THE PLOT OF THIS NOVEL IS IN THE SIXTEENTH CENTURY. WHEN THE PORTUGUESE RULED SOME PARTS OF GOA. PIEDAD (ORIGINALLY VASU PAI), A LANDLORD OF RAI VILLAGE, IS SERVING A LONG-DRAWN-OUT SENTENCE IN THE PORTUGUESE`S TOP-SECRET JAIL (BIG HOUSE). HE IS NOT CONFESSING TO THE INQUISITOR TO A CRIME HE DID NOT COMMIT. HE GETS BRUTAL TREATMENT THERE. HIS WIFE PIEDAD (GOMTI) IS DISILLUSIONED BY THE SHOCK OF THE CONVERSION AND THE SEPARATION OF THE CHILDREN, AND ENDS THERE. A REPRESENTATIVE EXAMPLE IS THE FAMILY OF PIEDAD WHO FELL VICTIM TO THE CROOKED POLICY OF THE PORTUGUESE, EITHER CONVERT OR LEAVE THE VILLAGE. THE INTRUSION OF PEOPLE`S MINDS DUE TO CONVERSION, THE BAN ON HINDUS FROM CELEBRATING MARRIAGES, THE LIVES OF VAIDYAS IN BIG HOUSES, SOME OF THEM BEING PUBLICLY BURNT ALIVE (KAYATAN GETS THE SAME PUNISHMENT IN THE END), IS A MOVING NOVEL THAT VIVIDLY PORTRAYS SUCH AN OPPRESSIVE ENVIRONMENT AND THE PEOPLE WHO LIVE IN IT.
या कादंबरीचे कथानक आहे सोळाव्या शतकातले. जेव्हा गोव्यातील काही भागावर पोर्तुगीजांची सत्ता होती. राय गावातील जमीनदार पिएदाद (मूळचा वासू पै) पोर्तुगिजांच्या पूर्णपणे गुप्त असलेल्या तुरुंगात (मोठं घर) एका ओढूनताणून लावलेल्या आरोपाची सजा भोगतोय. इंक्विझिटरसमोर न केलेल्या गुन्ह्याची कबुली तो देत नाहीये. पाशवी वागणूक मिळते त्याला तिथे. त्याची पत्नी पिएदाद (गोमती) धर्मांतराच्या धक्क्याने आणि मुलांच्या वियोगाने भ्रमिष्ट होते आणि त्यातच तिचा अंत होतो. एकतर धर्मांतर करा, नाहीतर गाव सोडून जा, या पोर्तुगीजांच्या कुटिल नीतीला बळी पडलेलं पिएदादचं कुटुंब हे एक प्रातिनिधिक उदाहरण. धर्मांतरामुळे लोकांच्या मनाची होणारी घुसमट, हिंदूंना लग्नसोहळे साजरे करण्यास बंदी, मोठ्या घरातील वैद्यांचं जीवन, त्यातील काहींना जाहीरपणे जिवंत जाळण्याची शिक्षा (कायतानलाही शेवटी तीच शिक्षा मिळते), अशा जुलमी वातावरणाचं आणि त्यात होरपळणार्या माणसांचं ज्वलंत चित्रण करणारी, अंतर्बाह्य हलवून टाकणारी कादंबरी.