DAILY TARUN BHARAT 14-6-2009‘आकाशवेध’- गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यबंधांचे लेखन करणाऱ्या गिरिजा कीर यांच्या साहित्याचे उर्दू, कन्नड, तेलगू, गुजराथी, इंग्लिश अशा वविध भाषांमध्ये भाषांतरही झाले आहे. समाजातील उन्मार्गी स्त्रिया, मुलं, गुन्हेगार, कामगार स्त्रिया व मुले, आदिवासी यांच्याशी संवाद साधणाऱ्या लेखिकेला साहित्यलेखन पुरस्कारासमवेत समाज सेवेसाठीही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध स्तरांतील मानवी मनोव्यापार आपल्या साहित्यातून, आविष्कृत करणाNया गिरिजा कीर यांचे अनुभव विश्व विशाल व वैविध्यपूर्ण आहे. लेखिकेने मानवी हृदयातील चांगुलपणा जसा डोळसपणे टिपला आहे, तसाच मानवी मनातील स्वार्थ, संकुचितता, आत्मवेंâद्रितता, लोभ, क्रौर्य सुज्ञपणे निरखिले आहे. ‘आकाशवेध’मधील कथांतून यांना अभिव्यक्ती मिळाली आहे.
स्त्री-पुरुष स्वभावातील नैसर्गिक अंतर दर्शवीत व्यक्तिजीवनाचा- व्यक्तिमनाचा लेखिकेने घेतलेला वेध या कथातून दृग्गोचर होतो. व्यक्तिजीवनातील आर्थिक, व्यावहारिक, भावनिक, मानिसक पातळ्यांवरून निर्माण झालेल्या समस्या व समस्येसंदर्भातील व्यक्तिमनांच्या क्रिया- प्रतिक्रिया यांचे सूक्ष्म चित्रण करीत लेखिका अंतरंगाच्या गूढ- गहिNया, स्थूल- सूक्ष्म, सौम्य- प्रखर, भाव- विचारांना चित्रित करते.
वेगानं बदलत गेलेली तरुण पिढीची मानसिकता केंद्रवर्ती ठेवून वेगवेगळ्या स्तरांवर तिची अभिव्यक्ती लेखिका करते. नात्यात दिराकडून पैशाची झालेली फसवणूक सहन करीत, वास्तवाचे चटके सोसत आपल्या लहान मुलाचे मोठा कलावंत होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्यात आत्मबळ जिद्द निर्माण करत त्याचे ध्येय त्याच्या पदरात टाकणारी प्रेमळ, खंबीर आई, अशा आईच्या संस्कारातून घडलेल्या कलावंताचा स्वजीवन सार्थकी लावण्याच्या हेतूने गरीब-गरजू व कलेत रस घेणाNया मुलांना स्वत:च्या कलेचं ज्ञान देण्याचा उदात्त विचार व नि:स्वार्थी मन, आणि मोठ्या कलावंताकडून कलाज्ञान मिळवूनही जीवनात पैसा मिळत नाही म्हणून तारणाऱ्याचाच विध्वंस करून टाकणारी नवी पिढी अशा दोन पराकोटीच्या विरोधी जाणिवा- विचार- प्रवृत्ती यांच्या ताणाबाण्यातून सूक्ष्म- स्थूल संघर्षाचे धागे विणत लेखिका त्याचं आकाश कथा आकृतीत बांधते. व्यवहाराच्या पातळीवरून आई-वडील यांच्याविषयी विचार करणारी आजची ही तरुण पिढी, पैशांचा सुकाळ पण माणुसकीचा अभाव असल्याने जिवाभावाच्या नात्याविषयी जेव्हा, ‘बायकोचं बाळंतपण करायला, बाळ सांभाळायला आया हवीच, शिवाय ती घरची, विश्वासू दोन साड्या आणि बदाम पिस्त्याची पाकिटं यात हा सौदा नक्कीच चांगला असा विचार करताना दिसते तेव्हा लेखिकेला यातना होतात़ नव्या, आधुनिक मनांची मानसिकता, आचार- विचार, जीवनशैली नाईलाजास्तव स्वीकारताना जुन्या पिढीला जाणवणारी हतबलता, अगतिकता, खेद, विस्मितता, तगमग इ. भावच्छटांचे रंगमिश्रण लेखिका चितारते. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत वर्गाच्या व दोन- तीन पिढ्यांची मानसिकता अधोरेखित करणाNया या कथा कवी मनाला उजळून टाकतात तर कधी कातरवंâपित अंतर्मुख करतात.
जुन्या- आधुनिक- संक्रमण काळातील वातावरण त्या त्या व्यक्तिचित्रांच्या भोवताली असल्याने त्यांच्या मनोधारणा, कृती, उक्ती, जीवनधारणा यातून ही व्यक्तिचित्रे उठावदार, जिवंत व स्वाभाविक होऊन अवतरतात. ही व्यक्तिचित्रे समंजस असोत, जिद्दी, कणखर असोत, प्रेमळ-दयाशील असोत, क्रूर-आततायी असोत. परंतु प्रसंग, परिस्थिती व व्यक्ती धारणा यांना साजेसे वातावरण कथातून निर्माण होतेच आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरून ते कथानकात असे एकजीव होते की, कथाशयात, सूक्ष्म संघर्ष, विरोध नाट्य निर्माण करत कथांना सरसता व परिणामकारकता प्रदान करते.
सहजसुलभ, प्रासादिक, ओघवती शैली, अनभुवांचं सहज- मोकळेपणानं केलेलं चित्रदर्शी शब्दांकन कधी क्वचित कथातून येणारं आदर्शवादी, गूढ, अद्भुतरम्य वातावण, कवचित विनोदाचा होणारा शिडकावा कथात रंजकता निर्माण करतात. कथांची बांधणी उत्कृष्ट, अनुभवाचे थेट प्रक्षेपण करणारी शब्दशैली, स्वत:च आभाळ शोधायचा प्रयत्न करणाऱ्या या कथांतील माणसांना त्यांच्या विचारांना वाचकांसमोर दृश्य करतात हे या कथांचे यश म्हणावे लागेल.
...Read more