* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANGELS & DEMONS
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788184980455
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 448
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN ANCIENT SECRET BROTHERHOOD. A DEVASTATING NEW WEAPON OF DESTRUCTION. AN UNTHINKABLE TARGET. WORLD -RENOWNED HARVARD SYMBOLOGIST ROBERT LANGDON IS SUMMONED TO A SWISS RESEARCH FACILITY TO ANALYZE A CRYPTIC SYMBOL SEARED INTO THE CHEST OF A MURDERED PHYSICIST. WHAT HE DISCOVERS IS UNIMAGINABLE: A DEADLY VENDETTAAGAINST THE CATHOLIC CHURCH BY A CENTURIES-OLD UNDERGROUND ORGANIZATION THE LLLUMINATI. DESPERATE TO SAVE THE VATICAN FROM A POWERFUL TIMEBOMB, LANGDON JOINS FORCES IN ROME WITH THE BEAUTIFUL AND MYSTERIOUS SCIENTIST VITTORIA VETRA. TOGETHER THEY EMBARK ON A FRANTIC HUNT THROUGH SEALED CRYPTS, DANGEROUS CATACOMBS, DESERTED CATHEDRALS, AND THE MOST SECRETIVE VAULT ON EARTH TE LONG-FORGOTTEN LLLUMINATI LAIR. ""A BREATHLESS, REAL-TIME ADVENTURE.... EXCITING, FAST-PACED, WITH AN UNUSULLLY HIGH IQ.`` - SAN FRANCISCO CHRONICLE.""DAN BROWN HAS TO BE ONE OF THE BEST, SMARTEST, AND MOST ACCOMPLISHED WRITERS IN THE COUNTRY.`` - NELSON DEMILLE
प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना – कधी ऐकले नाही असे अस्त्र आणि कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य. रॉबर्ट लँग्डन या हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्र तज्ज्ञाला स्वित्झर्लंडमधल्या सुप्रसिद्ध ‘सर्न’ या संशोधन संस्थेकडून त्यांच्या एका खून पडलेल्या फिजिसिस्टच्या छातीवर उमटवलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी बोलावले गेले. व्हिट्टोरिया वेत्रा या सुंदर शास्त्रज्ञाबरोबर, कॅथलिक चर्चचा भीषण सूड उगवण्यासाठी शेकडो वर्षे टपलेल्या, इल्युमिनाटी या पंथाचे गुप्त ठिकाण शोधण्यासाठी धोकादायक भुयारे, दफनभूमी, एकाकी कथीड्रल्स, यांच्यामधून शोध घेताना ते अपहरण केलेल्या चार कार्डिनल्सच्या भीषण आणि क्रूर हत्यांचेही साक्षीदार बनतात. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेले प्रसंग आणि या भयानक कटकारस्थानाच्या मुळाशी पोहोचताना त्यांनी व्हॅटिकनचा बचाव करण्यासाठी जिवावर उदार होऊन केलेले अतुलनीय साहस यांचा खरा अर्थसुद्धा किती विलक्षण धक्कादायक ठरावा?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #डिजिटल फॉट्र्रेस # द दा विंची कोड#द लॉस्ट सिम्बॉल #एन्जल्स अ‍ॅण्ड डेमन्स #डिसेप्शन पॉर्इंट #THE LOST SYMBOL #FICTION #बाळ भागवत #अशोक पाध्ये #DIGITAL FORTRESS #DIGITAL FORTRESS #ANGELS & DEMONS #THE DA VINCI CODE #AJIT THAKUR #डॅन ब्राउन #DAN BROWN
Customer Reviews
  • Rating Starजस्मिन जोगळेकर

