Panchdhara Magazine July-Dec.17लेखनातील सातत्य अन् बरोबरीने वाचकप्रियता टिकविणे हे तसे सेपे काम नसते. रेखा बैजल यांच्या लेखनाने मात्र ते साधले आहे. आतापर्यंत कादंबरी, कथा, नाटके, एकांकिका, ललित असे बहुविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत यशस्वीरित्या. अनेक पुरस्कार, मानसन्मान देील त्यांना लाभले आहेत. यातच ज्याला मानाचा शिरपेच म्हणता येईल अशी अज्ञेय ही साधारण शंभर पानी लघुकादंबरी मेहता पब्लिशिंगतर्पेâ प्रसिद्ध झाली आहे. अनेक अर्थांनी हे लेखन आगळेवेगळे आहे.
हे एक अतिसुंदर रुपक आहे. लेखिकेनेच म्हटल्याप्रमाणे एखाद्या सार्वत्रिक, विश्वव्यापी विचार मांडायचा तर रुपक शैली उपयोगाची ठरते. इथे व्यक्ती, काळ, स्थळ त्याच्या मर्यादा ओलांडून लेखनस्वातंत्र्य घेता येते. हा एक मुक्तविहार असतो, अज्ञेयाच्या प्रवासाचा. खरं तर हे लेखन म्हणजे एक सुंदर प्रवासच आहे. कल्प प्रदेशाचा प्रवास. एका वाटाड्यासह अभिमन्यूसह इथे सहा प्रवासी आहेत. त्यातले पाच ज्ञात. एक अज्ञात.
रुपक बंधात वि.स. खांडेकरांनी लिहिलंय फार पूर्वी. गंगाधर गाडगीळांची बिनचेहेNयाची संध्याकाळ पटकन आठवते या संदर्भात. गूढ, अगम्याचा शब्दप्रवास सहज घडविणाNया जी.ए. कुलकर्णी यांच्या रुपक कथाही आठवतात. या शिवाय मला आठवण झाली ती ग्रेस यांच्या कवितेची. कवितेची म्हणू की महाकाव्याची? पण रेखा बैजल यांचे प्रस्तुत लिखाण वाचताना या थोर प्रतिभावंताचे स्मरण व्हावे यातच त्यांच्या लेखनाचा गौरसव आहे, असे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.
खरे तर या लिखाणाला कादंबरी म्हणावे की, आणखीच काही हा देखील साहित्यिक समीक्षेच्या क्षेत्रात वादाचा, चर्चेचा विषय ठरू शकतो. पण आपण त्या वादात पडू या नको..... ज्यांना थोडे ‘हटके’ वाचायची ऊर्मी येते अधूनमधून त्यांनी वाचायलाच हवे असे हे लेखन आहे.
हे एक तत्त्वचिंतक रसाळ प्रवचन आहे. प्रवचनात विंâवा कीर्तनात दाखले असतात. रूप (क), रंग असतात. विचार असतो, अनुभव असतो, विवेचन असते. इथेही हे सारे काही एकवटले आहे. सुंदररित्या परस्परात गुंफले गेले आहे.
अभिमन्यू, चेतन, कांचन, नकुल, धारिणी यांचा हा अज्ञात प्रदेशाचा प्रवास एका वास्तव, न्याय-अन्याय, नीती-अनीती, सत्य-असत्य अन् ऋ़तू अशा तात्त्विक परिभाषांच्या विश्लेषणातून हे लेखन आपल्यापुढे अवकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य रेखाटतं. इंद्रधनुष्याच्या सातही रंगांची नांव आपल्याला माहिती असतात. वर्णपटलातील त्या रंगांचा क्रमदेखील आपल्याला अचंबित करते, संभ्रमित करते.
