MESMERISE YOUR SENSES WITH THIS RIVETING STORYLINE! PRESENTING THE GREAT BESTSELLER BY KHALED HOSSEINI, ‘AND THE MOUNTAINS ECHOED’ IS A GREAT NOVEL WHICH IS A MUST HAVE FOR READING ENTHUSIASTS. THE NOVEL IS ABOUT A BOY ABDULLAH AND HIS SISTER PARI WHO LIVE WITH THEIR FATHER ALONG WITH THEIR STEPMOTHER. THE NOVEL IS SET IN THE LANDS OF SHADBAGH, AFGHANISTAN WHERE THEIR FATHER, SABOOR, IS IN A CONSTANT SEARCH FOR A PLACE TO WORK SO HE CAN FEED HIS FAMILY. THE STORY HIGHLIGHTS THEIR STRUGGLE THROUGH THE EVIL EYES OF POVERTY AND THE BRUTAL WINTERS.
"अफगाणिस्तान, १९५२. शादबाग नावाच्या लहानशा खेड्यात राहणारा अब्दुल्ला आणि त्याची लहान बहीण परी. तिच्या नावाप्रमाणेच सुंदर आणि ऋजू स्वभावाची परी अब्दुल्लाचे सर्वस्व होती. थोरल्या भावाहून अधिक तोच तिचा पालक होता. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची नेहमीच तयारी असे. अगदी तिच्या पिसांच्या खजिन्यात भर घालण्यासाठी स्वतःची एकुलती एक बुटांची जोडी देऊन टाकण्याचीसुद्धा! रोज रात्री एकमेकांच्या डोक्याला डोकी चिकटवून, ते आपल्या पलंगावर एकमेकांना बिलगून झोपत.
एक दिवस ती भावंडं आपल्या वडिलांसोबत वाटेत पसरलेलं अफाट वाळवंट पार करून काबूलला पोहोचतात. पुढे काय वाढून ठेवलंय याची त्या दोघांना कल्पनाही नसते. पुढे घडणाऱ्या घटना परी आणि अब्दुल्ला यांच्या आजवर एकत्र विणलेल्या आयुष्याचा घट्ट गोफ उसवून टाकतात. म्हणतात ना, ‘कधी कधी हात वाचवण्यासाठी बोट तोडावं लागतं.’
अनेक पिढ्यांची आणि खंडांची अंतरं ओलांडत, काबूलहून पॅरिस, पॅरिसहून सॅन फ्रॅन्सिस्को, तिथून तिनोस या ग्रीक बेटावर अशी भ्रमंती करत खालेद हुसैनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि व्यक्ती म्हणून आपल्याला घडवणाऱ्या, आपली ओळख निर्माण करणाऱ्या बंधांविषयी लिहितो आणि आपण घेतलेले निर्णय, केलेली निवड यांचे परिणाम घटनांच्या इतिहासात कसे झंकारत राहतात तेही.
"