    स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध `सर्न` या संशोधन संस्थेत पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ लिओनार्दो वेत्रा यांची गूढ रीतीने हत्या होते. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहताना हल्लेखोराला जे हवंय ते कधीच मिळणार नाही असं वेत्राला वाटत असतं. पण तो त्याचा गैरसमज असतो. हललेखोराला वेत्राच्या लॅब मध्ये प्रवेश करायचा असतो. त्यासाठी पासवर्ड त्याला हवा असतो. पासवर्डच नाही म्हटल्यावर वेत्राला वाटतं आता तो काही करु शकणार नाही. पण जेव्हा धारदार सुऱ्याने अगदी काळजीपूर्वक हल्लेखोर वेत्राचा डोळा काढून घेतो तेव्हा मात्र वेत्राला पुढे घडणाऱ्या भयानक गोष्टीची जाणीव होते पण सगळ्याला फार उशीर झालेला असतो. आपल्या छातीवर हल्लेखोराने भाजवून उमटवलेला एक ठसा घेऊन वेत्रा मरण पावतो. या हत्येबद्दल संस्थेचा डायरेक्टर कोहलर पोलिसांना काही न कळवता हार्वर्डमधून रॉबर्ट लँग्डन या प्रसिध्द चिन्हशास्त्र तज्ञाला बोलावून घेतो. अपरात्री आलेल्या फोनवरच्या संभाषणामुळे गोंधळून गेलेल्या लँग्डनला फॅक्स मधल्या मृतदेहाच्या छातीवर उमटवलेला ठसा पाहून जबरदस्त धक्का बसतो. इथूनच कथेला सुरुवात होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या कथेला सुरुवात होते, असं म्हणणं योग्य होईल. सर्न मध्ये ही गडबड सुरु असते तेव्हाच व्हॅटिकन सिटीमध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते. पोपचा मृत्यू झाल्यामुळे नवीन पोपची निवड करण्याचा हा पवित्र कार्यक्रम. यासाठी व्हॅटिकन मध्ये सुरक्षा व्यवस्था फार काटेकोर केलेली असते. तरीसुद्धा व्हॅटिकन सिटी मध्ये अशा काही घटना घडतात की ज्याने स्विस गार्डस हबकून जातात. भावी पोप म्हणून ज्यांची वर्णी लागू शकेल अशा चार कार्डिनल्सचे व्हॅटिकन सिटी मधून अपहरण झालेले असते. तसेच सुरक्षा व्यवस्थेतला एक लक्ष ठेवणारा कॅमेरा त्याच्या जागेवरुन हलवून दुसऱ्या अनोळखी ठिकाणी लावलेला दिसतो, ज्यात एक भलतीच वस्तू स्विस गार्डस् ना दिसत असते. त्यामुळे ते चक्रावून गेलेले असतात. त्यातच अपहरणकर्त्याचा फोन येतो, ज्यात चारी कार्डिनल्स ची दर तासाने एक अशी सार्वजनिक ठिकाणी हत्या करणार आणि मग व्हॅटिकन सिटीला एका शक्तिशाली पदार्थाने उडवून देण्याची धमकी तो देतो. मग व्हॅटिकन सिटीला वाचवण्यासाठी कामेरलेंगो, जो मृत पोपचा सहाय्यक असतो आणि नवीन पोपची नियुक्ती होईपर्यंत सूत्रे ज्याच्या हाती असतात तो स्वतः लक्ष घालतो. वेत्राच्या छातीवरचा ठसा, त्याच्या लॅबमधून चोरीला गेलेला पदार्थ याच्या तपासाची जबाबदारी नकळत लँग्डनवर येते. त्यात त्याला वेत्राची शास्त्रज्ञ मुलगी व्हिट्टोरिया वेत्रा मदत करते. तिला लॅब मधून चोरीला गेलेल्या पदार्थाची आणि त्याच्या गैर वापराने होणाऱ्या विनाशाची भयंकर काळजी असते. तर लँग्डनला वेत्राच्या छातीवरच्या निशाणी बद्दल उत्कंठा असते. कारण ती निशाणी `इल्युमिनाटी` या प्राचीन पंथाची असते. अशी निशाणी जी दोन्हीकडून वाचता येईल, ज्याला अँबिग्राम म्हणतात. तो