माणूस अन् निसर्गातले वाढते अंतर, आपल्यातल्या चंगळवादातून अंकुरलेला भोगवाद, नैतिकतेविषयी बदललेल्या संकल्पना, कीर्ती, अहंभाव या मोहजालाची आपल्या शरीराभवतीची पकड, आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवरचे उंचसखल खाचखळगे या या साNया धवलकृष्ण पाश्र्वभूमीवर आयुष्याला रंगीत, सुगंधित करण्याची माणसाची केविलवाणी धडपड सहा प्रवासांची ही प्रवाही कथा प्रत्येक पानावर एक नवा धडा शिकवून जाते.
आपण सारेच स्वप्न बघतो. आपण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कांचनमृगाचा ध्याय घेतो. स्पर्धेच्या जाळ्यात अडकतो. मोहपाशात गुंतत जातो. विवेक-अविवेकाच्या हिंदोळ्यांवर झुलत कधी, वर आकाशात तर कधी धरणीवर असे हिंदकळत राहतो. खरं काय खोटं काय या प्रश्नांची उत्तरं शोध घेऊनही मिळत नाहीत. मग आपले आपणच ठरवत जातो चांगले-वाईट. आपणच आपला न्यायदेखील करत जातो. स्वतःच स्वतःला शाबासकी देऊन टाकतो.
लेखिकेचं हे तिला सर्वाधिक आवडलेलं लिखाण असल्याचं त्यांनी सुरुवातीला म्हटलयं. ते सार्थ आहे. कारण लेखिकेची प्राजंळ, स्फटिकासारखी पारदर्शी अन् प्रतिभेची उत्कट परिसस्पर्श लाभलेली तत्त्वचिंतक भूमिका पानोपानी अनुभवता येते. लेखन अल्पाक्षरी असल्याने हे चिंतन बोजड होत नाही हे महत्त्वाचे. त्यातले ललित्य टिवूâन राहते-शेवटपर्यंत!
या कल्प प्रदेशाच्या प्रवासात जीवन अन् निसर्ग हे हातात हात घालून आपल्याबरोबर वाटचाल करतात. नैसर्गिक शक्ती कुठल्यातरी असामान्य शक्तीत आपसूक परिवर्तित होत जाते आपल्या नकळत. आपल्या विचारांच्या परिघाची त्रिज्यादेखील आपसुक वाढत जाते. रबर ताणलं की लांबी वाढते तशी. पण तरीही ताण कुठे जाणवत नाही. इच्छांचं कक्षा ओलांडून स्वप्नांचं रूप धारण करणं बघताना हरखून जायला होतं. चेतनच्या चित्रातले रंग असोत की बासरीवाल्याच्या वेणुतले सप्तसूर. रंग, गंध, स्वर, ताल, शब्द, काव्य या प्रतिभेच्या, कलेच्या छटा आयुष्याच्या विविधांगांना लपेटून एक अद्भू नवा, सृजनात्मक कलाविष्कार घडवून वाचकाला अचंबित करतात.
इथे फक्त नीती, सत्य, पावित्र्य, चांगलेपण, विवेक याचाच बोलबाला नाही. इथे धारिणीच्या माध्यमातून स्खलनदेखील आहे. मुळातच माणूस स्खलनशील आहे. चुका करणं हा आपला धर्म आहे. असं वचन आहे. धारिणी इतरांना ऊब देण्यासाठी स्वतःच्या शरीराचं वस्र त्यांना पांघरते. त्यातून ती गर्भ धारण करते. या गर्भाचा नेमका पिता कोण हा प्रश्न पडतो. पण तो इथे चुटकीसरशी सोडवला जातो. ज्याने संगच केला नाही, ते फक्त प्रेम असा नकुल पितृत्त्व स्वीकारतो. शारीरिक गरजांवर शाश्वत प्रेमभावना (इथे प्लेटो आठवतो प्लेटॉनिक लव्ह ही संज्ञा आठवते) मात करून जाते. या प्रवाशांबरोबर वाचकदेखील एका उंच कड्यावर जाऊन मोकळा श्वास घेतो शुद्ध हवेत!
