* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INDOMITABLE SPIRIT
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788190734448
  • Edition : 13
  • Publishing Year : OCTOBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SPEECH
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK IS A COLLECTION OF THE SPEECHES AND DISCUSSIONS BY DR. A.P.J ABDUL KALAM AT DIFFERENT FUNCTIONS AND PROGRAMMES. THEY ALL REVEAL THE BRIGHT IMAGE OF HIS JOURNEY FROM THE COAST RAMESHWAR TO THE RASHTRAPATI BHAVAN. THIS BOOK REFLECTS HIS VISION TOWARDS LIFE AND THE EPITOME OF HIS CONTEMPLATION. THIS BOOK PRESENTS KALAM AS A VISIONARY LEADER AND A DETERMINED IDOL WHO SEES INDIA AS A DEVELOPED COUNTRY. THIS IS AN INTERJECTION OF A PATRIOT, A TRUE KNOWLEDGE SEEKER, A PUREST MIND AND A WORTHY PERSON. WE COME ACROSS KALAM IN DIFFERENT ROLES; THAT OF A THINKER, A SCIENTIST, A TEACHER AND LAST BUT NOT THE LEAST, THE PRESIDENT. EACH OF THESE ROLES REVEALS DIFFERENT ASPECTS OF HIS PERSONALITY. EACH HAS MANY DIMENSIONS OF GUIDING AND INSPIRING THOUGHTS. YOUNG OR OLD, EACH MIND WILL BE AWAKENED BY THIS TREASURE.
‘अदम्य जिद्द’ हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. ‘अदम्य जिद्द’ हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यपे्रमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार! अनेक घटना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यांतून त्यांच्या व्यक्तित्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे.
आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे २००८ सालचा `उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती` पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#INDOMITABLE SPIRIT#A. P. J. ABDUL KALAM #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADAMYAJIDDA #INDOMITABLESPIRIT #अदम्यजिद्द #SPEECHTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #A.P.J. ABDUL KALAM #ए.पी.जे.अब्दुलकलाम #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating StarShobha Patil

    मला आवडले हे पुस्तक ऐक प्रेरणादायी ग्रंथ अवश्य वाचा व भेट द्या.

  • Rating Star DAINIK PUDHARI 14-12-2008

    केरळमधल्या दूरवरच्या भागातल्या लवलिगेन नावाच्या तरुणाचं पत्र मला आलं होतं. हा तरु विज्ञान पदवीधर होऊ शकला नव्हता. त्यानं पत्रात लिहिलं होतं की, मी नवा गणिती सिध्दांत शोधला आहे आणि त्या संदर्भात मला तुम्हाला भेटायचं आहे. त्या पत्रातून मला त्या तरुणाचीतळमळ जाणवली. मी विचार केला की, आपली तज्ज्ञ टिम त्याच्या कार्याचा अभ्यास करून त्याला योग्य प्रकारच्या संशोधकांकडे पाठवू शकेल. म्हणून मी त्याला काही दिवसांसाठी दिल्लीला बोलावून घेतले. मी त्याचं काम पाहिलं तेव्हा थक्कच झालो. त्याचे निष्कर्ष काहीअंशी रामानुजनच्या नंबर थिअरीतील समीकरणांजवळ पोहोचले होते; पण या मुलाला त्याची जराही कल्पना नव्हती. त्यानं काही शोधून काढलं होतं, त्यामध्ये काही नव्या मुद्यांची भर घातली होती आणि त्यानं काढलेला निष्कर्षही नवा होता. गणित क्षेत्रातील बहुतेकांची कर्तबगारी निसर्गाचे सुंदर पैलू शोधण्याच्या इच्छेतून निर्माण झालेली दिसते. तारकांनी नटलेल्या नभांगणानं खगोल शास्त्रज्ञांना नेहमीच आकर्षित केले आहे. त्यामध्ये आणखी योगदान देणारा घटक म्हणजे आकृतीबंध (patterns) शोधण्याची उपजत वृत्ती या घटकाची त्यामध्ये भर पडत असावी असं दिसतं. मग हे आकृतीबंध गणिती अनुक्रम वा शृंखला असले तरी लवलिगेन सध्या `पॉवर सिक्वेन्सेस व सिरीज` सारखं या रोमांचक विषयात संशोधन करतोय, ही विशेष नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. त्यावेळी मला वाटलं की, याला गणिताच्या उत्तम शिक्षणाची व उत्तम गणित शिक्षकाचं छत्र लाभण्याची गरज आहे. म्हणजे रामानुजन, प्रो. हार्डी लाभले तसं. आपण अशा तरुण व उत्साहानं रसरसलेल्या मनांना कशाप्रकारे प्रेरणा द्यायची? आपले शिक्षक, मानवतावादी किंवा सामाजिक कार्यकर्ते अशा कळ्यांना हेरून त्यांना फुलवण्यात सहाय्य करू शकतील का? १९४९ सालापासून दरवर्षी शंकर आंतरराष्ट्रीय बालक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मी `शंकर चिल्ड्रन आर्ट व्हॉल्यूम नं५५` चाळत होतो. या खंडात अडुसष्ट देशांतील मुलांनी रेखलेल्या चित्रांचा संग्रह आहे. मुलांनी त्यांच्या चित्रांतून, कविता-कथा, लेख यातून प्रकट केलेली बुद्धिमत्ता स्तिमित करणारी आहे. मोठी माणसं देश व सीमा, जाती व धर्म, श्रीमंत व गरीब, या विषयांवर बोलायला सुरुवात करतात; पण मुलांचं काम मात्र एकसंध असतं, त्याला सीमान्त नसतो. मुलांचं मन सर्वाधिक विशुद्ध रूपात असतं. त्यांची मतभेद करण्याची वृत्ती नसते. जगातील तरुण खचितच मनुष्यजातीची भावी आशा आहेत आणि त्यांच्या हातात पृथ्वी हा ग्रह सुरक्षित राहील, अशी माझी खात्री आहे. मी पाहिलेलं मुलांचं सगळंच काम माझ्या मनात सदैव टवटवीत राहिल, पण त्यातली काही नावं विशेष उल्लेखनीय आहे. मला अँथिया न्यूम्स नावाच्या जर्मन मुलीनं रेखाटलेलं चित्र फार आवडलं होतं. तिच्या चित्रात ग्रामीण भागातील इस्टरचं वातावरण कसं असतं, त्याचे रंग उमटले होते. तिने या चित्रात निवडलेल्या तेजस्वी रंगांनी मला माझं बालपण गेलं, त्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या माझ्या गावाची आठवण करून दिली. चौदा वर्षांच्या भारतीय सुप्रजा चक्रवर्तीनं घरोघरी अनुभवाला येणारी मध्यमवर्गीय नैतिकता व निवडणुकीदरम्यान मतं कशी विकतं घेतली जातात, यावर कथा लिहिली आहे. उमलत्या मनांना बदल हवा आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-9-2009

    ‘अदम्य जिद्द’ हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. ‘अदम्य जद्द’ हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणाNया एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार! अनेक घटाना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more