पंथ आता अस्तित्वात नाही या समजुतीत असलेल्या लँग्डनला ती खूण बघून म्हणूनच धक्का बसतो. इल्युमिनाटी हा खूपच प्राचीन पंथ होता ज्यात तेव्हाच्या विज्ञानवादी, कलाकार, शिल्पकार अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्यांनी केलेले संशोधन बायबलमधल्या संकल्पनांच्या विरुद्ध असल्यामुळे चर्च आणि या पंथात वैर होते. चर्चने ४०० वर्षांपूर्वी या पंथातल्या चार शास्त्रज्ञांच्या केलेल्या हत्येचा बदला आता कोणीतरी घेऊ पहात असतो. म्हणून चार कार्डिनल्स चे अपहरण केलेले असते. चार कार्डिनल्स ची हत्या कुठे होऊ शकते हे शोधण्याबरोबरच इल्युमिनाटीचे गुप्त ठिकाण शोधण्यातही लँग्डनला स्वारस्य असते. या विश्वाची निर्मिती पंचतत्त्वामधून झालेय यावर इल्युमिनाटी पंथाचा विश्वास असतो. त्यामुळे अपहरण, हत्येच्या ठिकाणांचा पंचतत्वाशी संबंध असणार असा निष्कर्ष लँग्डन काढतो आणि त्यादृष्टीने तपासाला लागतो. त्याच्या तपासाला यश येते का? कामेरलेंगो व्हॅटिकनला वाचवू शकतो का? वेत्राच्या लॅब मधून चोरलेला पदार्थ नक्की काय असतो आणि त्याचा शोध लागतो का? चारी कार्डिनल्सच्या हत्या अपहरणकर्ता कशाप्रकारे करतो? इल्युमिनाटी पंथाचे अस्तित्व, त्यांचे इतर अँबिग्राम, त्यांची गुप्त जागा याबद्दल काय काय माहिती पुढे येते हे सगळं पुस्तकातून हळूहळू आपली उत्कंठा वाढवत उलगडत जातं. धर्म आणि विज्ञान यांच्यातील हा संघर्ष. कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल करताना क्रूरता आणि शौर्य, धर्म आणि विज्ञान, धोकेबाजपणा आणि निष्ठा या सगळ्यांच सुंदर मिश्रण या पुस्तकात दिसून येतं. प्रत्यक्षातली ठिकाण, घडून गेलेल्या घटना, इतिहास, खरे लावले गेलेले शोध यांच्या जोडीने काल्पनिक कथा येत असल्यामुळे ती वाचता वाचता काल्पनिक नसून सत्य घटना वाचतोय असं वाटायला लागतं. डॅन ब्राऊन सुप्रसिद्ध होण्यात हे फार महत्त्वाचे कारण असेल असं वाटतंय. पण एकूणच त्याचे लिखाण, त्याची शैली खूपच परिणामकारक आहे. मुख्य म्हणजे डॅन ब्राऊनच्या सगळ्याच कथांमधील घटना फारच कमी कालावधीत घडून जातात..जेमतेम २४ तासात वगैरे. त्यामुळे तो स्पीड कथेतही वाचताना जाणवत राहतो. त्याचा मराठी अनुवादही तितकाच परिणामकारक उतरला आहे. इतका की एकदा वाचायला सुरुवात केली की पुस्तक संपल्याशिवाय ते खाली ठेवावे वाटत नाही. डॅन ब्राऊनची सगळीच अनुवादित पुस्तकं जी माझ्या वाचनात आली ती छान आहेत. वेगवेगळे विषय खूप परिणामकारक उतरले आहेत. ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    स्वित्झर्लंड येथे सर्न नावाच्या संशोधनकेंद्रात नेहमीच वेगवेगळे संशोधन चालू असते . त्यात त्यांना प्रतिवस्तूचे अर्थात अँटीमॅटरचे काही कण बनविण्यात यश आले आहे .या प्रतिवस्तूच्या एका कणातून संपूर्ण शहराला वीजपुरवठा होईल इतकी ताकद आहे . त्यामध्ये कोणतेह प्रदूषण नाही ,किरणोत्सर्ग नाही . पण जर ते हवेच्या किंवा इतर कश्याच्याही संपर्कात आले तर त्याच्या प्रचंड स्फोट होऊ शकतो . पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ लिओनार्दो वेत्रा याने प्रतिवस्तूचा शोध लावला आणि तीच प्रतिवस्तू आज सर्नच्या संशोधनकेंद्रातून चोरीला गेली. इतकेच नव्हे तर चोराने लिओनार्दो वेंत्राला क्रूरपणे ठार मारले होते .