* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WISDOM SONG : THE LIFE OF BABA AMTE
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177669367
  • Edition : 8
  • Publishing Year : FEBRUARY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MURLIDHAR DEVIDAS AAMTE WAS BORN TO A RICH LANDLORD. HE WAS BASICALLY OF VERY AGGRESSIVE AND REVOLUTIONARY NATURE. HE WANTED TO LIVE HIS LIFE FULLY. BUT VERY SOON HE REALISED THE FACT THAT HIS LIFE WAS NOT FOR HIS OWN HAPPINESS. IT WAS FOR OTHERS, OTHERWISE THE RICHES, THE PROSPERITY, THE INTELLIGENCE THAT HE POSSESSED WOULD ALL BE IN VAIN. THIS THOUGHT GAVE RISE TO THE COLONY ESTABLISHED FOR THE SURVIVAL OF THE PATIENTS SURVIVING WITH LEPROSY. THE NEXT STEP WAS THE `BHARAT JODO ABHIYAN` TO SPONSOR THE NATIONAL INTEGRITY AND HARMONY BETWEEN THE NORTH AND THE SOUTH; THE EAST AND THE WEST. THE NEXT PROGRAMME ON HIS AGENDA WAS THE STAY IN THE NARMADA BASINS FOR OVER A PERIOD OF 10 YEARS. HE SUPPORTED THE FAMILIES AFFECTED BY THEIR DISPLACEMENT THROUGH THE HANDS OF THE GOVERNMENT ITSELF IN THE NAME OF ENVIRONMENT. IT WAS DURING THIS PERIOD THAT HE STARTED SUFFERING FROM INCURABLE DISEASE OF HIS SPINAL CORD. NOT ONLY BABA, BUT HIS NEXT TWO GENERATIONS HAVE DEVOTED THEIR LIVES IN THE WELL BEING OF THE PEOPLE. TOGETHER, THEY HAVE HELPED THOUSANDS OF PEOPLE IN MANY WAYS, THEY HAVE CHANGED PEOPLE FOR BETTERMENT. NOT ONLY THE EFFORTS OF THESE THREE GENERATIONS HAVE HELPED BUT THEIR WILL POWERS HAVE ALSO HELPED A LOT IN HELPING THESE PEOPLE. THIS AUTOGRAPHY IS ACTUALLY A VERY INFORMAL PICTURE OF BABA; IT INCLUDES MANY SCENES FROM HIS DAY-TO-DAY LIFE, THE INFORMAL MEETINGS AND DISCUSSIONS, THE INTERVIEWS NOT ONLY WITH HIS FAMILY MEMBERS BUT ALSO WITH HIS NEAR AND DEAR ONES. THIS AUTOGRAPHY GIVES JUSTICE TO THE EXTRA-ORDINARY NATURE OF THIS COUPLE, BABA AND HIS WIFE TAI.
सधन जमीनदारांच्या घरात जन्माला आलेले मुरलीधर देवीदास आमटे हे स्वभावत: बंडखोर वृत्तीचे, आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा असलेले! पण आयुष्यात फार लवकर एका गोष्टीची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली; आपल्याला जगायचंय ते स्वत:साठी नाही, तर दुस-यांसाठी. अन्यथा हे सारं वैभव, हा मानसन्मान, ही बुद्धिधमत्ता... हे सगळं फोल, तकलादू, बेगडी ठरेल. ...मग सुरुवात झाली ती आनंदवनात कुष्ठरुग्णांसाठी उभारलेल्या वसाहतीने. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि सलोखा यांचा पुरस्कार करण्यासाठी भारताच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण टोकांना जवळ आणणारं भारत जोडो अभियान झालं. त्यापुढचं पाऊल म्हणजे बाबांचं नर्मदा खो-यातील दहा वर्षांचं प्रदीर्घ वास्तव्य. सरकारने पर्यावरणाचा योजनाबद्ध विनाश चालविला होता, त्यामुळे होरपळून निघणा-या कुटुंबांच्या पाठीशी, बाबा उभे राहिले. हे सर्व करीत असताना पाठीच्या कण्याच्या असाध्य व्याधीने त्यांच्या शरीराला ग्रासून टाकले होते. बाबांच्या ध्येयस्वप्नांची