आपल्या अवतीभवतीच्या शकडो, हजारो, लाखो माणसांचं प्रतिनिधित्व करणारे हे पाच प्रवासी एकेका चक्रव्यूहातून आपली अलवार सुटका करीत जातात. अभिमन्यू ते की आपण हेही कळत नाही. तशी प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत एक असते. पण कुवत मात्र सारखी नसते. त्या त्या वेळच्या भावना आपल्या कृतीला वेगवेगळ्या दिशा देतात.
हा नव्या दिशेचा शोध आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जाणीवा जागवणारा, चैतन्य पुâलविणारा. कारण वेगवेगळ्या कारणाने आपल्या शरीरावर, विचारांवर, प्रतिभेवर चेतनेवर राख पसरत जातो. त्यामुळे आतली उष्णतेची धग असूनही नसल्यासारखी वाटते. अभिमन्यू ही राख बाजूला सारण्याचे, पुंâकर मारून निखारे पेटविण्याचे काम करतो.
जंगलात अस्वल मारल्यावर ध्यानात येतं तर गर्भार, पोटुशी अस्वलीण होती. इथे धरिणीतलं ममत्व पाझरतं. धारिणी धरिणी होते. तिच्या मातृत्वाचा नैसर्गिक पान्हा पाझरतो. मोठ्या कष्टानं अस्वलिणीच्या पिलाचा जन्म होतो. आई शेवटी एकच असते. प्राण्यातली, पक्ष्यातली, माणसातली!
मातृत्व हे फक्त शरीराशी संबंधित नसतं. ते मनाशी, अंतरंगाशी संबंधित असतं. संग, गर्भधारणा, पालनपोषण, जीवन अन् शेवटी मरण या नैसर्गिक पायNया.. हा एकसंध प्रवास जे निसर्गात, जे चार पायांच्या प्राण्यांत तेच माणसांत पायांच्या संख्येने काही फरक पडत नाही.
माणूस हा सारखा काही तरी मिळविण्यासाठी धडपडतो. कीर्ती हवी असते. नाव हवंच असतं. इथे मला अकारण अण्णा हजारे, मेधा पाटकर अन् केजरीवाल यांची आठवण झाली. साNयांचे उद्देश चांगले. पण कीर्तीच्या हव्यासापोटी, नावाच्या प्रसिद्धीच्या मोहापायी चांगल्याचं वांगलं होतं. काही मिळवलं की काय मिळवायचं राहिले ते कळतं. मग ते उरलं सुरलं मिळविण्यासाठी वेगळी धडपड. वेगळी पडझड धडपडीपोटी पडझड आलीच.
संन्याशाचं विवेचन उत्तम. आपल्यातल्या प्रत्येकाला दृष्टी असते; पण दृष्टिकोन नसतो. शब्दांच्या या अवघड वाटा लेखिकेनं सहजरित्या ओलांडल्या. पार केल्या. हे एक शिवधनुष्य म्हणायला हवं. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना मला का कुणास ठाऊक ग्रेसची कविता वाचत असल्यासारखं वाटलं. गूढ अनाकलनीय तरीही मोहून टाकणारं, आनंद देणारं वाचनाचं समाधान देणारं.
सत्य दाहक असतं. हादरविणारं असतं. हे सारं वाचताना मनाची पूर्वतयारी हवी. म्हणजे हादरे कमी बसतील. उलट आकाशपाळण्यात उंच उंच झुलण्याचं समाधान लाभेल.
रेखा बैजल यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देणारी ही कादंबरी. अज्ञेय प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. पण हे वाचण्यासाठी पेशन्स मात्र हवेत. सर्वांगसुंदर लेखनासाठी, प्रकाशनासाठी लेखिकेचे, प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
डाॅ.विजय पांढरीपांडे, पंचधारा नियतकालिक ...Read more