* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357200486
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2023
  • Weight : 275.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS AUTOBIOGRAPHY OF DR. DEVIDAS TARU IS A SERIOUS STRUGGLE TO GET OUT OF THE DISPARITY OF THE SYSTEM BY CREATING ONESELF. DEVIDAS`S COURAGEOUS STRUGGLE TO BREAK OUT OF A SUFFOCATING AND CRIPPLING SYSTEM IS NOTHING SHORT OF AWE-INSPIRING.THE POVERTY, THE CRIMINAL TENDENCIES INCULCATED IN IT AT AN EARLY AGE, A CHILD REALIZES THE IMPORTANCE OF EDUCATION ONE DAY AND NEVER LOOKS BACK. TARU`S JOURNEY IS AN INSPIRATION TO EVERY CHILD WHO STRIVES TO BUILD THEMSELVES IN THE FACE OF ADVERSITY.
डॉ देविदास तारू यांचं हे स्वकथन म्हणजे स्वत:ला घडवत घडवत व्यवस्थेच्या विषमतेतून बाहेर पडण्यासाठी केलेली एक गंभीर लढाईच आहे. श्वास कोंडून ठेवणार्‍या आणि अपंग करणार्‍या व्यवस्थेतून बाहेर पडून देविदासनं एका मोठ्या हिमतीनं केलेला संघर्ष केवळ अचंबित करणारा आहे. घरची गरिबी, त्यातून लहानपणीच बळावलेली गुन्हेगारी प्रवृत्ती, अशा वातावरणात एक दिवस साक्षात्कार झाल्याप्रमाणे एका मुलाला शिक्षणाचं महत्त्व कळतं आणि नंतर तो मागे वळून पाहत नाही. तारू यांचा हा प्रवास प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत स्वतःला घडवू पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #देविदासतारू #आतामव्हकाय #आत्मकथन #अनुवाद #क्लासिक #इतिहास #धार्मिक #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #AATAMHAVKAAY #ASHWINSANGHI #SANKETLAD #BHARATSERIES #FICTION #TRANSLATION
Customer Reviews
  • Rating StarMehatre Rushikesh

    It`s not just a book. It`s a truth of life that everyone faces in any point of their journey. Every student should read and learn many things from the incidents given in this book. 300 INR, its worth it. 👍

  • Rating StarMeet nagapurkar

    This is the best book for every child and adults for achieving success in bad and poverty situation This story is sach a inspiring

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more