व्याप्ती किती मोठी आहे, याचं तळपतं उदाहरण म्हणजे बाबा आमटे यांच्या मुला-नातवंडांच्या तीन पिढ्यांनी आजवर हजारो लोकांची आयुष्यं आमूलाग्र बदलून टाकली आहेत. बाबांच्या स्वप्नांची पूर्तता होण्यामागे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अदम्य इच्छाशक्तीचाही फार मोठा वाटा आहे. बाबांशी तासन्तास मारलेल्या मनमोकळ्या, अनौपचारिक गप्पा, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि निकटवर्तीयांच्या मुलाखती या सर्वांमधून निर्माण झालेलं बाबांचं हे चरित्र म्हणजे बाबांना ओळखणा-या असंख्य माणसांची सामूहिक स्मरणगाथाच आहे. सहवेदना, करुणा, निरपेक्ष बुद्धीने केलेली सेवा, या सर्वांचं जितंजागतं प्रतीक असणाNया आपल्या काळातील व्यक्तींचं – ताई आणि बाबांचं – हे यथार्थ चित्रण आहे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BABA AMTE #YUDDHKALATIL AASECHA KIRAN #VEDYA AAICHA VEDA MULGA #UTAVIL TARUN #VAYAT YENA #VARSA #AANDAVAN #SOMNATH #HEMALKASA #MAHAROGI SEVA #SAMITI #JANASAMANACHE VAKIL #ENCHAMPALI #BHOPALPATTANAM #BHART JODO #KANYAKUMARI #KASHMIR #PANJAB #PAKISTAN #LIKHIT ANI MOKIKH SHABDHA # KHARYAKHURYA VIKASACHA SWAPNA #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #लीना सोहोनी
Customer Reviews
  • Rating Starगणेश श्रीरंग शेलार

    आमच्या ‍ परिसरातील राहिवाशांचा ग्रुप नुकताच ‍विदर्भातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आला त्यात प्रामुख्याने आनंदवनाचा देखिल समावेश होता. साधारणपणे 30 नोव्हेंबर, व 1 व 2 ‍ डिसेंबर 2019 ला आम्ही सहलीवर होतो. तर त्या ठिकाणी कर्मवीर बाबा आमटे यांचं मा.श्रीती निशा मीरचंदानी यांनी ‍लिहिलेलं व आपण अनुवादीत केलेलं ‘अमरगीत’ हे जीवनचरित्र हाती लागलं. त्याविषयी, आदरणीय बाबा आमटेंचा जीवन प्रवास शब्दबध्द करणं हे तसं ‍ जिकरीचं काम पण, लेखिकेनं ते लिलयापणे पेललं. त्यांचं जीवनचरित्र वाचतांना नमुद भाषा, वापरण्यात आलेले शब्दप्रयोग अत्यंत अमोघ आणि रसाळ असल्याने वाचकांच्या थेट काळजाला भीडते. व ही शब्दपर्यायाची कामगिरी आपण अत्यंत चोखपणे बजावली म्हणुन हा शब्दप्रपंच. बाबा आमटे व त्यांचे आनंदवन व हेमलकसा इतकेच काय ते साधारणपणे जनतेला माहिती होते. पण त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकतांना त्यांच्या जीवनातील विविध टप्पे, स्थळे, खडतर प्रवास, शारीरिक व्याधींवर मात करुन केवळ दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर कशी नेत्रदीपक कामगिरी केली याची जाणीव हे पुस्‍तक वाचताना होते. कुटूंबानं घालवुन लावलेल्या अनेक आजार ग्रस्तांच्या, पीडितांच्या व्याधींवर बाबा व त्यांचे एकुणच कुटूंब कशी मायेची फुंकर घालते व व्याधीग्रस्तांसाठी ते आधुनिक काळातील ‘देवमाणसाची’ भुमिका वठवतात. बाबांच्या जीवनचरित्रावरील लेखनाची व्याप्ती प्रचंड मोठी पण ती अत्यंत कसबीने पार पाडली व त्यांच्या प्रत्येक कर्तबगारीची नोंद आपल्या लेखनीने घेऊन त्यांच्या जीवनकार्याचा सन्मानच केला यात कोणतीच शंका नाही. सदिच्छा.. आपला एक वाचक, गणेश श्रीरंग शेलार. ...Read more

  • Rating StarLOKRANG 21 JUNE 2009

