* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171865
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHUBHADA, AN EXTRAORDINARY PERSON, READY TO CATCH THE SKY, COME WHAT MAY. SHE SHOULDERED VARIOUS RESPONSIBILITIES AND FACED MANY PROBLEMS, SEVERE LIKE THE SCORCHING HEAT OF THE SUN. YET, SHE EMERGED AS A CAPABLE PERSON. SHE CREATED HAPPINESS, BLISS AND CONTENT ALL AROUND HER WITH EXTREME DEDICATION. HER STRONG WILL AND CONTINUOUS STRUGGLE HELPED ACHIEVE BOUNTIFUL OF CHEERFULNESS, JOY AND GRATIFICATION FOR THE SATHE FAMILY. HER QUALITIES WERE SHINING LIKE NEVER BEFORE, ALL THANKS TO HER NONSTOP ENDURANCE. SHE WAS SEEN AS THE STRONG FOUNDATION AND ALSO THE STURDY PILLAR OF HER FAMILY, BALANCING THE SKY, WHILE SPREADING PROSPERITY, COMFORT AND SATISFACTION. THIS WAS ALL THAT SHE NEEDED AND WAS LOOKING FORWARD TO. HER LIFE-AIM WAS THUS ACHIEVED ONCE FOR ALL.
शुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या प्रखर सूर्यासारखी अनेक दाहक संकटे तिच्यासमोर एकापाठोपाठ एक उभी ठाकली होती; पण त्या सर्व संकटांवर मात करून तिनं आपल्या कर्तृत्वानं सुखाचं, कल्याणाचं, आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं. संकटांचं आकाश झेलून तिनं साठे परिवाराला सुखाची, समाधानाची सावली दिली होती. तिच्यात असलेल्या प्रत्येक गुणाचा कस लावून, कर्तृत्वाच्या कसोटीवर खरी उतरणारी शुभदा आता सर्वांना दिसणार होती सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आकाश झेलताना! हेच तिच्या आयुष्याचं सार्थक होतं. हीच इतिकर्तव्यता होती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आकाश झेलताना#मंजुश्री गोखले# #AKASH ZELTANA#MANJUSHREE GOKHALE#
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स १७-११-१९

    एका समर्थ स्त्रीची कहाणी... मंजुश्री गोखले हे नाव एकल्याबरोबरच त्यांच्या विविध स्त्री-पुरुष संतांवरच्या कादंबऱ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अतिशय रसाळ आणि ओघवती शैली यामुळे त्यांच्या या कादंबऱ्या वाचकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. या पार्श्वभूमीवर ्यांची नुकतीच ‘आकाश झेलताना’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. मात्र ही कादंबरी संतावरची नाही, ती शुभदा या सर्वसामान्य कुटुंबातील, पण एका समर्थ नायिकेची कथा आहे. ज्याला जग सुंदर-सुखी करायचंय तो आपल्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो, शुभदा या परंपरेतील आहे. जगताना येणाऱ्या संकटाना, आव्हानांना ती समर्थपणे सामोरी जाते. मात्र या संकटांची झळ ती आपल्या अवतीभोवतीच्या माणसांपर्यंत पोचू देत नाही, त्यांच्यापर्यंत ती सुखाची शीतल चांदणच पसरवते. जणू काही तीच तिची इतिकर्तव्यता होती. मराठी साहित्याला एक समर्थ नायिका दिल्याबद्दल लेखिकेचं कौतुकच करायला हवं. - रसिक भोळे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    घराची घडी बसविणाऱ्या स्त्रीची कर्तृत्वगाथा... आज स्त्रीच्या शिक्षणाला, महत्त्वाकांक्षांना आभाळ लाभलं आहे. भरपूर पैसा ती कमावत आहे. पण कुटुंब या संस्थेविषयी ती किती जागरूक आहे, हा कळीचा मुद्दा ठरावा अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरमंजुश्री गोखले यांनी एक गरीब घरातली. फारशी न शिकलेली बेताचं रूप असलेली नायिका (शुभदा) वाचकांच्या भेटीला आणली आहे. त्यांच्या ‘आकाश झेलताना’ या कादंबरीतून, शुभदाचं कुटुंबाविषयीचं प्रेम आणि तिचं कर्तृत्व या कादंबरीतून उलगडत जातं. शुभंदा एक सामान्य, गरीब घरातली, एका पायाचं किंचित अधू असलेली मुलगी, वय तिशीच्या आसपास, कोणतीच बाजू समर्थ नसल्यानं लग्न ठरत नसलेली. तिला कोकणातील एका बिजवराचे स्थळ येते. तिथून तिला होकार येतो आणि ती लग्न करते. तिचा नवरा डॉ. विद्याधर याचे मोठे कुटुंब. आई-वडील एक विधवा आत्या, दोन भाऊ, दोन बहिणी, पहिल्या विवाहाची दोन मुले, सगळे घर विस्कटलेले. एक भाऊ चित्रपटाच्या वेडाने मुंबईला पळून जातो. एका बारबालेच्या प्रेमात पडतो. गुंडापासून पळून तिला घेऊन घरी येतो. दुसरा भाऊ गावातल्या एका मुस्लीम मुलीच्या प्रेमात. शुभदा त्या दोन्ही भावांचे आयुष्य सुधारते. एक बहीण २७ वर्षांची. देखणी म्हणून प्रथम सगळी स्थळं नाकारून आणि आता लग्न होत नाही म्हणून कडवट बनलेली. धाकटी बहीण एका बांधकाम मजुराकडून फसवली जाणार असते. शुभदा तिला वाचवते. दोघींचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते. हे करत असताना पर्यटकांसाठी भक्त निवासाची सोय करते. व्यवसाय वाढवते. तीन भक्त निवास बांधते. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पर्यटक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळवते. सगळं घर सावरते. हे संकटांचं, अडचणीचं आकाश बुद्धीच्या जोरावर, आपल्या समर्थ खांद्यावर झेलते. कर्तव्यदक्ष पत्नी, वत्सल आई, प्रेमळ वहिनी अशी शुभदाची लोभस रूपं या कादंबरीतून समोर येतात. थर अशी ही शुभदाच्या कर्तृत्वाची गाथा आहे. ही कादंबरी वाचकांना योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, जोत्स्ना देवधर इ. कौटुंबिक आणि नायिकाप्रधान कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकांच्या काळात नेऊन सोडते. मांगल्य, शुचिता आणि सदाचार या आज दुर्मिळ झालेल्या गुणांचं दर्शन ही कादंबरी घडवते. कर्तृत्वाला प्रेमाची, समर्पणाची जोड असेल, तर त्या कर्तृत्वाला अर्थ लाभतो तसेच कर्तृत्वाला अपंगत्व किंवा सुमार रूप कुंपण घालू शकत नाही. असा संदेश देणारी ही कादंबरी आहे. मंजुश्री गोखले यांच्या ‘तुक्याची आवली’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘ओंकाराची रेख जना’, ‘ज्ञानसूर्याची सावली’, ‘हेचि दान देगा’ अशा संतचरित्रपर कादंबऱ्यांना पुरस्कार लाभले आहेत. तसेच वाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या ओघवत्या भाषेतील या कादंबरीलाही वाचकांचा असाच प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more