THE AKBAR AND BIRBAL STORIES HAVE A LOT OF HISTORICAL VALUE TO THEM. THEY ARE THE STORIES OF THE HISTORY OF INDIA, AND THEY TEACH YOU A LOT ABOUT THOSE TIMES. YOU LEARN SMALL AND NITTY-GRITTY THINGS ABOUT THE PAST OF INDIA AND HOW IT WAS. THESE THINGS ARE OF GREAT INTEREST TO THE CHILDREN WHEN THEY ARE JUST GROWING UP.
THESE STORIES OF AKBAR AND BIRBAL ARE GREAT TO SAY TO YOUR KIDS. THEY CAN LEARN A LOT ABOUT THE HISTORY OF THE COUNTRY THROUGH THESE STORIES.
THE AKBAR AND BIRBAL TALES HAVE A LOT OF MORALS, AND THEY ARE VALUABLE FOR KIDS WHEN THEY ARE YOUNG. YOU SHOULD HENCE TEACH THEM THE VALUES FROM THESE TALES OF AKBAR AND BIRBAL.
THE FABLES OF AKBAR AND BIRBAL HAS STILL SO MUCH TO TEACH US, AND EVEN WHEN PEOPLE ARE GROWN UP, THEY CAN LEARN A LOT FROM THESE STORIES. THE PROPER MENTAL AND PSYCHOLOGICAL GROWTH AND DEVELOPMENT OF YOUR KIDS ARE IMPORTANT, AND THE STORIES OF AKBAR AND BIRBAL WILL DO JUST THAT. THE FIRST STEP TO THEIR MORAL EDUCATION CAN BE THESE AKBAR AND BIRBAL STORIES.
भारतीय चातुर्यकथा म्हटलं की बिरबल आणि तेनालीराम हीच नावं झटदिशी डोळ्यांपुढे येतात. या दोन्ही अत्यंत हुशार व्यक्ती इतिहासात अजरामर होऊन बसलेल्या आहेत. त्यातही बिरबलाच्या कथा तर अजूनही संदर्भासाठी वापरल्या जातात. अगदी इंटरनेटवर, मॅनेजमेंटच्या धड्यांमध्ये बिरबलाचं स्थान अव्वल असल्याचं दिसतं.
अकबर बादशाह आणि बिरबल यांचं मेतकूट फारच खुमासदार जमलेलं आहे. अकबराच्या दरबारातल्या नऊ रत्नांपैकी बिरबल अकबराचा विशेष लाडका होता. बिरबलानं आपलं बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, सच्चेपणा, निर्भयता, शौर्य वगैरे गुणांच्या जोरावर बादशाहचं मन तर जिंकून घेतलं होतंच; पण देशविदेशांतही त्याची कीर्ती पसरलेली होती.
बिरबल-बादशाहच्या कथा वाचताना करमणूक तर होतेच, पण बोधही मिळतो. शहाणपण मिळतं. शिकायला मिळतं. आपल्या देशात इतकं मौल्यवान रत्न जन्माला आलं, याचा अभिमानही वाटतो. या गोष्टी केवळ मुलांनाच नाही, तर सर्व वयोगटांच्या, लहान-थोर माणसांना अनेक प्रकारे आनंद देतील अशाच आहेत.