    ‘पहिल्या भारत जोडो अभियनाच्या वेळी श्रीनगरजवळील हिरापाल येथे बाबा अत्यंत थकले होते. आपली शेवटची इच्छा एका पत्रात लिहून आपण ते पत्र काळ्या सुटकेसमध्ये ठेवलं असल्याचं त्यांनी विलास मनोहर यांना सांगितलं. त्यानंतर ते म्हणू लागले, ‘असं आई गं....मी आता मरणर!’ अखेर विलास उठले आणि ती काळी सुटकेस उघडू लागले, ‘तुम्ही हे काय करताय? असं बाबांनी विचारताच ते म्हणाले, ‘अहो, तुम्ही सारखं आपण मरणार आहोत,असं म्हणताय ना? मग म्हटलं, तुम्ही मरण्यापूर्वी तुमची अखेरची इच्छा तरी वाचून ठेवावी’ त्यानंतर मात्र बाबांचं ते विव्हळणं, आपल्या आईची आठवण काढून आपण मरणार असल्याचं मोठ्यांदा सांगणं लगेच थांबलं. ‘मी काही बाबांची चेष्टा करण्यासाठी म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगत नाही,’ विलास म्हणाले, उलट एखादा असामान्य माणूससुद्धा किती सामान्य माणसासारखा वागू शकतो, हे पाहून मलाच कुठेतरी मनातून बरं वाटतं. माझ्या मनात आशा निर्माण होते.’ हा प्रसंग वर्णन केलेला आहे ‘अमरगीत’ या पुस्तकात. होय हे बाबा आमटे यांचं जीवनचरित्र आहे. बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्या परस्परविरोधी गोष्टी होत्या त्या, त्यातील गुंतागुंत वाचकांपर्यंत पोचवण्यात लेखिका यशस्वी होतात याचा अनुभव वर वर्णन केलेल्या प्रसंगातून येतो, आणि तो संपूर्ण पुस्तकातूनही वारंवार जाणवत राहतो. या पुस्तकाच्या मूळ लेखिका निशा मीरचंदानी यांची दृष्टी चरित्रकार म्हणून अतिशय स्वच्छ व निर्लेप आहे, अभ्यास आहे. ती दृष्टी आपल्यापर्यंत व्यवस्थितरीत्या पोचवण्याचे श्रेय मराठी अनुवाद समर्थपणे करणा-या लीना सोहनी यांचं आहे. या पुस्तकाचं शीर्षक आहे ‘अमरगीत’. बाबा आमटे आयुष्यभर ज्या पद्धतीने जगले, झगडले त्यामुळे ते अमर झाले आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याचं गाणंही यात आहे. आयुष्याच्या एका क्षणी त्यांना सच्चा सूर, ताल गवसला आहे. हा त्यांच्या आयुष्यातील सच्चा सूर ताल शब्दात पकडण्यात लेखिकेचे सामर्थ्य आहे. वस्तुत: बाबा आमटे यांचं आयुष्य खूप विरोधाभासांनी भरलेलं आहे. एकीकडे वकिलीचं उत्तम शिक्षण घेणं, दुसरीकडे जंगलात वाघसिहांशी मुकाबला करणं, एकीकडे समृद्ध घरात जन्माला येणं, दुसरीकडे कुष्ठरोग्यांसाठी आडरानात जाऊन स्वत:ला त्यांच्या कार्यासाठी वाहून घेणं, एका बाजूने संस्थाचालक म्हणून हिशोबीपणा, काटकसरीपणा, दुसऱ्या बाजूने बेफाम जगणं हे सारे परस्परविरोधी कंगोरे शब्दांत पकडणं, मांडणं हे खरं तर अवघड काम होतं. पण लेखिकेने ते स्वीकारलं आणि यशस्वी करून दाखवलं. त्यासाठी लेखिकेने घेतलेली मेहनत जाणवते. लेखिका मीरचंदानी बाबांना भेटल्याच पण त्यांच्या भोवतालच्या, सहवासातील महत्त्वाच्या माणसांना भेटल्या, त्यातून व इतर अनेक पद्धतीने त्यांनी चरित्रलेखनाची सामुग्री गोळा केली, ही सामुग्री अतिशय प्रवाहीपणे शब्दांत मांडून वाचकांपर्यंत पोचवली आहे. एका बाजूने बाबांमधले असामान्यत्व लेखिकेने अधोरेखित केले आहे. त्यासाठी नेमके प्रसंग, तपशील दिले आहेत. दुस-या बाजूने विशेष म्हणजे बाबा आमटे यांचे विरोध, टीकाकार यांचीही मतं, विचार दिले आहेत. लेखिका या दोन्ही बाजू आपल्यासमोर मांडते, सुजाण वाचकाला त्यातून नेमका समजायचा तो अर्थ समजतो. हेच या चरित्राचं वैशिष्ट्य म्हणता येईल. बाबा आमटे यांचं काम, क्षेत्र इतकं बोलकं आहे की ते समोर मांडून त्यातून वाचकाला विचारप्रवृत्त करणं हे एका अर्थी म्हटलं तर सोपं होतं कारण या