जाताजाता खुन्याने त्याच्या छातीवर इल्युमिनाटीचा प्रसिद्ध सिम्बॉल उमटवला . सन १५०० च्या आसपास काहीजण चर्चच्या विरोधात उभे राहिले.त्यात बहुसंख्य शास्त्रज्ञ होते .त्यांनी चर्चच्या खोट्या शिकवणूकी विरुद्ध आवाज उठवला . यात काही खगोलशास्त्रज्ञ होते काही गणितज्ञ होते. चर्चच्या खोट्या विचारसरणीमुळे ज्ञानाचा लोप होईल अशी त्यांना भीती वाटू लागली . मग त्यांनी एक गट स्थापन केला .या गटाने स्वतःला इल्यूमिनाटी म्हणवून घ्यायला सुरुवात केली . गॅलिलिओ न्यूटन सारखे शास्त्रज्ञ यात होते. कॅथलिक चर्च त्यांच्यामागे लागले . त्यांनी गॅलिलिओ ला अटक केली . सर्नच्या डायरेक्टरने तो सिम्बॉल पहातच सुप्रसिद्ध पुरातन अंकचिन्ह लिपी प्राध्यापक रॉबर्ट लँग्डनला बोलावले . आता त्याला आणि वेत्राची मुलगी व्हिक्टोरिया त्या प्रतिवस्तूचा शोध घ्यायचा आहे . व्हॅटिकन सिटीत आज एक महत्वाची घटना घडणार आहे . पंधरा दिवसांपूर्वी पोपचा मृत्यू झालाय आणि नवीन पोपची निवड आज होणार आहे . पण पोपच्या शर्यतीत असणारे चार कार्डिनल अचानक नाहीसे झालेत . वेत्राचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांनेच त्यांना पळवून नेलेय. बीबीसीला फोन करून त्याने त्यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या होणार असे घोषित केले. ही सार्वजनिक ठिकाणे शोधण्याची जबाबदारी रॉबर्ट लँग्डनने घेतली . गॅलिलिओने तुरुंगात असताना एक पुस्तक लिहिले होते त्यात पाथ ऑफ इल्युमिनेशन बनवला होता . त्यासाठी त्याने व्हॅटिकनच्या सुप्रसिद्ध शिल्पांचा चतुराईने वापर केला होता . त्यात पृथ्वी ,वायू ,अग्नी ,जल यागोष्टींचा समावेश होता . याशिवाय ती प्रतिवस्तूही व्हॅटिकनमध्येच लपविली होती . आपल्या अभ्यासाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर रॉबर्ट लँग्डन त्यांना शोधून काढले का ...?? प्रतिवस्तूचा स्फोट थांबवून व्हॅटिकनला वाचवू शकेल ....?? एक वेगवान , थरारक ,कादंबरी . ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 04-10-2009

    चित्तथरारक संघर्ष सत् आणि सत्चाच! एक प्राचीन आणि गुप्त संघटना. तिचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा विध्वंस करण्यासाठी त्यांनी मिळवलेलं अस्त्र, हे दोन्ही कल्पनेच्या पलीकडलं. त्यांच्या कारावायांची सुरुवात होते, ती एका शास्त्रज्ञापासून. तो शास्त्रज्ञ जगाती एका नामवंत संस्थेत एका वेगळ्याच प्रयोगात गुंतलेला असतो. तो प्रयोग असतो, विश्वाच्या निर्मितीचं, खरंतर शून्यातून निर्माण होणाऱ्या पार्टिकल्सचं रहस्य शोधण्याचा. शोध पूर्ण होतो; पण त्याबरोबरच निर्माण होतो, प्रतिवस्तू! इथं प्रवेश करतो, रॉबर्ट लँग्डन, चिन्ह शास्त्राचा अभ्यासक. काही लक्षात येतंय? अशाच प्रकारची एक कादंबरी यापूर्वीही आली होती आणि तिचा नायकही रॉबर्ट लँग्डनच होता. त्या कादंबरीचं नाव आहे, ‘द दा विंची कोड!’ आणि दोन्हीचा लेखक तोच, डॅन ब्राऊन. याच मालिकेतली ही दुसरी कादंबरी आहे. तीच धावपळ, तीच विविध चिन्हं, धोकादायक भुयारं, दफनभूमी, एकाकी कॅथिड्रल्स आणि त्यांच्यामागे धावणारा रॉबर्ट, त्या संघटनेशी जोडलेली मोठमोठी नावं! (यात गॅलिलिओ आहे.) ‘द दा विंची कोड’ वाचलेल्यांना ही कादंबरी त्यापेक्षाही एक पाऊल पुढेच असल्याचं जाणवेल. ‘व्हॅटिकन’चा द्वेष करणाऱ्या, चर्चपासून सामान्यांना मुक्ती देऊ इच्छिणाऱ्या काही शास्त्रज्ञांची गुप्त संघटना. शेकडो वर्षं अंधारात असलेली, खरंतर फक्त कथांमध्ये राहिलेली ही संघटना आपलं अस्तित्व दाखवून देते. गुप्त संघटना, तिचं चिन्ह म्हटल्यावर रॉबर्ट त्यात आपसूकच ओढला जातो. या वेळी त्याच्या साथीला आहे व्हिट्टोरिया वेत्रा नावाची त्या खून झालेल्या शास्त्रज्ञाची मुलगी. मग त्या चिन्हांचा शोध. संघटनेने धमकी दिल्याप्रमाणे पडणारे कार्डिनलचे खून. या साऱ्यांचा साक्षीदार ‘मीडिया’ आणि शेवट. हा या पुस्तकाचा साधारण आराखडा; पण या चौकटीत जे काही घडतं, ते मात्र रॉबर्टबरोबरच आपल्यालाही धावायला लावतं. डॅन ब्राऊन हा फक्त एकात एक गुंतलेल्या घटना आपल्यासमोर वेगानं आणत नाही, तर त्यामागचा कार्यकारण भावही सांगतो. विविध चिन्हं, धर्म, दोन धर्मांची एकमेकांत असलेली गुंतवणूक, एका धर्माच्या अंतानंतर उदयाला येणाऱ्या दुसऱ्या धर्माचा प्रवास, जुन्या धर्माचे नव्या धर्मात येणारे प्रवाह, त्यामागची विचारप्रक्रिया अशा साऱ्या गोष्टी उलगडून दाखवतो. पुस्तकाच्या प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे यातील संदर्भ, जागा (अगदी भुयारंही!), संस्था खऱ्या आहेत. आपण त्या प्रत्यक्षात पाहू शकतो. त्यामुळे या पुस्तकालाही आपोआप संदर्भमूल्य येतं. कलावस्तूंकडे पाहण्याची आपलीही दृष्टी थोडी का होईना; पण बदलते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे कथानक खिश्चन धर्माशी निगडीत असलं, तरीदेखील त्यातील विचारप्रवाह, बदल हे आपण आपापल्या धर्मांमध्येही पाहू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याही धर्मांचा वेध घेऊ शकतो, हे विशेष. एकूणच कथानकात गुंतवून ठेवणारे, त्या बरोबर धावायला लावणारे आणि हे सारं सुरू असतानाच नवी माहिती, नवा विचार पुढे ठेवणारे, असे हे पुस्तक आहे. मूळ इंग्लिशमधल्या या पुस्तकाचा अनुवाद बाळ भागवत यांनी केला आहे आणि तोही तितकाच प्रवाही, पुस्तक मराठीतच लिहिले असावे, असं वाटण्याएवढा उत्तम झाला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसनं पुस्तकाचे तेवढेच लाड केले आहेत, हेही महत्त्वाचं. जाता जाता एकच- मुखपृष्ठ पाहिल्यानंतर, पुस्तकाचं शीर्षक वाचताना आपण घोटाळ्यात पडतो; पण पुस्तक वाचून झाल्यानंतर तेच शीर्षक अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. त्यामुळे ते साकारणाऱ्या फाल्गुन ग्राफिक्सचं विशेष अभिनंदन! -अभिजित थिटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more