* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANANDACHA PASSBOOK
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982022
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
INTERESTING AUTOBIOGRAPHY OF BANKER - ANANDACH PASSBOOK. HERE IS A BANKER SHYAM BHURKE WHO SERVED PEOPLE THROUGH HIS EMPLOYMENT IN BANK OF MAHARASHTRA. THE BANK WAS INSTRUMENT IN HIS HAND TO MAKE THE CUSTOMERS HAPPY. THIS WAS POSSIBLE BECAUSE OF HARD WORK, SINCERITY, CREATIVITY AND POSITIVE APPROACH. HE JOINED BANK AS A CLERK AND ELEVATED TO THE POST OF EXECUTIVE IN TOP MANAGEMENT. THIS SUCCESS STORY WILL INSPIRE THE READERS FOR BETTERMENT OF LIFE. HE LIKED TO MEET IDOLS LIKE KRANTISINH NANA PATIL, KARMAVIR BHAURAO PATIL, ACHARYA ATRE, P.L. DESHPANDE. HE MOBILISED DEPOSIT FOR THE BANK FROM DNYANPITH AWARD PRIZE RECEIVED BY V.S. KHANDEKAR HE LEARNT MANAGEMENT WITHOUT DOING MBA. HIS PARTICIPATION IN GANESHOTSAVA, SCOAT, NCC, STUDENT ORGANISATION, EARTHQUAKE RELIEF FUND, SWAMI VIVEKANAND SMARAK SAMITY, COLLEGE ANNUAL SOCIAL, MADE HIM MANAGEMENT EXPERT. HE ACTED IN 15 DRAMAS, PERFORMED CULTURAL PROGRAMMES ALONGWITH WIFE GEETA. DELIVERED MORE THAN 2000 LECTURES ON MANAGEMENT AND LITERATURE. HE SUCCESSFULY COMPLETED TRECK IN HIMALAYA. THE BOOK BOOK IS FULL OF INTERESTING STORIES FROM HIS LIFE. IT ENCOURAGES THE READERS TO ENRICH THE LIFE. IT SHOWS THE WAY TOWARDS HAPPY LIFE.
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. श्याम भुर्के यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये यशाची अनेक उत्तुंग शिखरे गाठली. साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली. वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, राम गबाले, भीमसेन जोशी, शरद तळवलकर, सुरेश भट, वामनराव चोरघडे, प्रा. शिवाजीराव भोसले अशा अनेक नामवंतांसंबंधीच्या आठवणी आनंददायी आहेत. डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या समाजकार्यात सहभागी होता आले. खुमासदार अत्रे, पु.ल. एक आनंदयात्रा, नंदादीप–वि.स. खांडेकर, साहिाQत्यक सावरकर, गोनीदां-एक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवलकर–गुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून ज्येष्ठ लेखकांचे साहित्य व जीवन रसिकांपर्यंत पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं, आनंदी रहावं वाटतं; त्याला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #श्याम भुर्के #SHYAM BHURKE #ANANDACHAPASSBOOK #आनंदाचंपासबुक
Customer Reviews
  • Rating Starश्रीकांत जोशी

    मोजक्या पण नेमक्या शब्दांतून आपल्या आयुष्यातील अनुभवांची व घटनांची पोतडीच लेखकाने उघडून दाखवली आहे. अतिशय सोप्या व वाचकाभिमुख भाषेतून नेमकी कल्पना मनोरंजकरित्या मांडण्याची व पटवण्याची हातोटी श्री. भुर्के यांना लाभली आहे.

  • Rating Starशशिकांत कुलकर्णी

    ‘आनंदाचे पासबुक’ अतिशय वाचनीय व उत्कृष्ठ आहे. एक दोन पाने चाळल्यानंतर पुरवून वाचवण्याचे ठरवले. पहिल्या दिवशी १०० पाने वाचली. पण दुसऱ्या दिवशी मात्र एका बैठकीत पुस्तक संपवले. सर्व बाबतीतले आपले सकारात्मक विचार खूप भावले. बँकेतले टोकन बिल्ले सुगंधित कणे किवां ज्ञानपीठ पुरस्कारातील १रु. तरी ठेव म्हणून द्या. या गोष्टी मनाला भिडल्या. आपल्या हातून असेच सकस लिखाण होवो. ...Read more

  • Rating Starनितिन जोगळेकर

    सार्वजनिक वाचनालयामध्ये गेलो असताना तुम्ही लिहिलेले `आनंदाचं पासबुक` हे पुस्तक वाचले. खूपच सुंदर लिहिले आहे. रसिक व्यक्तिमत्त्व, लिखाणाचा छंद, कर्तृत्ववान अधिकारी आणि विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हा सर्व दुग्धशर्करा योग आहे. अतिशय मोजक्या व मार्मिकशब्दांत तुम्ही वाचकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. ...Read more

  • Rating Starश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार, सातारा

    श्री. श्याम भुर्के यांनी लिहिलेल्या `आनंदाचे पासबुक` या पुस्तकात बँकेतील नोकरी करताना आलेले अनुभव आणि साहित्य - कलाक्षेत्रातील नामवंतांच्या आठवणी टिपलेल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक समाजाला मार्गदर्शक ठरणारे आणि संग्रही ठेवावे असे झाले आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more