व्यक्तिमत्त्वाला अनेक परस्परविरोधी रंग आहेत. ज्यामुळे हे चरित्र खुलतं. दुसऱ्या बाजूने हे चरित्र लिहिणं ही अवघड गोष्ट होती कारण बाब आमटे यांच्या आयुष्यात इतके विलक्षण प्रसंग, अनुभव आहेत की त्यातून नेमका भाग घेणं, इतर वगळणं हे समुद्रमंथनातून रत्न निवडण्यासारखं होतं. पण लेखिकेने ते सफल करून दाखवलं आहे. बाबा आमटे एक असामान्य कर्मयोगी आणि बाबा आमटे एक सामान्य, सच्चा माणूस या दोहोंचा मेळ पुस्तकात व्यवस्थित घातला आहे. या पुस्तकाच्या मूळ लेखिका निशा मीरचंदानी या अमेरिकेतील एक व्यावसायिक आहेत. पण त्यांची स्वत:ची एक सेवाभावी संस्थाही आहे. त्यांची ही सेवाभावी सच्ची, वृत्ती त्यांच्या या चरित्रलेखनातून प्रतिबिंबित होते. एकीकडे लेखिका म्हणून सहजपणे येणारी तरल संवेदनशीलता दुसरीकडे चरित्रलेखनात आवश्यक ती तटस्थ दृष्टी या दोन्हीतील तोल पुस्तकात व्यवस्थित सांभाळला आहे. या पुस्तकाची सुरुवात बाबा आमटे यांची जडणघडण या भागाने (प्रकरणाने) होते. चरित्रलेखनाचा रूढ क्रम इथे लेखिकेने पाळला आहे. या पहिल्या भागातील वेड्या आईचा वेडा मुलगा हे उपप्रकरण खूप हृदयंगम आहे. बाबा आमटे व त्यांची आई यांच्यातले सूक्ष्म, गहिरे भावबंध यातून आपल्याला जाणवतात. पुस्तकातील दुसऱ्या भागाचे नाव बाबा आमटे यांचा वारसा; कार्य आहे. हा पुस्तकातील एक महत्त्वाचा भाग आहे. यात बाबांनी त्यांच्या कुटुंबाने उभारलेले, चालवलेले आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा प्रकल्प, महारोगी सेवा समिती यांची माहिती येते. हे प्रकल्प उभे करतेवेळी आलेले अनुभव, त्यात कुटुंबाचे-त्यातही साधनाताई, डॉ. प्रकाश, डॉ.विकास यांचे योगदा, इतरही अनेक नाव नसलेल्या सामान्य पण समर्पित व्यक्ती यांचं चित्रं त्यातून डोळ्यांसमोर साकारतं. या पुस्तकातील तिसरा भाग ‘बाबा आमटे यांचा वारसा वकिली’ असा आहे. यात जनसामान्यांचे वकील म्हणून बाबांचं चित्र रेखाटलं आहे. तसंच भारत जोडो १ व २ पंजाब शांतता यात्रा, नर्मदा बचाओ आंदोलन यांचं सविस्तर वर्णन आहे. त्यातही भारत जोडो अभियान इतवंâ प्रभावीपणे मांडलं आहे (सिद्धार्थ काक यांचा यावरील माहितीपद संदर्भासाठी यात घेतला आहे) की सध्याच्या अस्थिर, दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकच मोलाचं, महत्त्वपूर्ण ठरतं. ‘भारत जोडो’ या भागामुळे (प्रकरणामुळे) वाचकांच्याही मनात अखंड भारताविषयी तशी भावना जागवण्यात लेखिका यशस्वी ठरते. याच्या मुळाशी बाबा आमटे यांची विलक्षण तळमळ आहे, पण ती तळमळ पोचवण्यासाठी लेखिका माध्यम ठरली आहे. पुस्तकातील चौथा भाग ‘बाबा आमटे यांची विद्वत्ता असा आहे. यात बाबा आमटे यांच्या लेखनाचे विशेष मांडले आहेत. त्यांच्यातील एक लेखक, एक परिणामकारक कवी, वक्ता आपल्याला त्यातून उमगतो. तसेच यातील एक उपभाग म्हणजे ‘खऱ्याखुऱ्या विकासाचे स्वप्न’ आहे, ज्याने पुस्तकाचा समारोप होतो. पण लेखिकेने पु.ल.देशपांडे यांच्या शब्दांत म्हटल्याप्रमाणे ‘एकदा का बाबा आमट्यांनी तुमच्या मनाचा कब्जा घेतला की तुम्ही परत पहिल्यासारखे होऊच शकत नाही.’ बाबा, त्यांच्या खऱ्या अर्थाने सहचारिणी साधनाताई यांच्या कौटुंबिक व सामाजिक कार्यातील महत्त्वाची छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट आहेत, ज्यांनी हे चरित्र अधिकच बोलकं केलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more