THE REALITY OF THE POST-NINETY’S GLOBAL CHANGES - THE DEATH KNELL FOR HUMANITY IN THE VILLAGE - IS PRESENTED IN A CLEAR AND CONCISE MANNER THROUGH THE STORIES IN THIS BOOK. THE PERCEPTION OF AGRICULTURE, SOIL, RELATIONSHIPS, ETHICS, CULTURE, AUTHENTIC RURAL LIFE - THE MAZE OF MONEY, CULTURE, CIRCUMSTANCES - SOME GET STUCK AND SOME GET OUT - TOUCHING STORIES ABOUT THE FEELINGS OF COUNTLESS `INDIVIDUALS` THAT HAVE BEEN LIVING THEIR LIVES IN STRUGGLE; A GENERATION THAT HAS LOST THE ETHICAL PATH DUE TO THEIR GREED FOR WEALTH AND GONE ASTRAY RUINING THE FAMILY NAME- THE UPS AND DOWNS OF FEELINGS - THE REALITY OF LIFE THAT STRIKES WHEN HUNGER OVERPOWERS SELF-RESPECT - NOW THE QUESTION IS, IS ALL THIS HAPPENING ONLY IN THE CITY? NO, IT IS HAPPENING IN VILLAGES EXPERIENCING WINDS OF CHANGE INFLUENCED BY CITIES. A VILLAGE THAT IS MOVING TOWARDS URBANIZATION, A VILLAGE THAT HAS INHERITED THE LEGACY OF THE TWELVE BALUTEDARS - `ABIRMATI..!` IS THE EMOTIONAL STORY OF THOSE WHO HAVE EXPERIENCED HOW RELATIONS ARE ESTRANGED DUE TO LACK OF AFFECTION.
नव्वदीनंतरचे जागतिक बदल - गावातील माणुसकीला आलेली मरणकळा - याचं वास्तव दर्शन या पुस्तकातील सकस कथांमधून नेटकेपणाने मांडलेले आहे. शेती, माती, नाती, नीती, संस्कृती, अस्सल ग्रामीण जीवनाच्या जाणिवा - पैसा, संस्कार, परिस्थिती यांचा भुलभुलैया – कोणी अडकतो तर कोणी सुटतो - आयुष्यभर कणाकणाने जीवन जाळत आलेल्या असंख्य ‘मीं’च्या भावभावनांच्या हळव्या कथा – धनाच्या हव्यासापोटी सत् मार्ग हरवून गैर मार्गाला जात घरादाराला वेशीवर टांगणारी पिढी - भावनांचे चढ-उतार – स्वाभिमानापुढे पोटातील उसळलेल्या भुकेने दाखवलेले वास्तव - आता प्रश्न हा की, हे सगळं शहरात होतंय का? तर नाही, शहराची व बदलाची हवा लागलेल्या गावागावात घडतंय... गावपण संपून शहरीकरणाकडे वाटचाल करणारं एक गाव, बारा बलुतेदारांचा वारसा लाभलेलं एक गाव – आपलेपणा विसरून परकं होत जाताना ज्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं त्यांच्या भावविश्वाची कहाणी `अबीरमाती..!’