ला चढवतात आणि जंगीचं आंदोलन चिरडलं जातं. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, याच्या साद्यंत तपशीलासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे. अशा रीतीने कारखाने, कामगार, कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा या घटकांचं आणि जेहादींसारख्या बाह्य शक्तींमुळे या घटकांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावाचं वास्तव चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. कोणत्याही एका घटकाची बाजू न घेता, आहे ती वस्तुस्थिती समोर आणणे, हे पथ्य लेखकाने पाळल्यामुळे कादंबरी भडक होत नाही. तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरला केवळ कामगारांचे प्रश्न सोडवायचे नसतात, तर अन्यही कामे करावी लागतात, याचंही दिग्दर्शन या कादंबरीतून होतं. फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कामातील बारकावे या कादंबरीमुळे समजतात. राजे, कर्नल प्रकाश यांच्या व्यक्तिरेखा संयतपणे चित्रित केल्यामुळे जगात काही माणसं तरी समतोल आहेत, असा सकारात्मक संदेश या कादंबरीतून मिळतो. शिरगोपीकर या राजकारणी व्यक्तीची व्यक्तिरेखाही नेहमीप्रमाणे काळ्या रंगात न रंगवता त्या व्यक्तिरेखेचीही उजळ बाजू अधोरेखित केली आहे. त्यामुळे ‘आघात’ ही एका संघर्षपूर्ण विषयावरची संयतपणे मांडणी केलेली कादंबरी आहे, असं म्हणायला हरकत नसावी. सुरुवातीला ही कादंबरी कामगार-व्यवस्थापन यांच्यातील संघर्षाची आहे, असं वाटत असताना जेहादींच्या प्रवेशामुळे ती गुप्तहेर कथेच्या वळणाने जाते. कामगार-व्यवस्थापन या पैलूंबरोबरच बाह्यशक्ती हा पैलू त्यात सामील झाल्यामुळे कारखान्यांना बाह्य शक्तींपासून उपद्रव होऊ शकतो, ही बाजूही समोर येते. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. ती वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.