FROZEN SADNESS THIS IS WHAT WE HAVE WHEN WE CANNOT REALLY KNOW WHAT WE HAVE LOST. AND THIS IS WHAT PAULINE BOSS ILLUMINATES, AND HELPS TO EASE, IN AMBIGUOUS LOSS, AN ORIGINAL AND HUMANE ACCOUNT OF THE RAVAGES OF UNCERTAINTY FACED WHEN WE LOSS A LOVED ONE THROUGH DIVORCE, ADOPTION, ADDICTION, CHRONIC MENTAL ILLNESS, IMMIGRATION, OR ALZHEIMER’S. WITH SENSITIVITY AND LUCIDIRY, BOSS EXPLORES THE RUMULRUOUS EMOTIONS STIRRED UP BY SUCH LOSSES, ESPECIALLY THE WIDE FLUSTUATION BETWEEN HOPE AND HOPELESSNESS. DRAWING ON HER RESEARCH AND CLINICAL EXPERIENCE, BOSS SUGGESTS STRATEGIES THAT CAN CUSHION THE PAIN AND OFFERS HEARTENING NARRATIVES OF THOSE WHO COPE WITH AMBIGUOUS LOSSES AND MANAGE TO MOVE ON. “A COMPASSIONATE EXPLOTATION OF THE EFFECTS OF AMBIGUOUS LOSS AND HOW THOSE EXPERIENCING IT HANDLE THIS MOST DEVAS TATING OF LOSSES... BOSS’S APPROACH IS TO ENCOURAGE FAMILIES TO TALK TOGETHER, TO REACH A CONSENSUS ABOUT HOW TO MOURN THAT WHICH HAS BEEN LOST AND HOW TO CELEBRATE THAT WHICH REMAINS. HER SIMPLE STORIES OF FAMILIES DOING JUST THAT CONTAIN LESSONS FOR ALL. INSIGHTFUL. PRACTICAL, AND REFRESHINGLY FREE OF PSYCHOBABBLE.’’ KIRKUS REVICTUS “COMBINING HER TALENTA AS A COMPASSIONATE FAMILY THERAPIST AND A CREATIVE RESEARCHER, PAULINE BOSS ELOQUENTLY SHOWS THE MANY AND COMPLEX WAYS THAT PEOPLE CAN COPE WITH THE INEVITABLE LOSSES IN CONTEMPORARY FAMILY LIFE. A WISE BOOK, AND CERTAIN TO BECOME A CLASSIC.’’ CONSTANCE R. AHRONS, AUTHOR OF THE GOOD DIVORCE PAULINE BOSS IS PROFESSOR OF FAMILY SOCIAL AT THE UNIVERSITY OF MINNESOTA, PAST PRESIDENT OF THE NATIONAL COUNCIL ON FAMILY RELATIONS, AND A PSYCHOTHERAPIST IN PRIVATE PRACTICE.
जीवन जगत असताना दु:ख आणि हानी कुणाच्या वाट्याला येत नाही? प्रत्येकाला ते भोगावंच लागतं. या हानीचे आणि दु:खाचेही कितीतरी प्रकार असतात. काही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक; तर काही निव्वळ शारीरिक वेदनेच्या रूपात. काही दु:खे तर अशी, की बराच काळ भोगून झाल्यानंतर माणसाला कळतं, की इतकी वर्ष आपण कोणत्या काळ्या छायेत वावरत आहोत ते! तोपर्यंत त्याच्या बNयाच किमती मोजून झालेल्या असतात!
अशा या छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणा-या नकळत होणा-या, किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसलेल्या अटळ दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षं शोध अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘AMBIGUOUS LOSS’चा शोध. या शोधबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळ्यातून साकारलेलं हे सोप्या भाषेतलं पुस्तक.
‘LOSS’ म्हणजे काहीतरी गमावणं आणि ‘AMBIGUITY’ म्हणजे अनिश्चितता ही दोन्ही, माणसाच्या अनुभवाची प्रमुख अंगे आहेत. ‘AMBIGUOUS LOSS’ मध्ये ती सहजपणे एकमेकांत मिसळली जातात.
प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा ‘AMBIGUOUS LOSS’ अनुभवावा लागतो. त्यावेळेला काहीतरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. तसं नाही झालं, तर हे विचित्र, धूसर, उलगडा न होणारं नुकसान; हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं? असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करून सोडतो.
आपल्या परीने शोधतांना, प्रत्येकाची उत्तरे वेगळीच येत असतात; पण ‘AMBIGUOUS LOSS’ पुस्तक वाचल्यानंतर येणारी उत्तरे ही प्रश्नांपेक्षा सोपी असतील एवढं निश्चित!