THIS IS ACTUALLY A PRACTICAL JOURNAL BASED ON THE VARIOUS PRACTICALS BY THE GRAPE VINERIES DURING THE LAST 25 YEARS OR SO ALL OVER MAHARASHTRA. TILL TODAY, THIS TOPIC OF GRAPE VINERY HAS BEEN DISCUSSED IN MORE THAN 500 SEMINARS. IF ONE REALLY WANTS TO LEARN ABOUT A NEW SUBJECT THEN IT IS BUT OBVIOUS TO TAKE NOTES EVERY DAY, TO ATTEND LECTURES, TO PARTICIPATE IN THE DISCUSSIONS, TO GO THROUGH DIFFERENT STUDY MATERIALS, ETC. BUT WITH THIS BOOK ALL SUCH DIFFICULTIES HAVE BEEN SOLVED. THIS BOOK IS A FULL FORM GUIDE TO ALL YOUR QUESTIONS. IT IS NOT JUST INFORMATIVE, IT GIVES VARIOUS FIGURES AND DIAGRAMS TO ELABORATE EACH AND EVERY POINT, TO MAKE LEARNING MORE EASY AND EFFECTIVE. WE ARE SURE THAT BY STUDYING THIS BOOK PROPERLY YOU CAN SURELY IMPROVE THE YIELD OF GRAPES AND PROSPER.
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या प्रयोगप्रेमी द्राक्ष-बागायतदारांनी व छांदिष्ट प्रयोगवीरांनी गेल्या पंचवीस वर्षांत केलेल्या नानाविध प्रयोगांच्या निष्कर्षांवर आधारलेली अशी ही प्रयोग माहिती-पुस्तिका आहे. आतापर्यंत जवळजवळ चारशे ते पाचशे अभ्यासवर्गांपासून या विषयावर ऊहापोह आणि विस्तार होत आला आहे. एखादा नवा विषय शिकण्यासाठी अशा अभ्यासवर्गांतून बैठक मारून रोज चार-पाच तास विषयाचे विवरण, मर्मग्रहण टाचणे-टिपणे घेत बसावे लागते. मात्र या सुनियोजित ग्रंथातील मजकुराच्या, आकृत्यांच्या, चौकटीच्या, विवरणाच्या आधारे द्राक्ष-लागवडीच्या नव्या पद्धतीविषयी अभ्यासूंना प्रत्यक्ष प्रयोग करता येतील आणि उत्पादनात प्रचंड वाढ घडवून आणता येईल, अशी आम्हांस खात्री वाटते.