* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANI VIKRAMADITYA HARLA!
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985214
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE TALES OF VIKRAMADITYA AND VETAL (THE SPECTRE) HAVE BEEN A PART OF GROWING UP FOR ALL OF US, AS CHILDREN. THE SPECTRE ASKS QUESTIONS. AND VIKRAMADITYA HAS TO ANSWER THEM. QUESTIONS REMAIN EVEN THOUGH THEIR NATURE HAS CHANGED TODAY. THE ANSWERS TOO HAVE CHANGED ACCORDINGLY. BUT TO HAVE ANSWERS DOES NOT MEAN THAT THERE ARE NO MORE QUESTIONS – THE SPECTRE CONTINUES TO ASK US THREATENING ONES. VIKRAMADITYA CONTINUES TO ANSWER THEM EVEN NOW. BUT WHILE DOING SO HE HAS STARTED FALTERING, AND LOSING HOPE. IN THE END HE IS ALSO FACING DEFEAT… QUESTIONS – THEY HAVE GONE BERSERK NOW AND REFUSE TO RELEASE ANY OF US FROM THEIR GRIP.
राजा विक्रमादित्य आणि वेताळ यांच्या गोष्टी अगदी लहानपणापासून आपल्याला सोबत करत आल्या आहेत. प्रश्न विचारणारा वेताळ आणि उत्तर देणारा विक्रमादित्य. आजही प्रश्न आहेत, काळानुसार प्रश्नांचं स्वरूपही बदललेलं आहे आणि त्यानुसार उत्तरंही. परंतु ही उत्तरं म्हणजे प्रश्नांची समाप्ती नव्हे — वेताळ आजही भेडसावणारे प्रश्न विचारत आहे. विक्रमादित्य आजही उत्तरं देतो आहे. पण उत्तरं देता देता विक्रमादित्य खचत जातो आहे. आणि शेवटी हरतो आहे... प्रश्न — आता प्रत्येकाच्या मानगुटीवर आरूढ होऊन नंगानाच करत आहेत....
* म.सा.प. पुरस्कार २०१४ . * पुणे मराठी ग्रंथालयातर्फे `राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार` २०१४.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarLokprabha May 2017

    विक्रमादित्य आणि वेताळाच्या कथा हा आपल्याकडचा प्रचलित आणि लोकप्रिय असा साचा. वैयक्तिक तसेच सामाजिक प्रश्न, प्रसंगांवर आधारित कथा आणि त्या अनुषंगाने वेताळाने विक्रमाला विचारलेला प्रश्न. हाच साचा घेऊन या कथा लिहिल्या आहेत. मात्र साचा तोच असला तरी त्याल आजच्या काळाचे परिणाम लाभले आहे. आजच्या काळातील सामाजिक आणि वैयक्तिक प्रश्नांवर त्यामधून चांगलाच प्रकाश पडला आहे. ...Read more

  • Rating StarDAILY SAMANA

    स्वाती चांदोरकर लिखित ‘आणि विक्रमादित्य हरला’ पुस्तकात राजा विक्रमादित्य व वेताळ या गोष्टीच्या माध्यमातून आज समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घातला आहे. आजच्या प्रश्नांना हात घातला आहे. आजच्या प्रश्नांचे स्वरूप अधिक विक्राळ व भयप्रद आहे. मानवजात ्या प्रश्नांना, समस्यांना सामोरी जाताना हतप्रभ होताना दिसते. ‘विक्रमादित्य व वेताळ’ यांच्या पुस्तकरूपातील गोष्टी (लोकांनी) सर्वांनीच बालपणी वाचल्या असतील वेताळाच्या प्रश्नांना उत्तरे देता देता विक्रमादित्याने हार मानली नव्हती. आज मात्र वेताळाच्या प्रश्नांना उत्तरे देता देता विक्रमादित्य अखेर हरतो. माणसाला भेडसावणारे प्रश्न तसेच अनुत्तरित आहेत. माणसाच्या वर्तनावर, निर्ढावलेपणावर, दुष्टपणावर, बदलत्या नीतिमूल्यांवर नेमकेपणाने निर्देश करणारे व त्याने हताशा अनुभवणारे हे प्रश्न आहेत. ‘फक्त नरकच’या पहिल्या कथेचा नायक एक सुशिक्षित सधन व्यक्ती. ड्रायव्हिंग करता करता मोबाईलवर बोलत असताना एका बाईकला धडक देतो. भीतीमुळे गाडी न थांबवता सुसाटपणे निघून जातो. पण त्याचे मन त्याला खात असते. दुर्दैवाने त्या बाईकवर त्याचाच मुलगा व त्याचा मित्र असतो. दोघेही मृत्यू पावतात. हे सत्य कळल्यावर त्याची व पत्नीची अवस्था दयनीय होते. वेताळाच्या प्रश्नाला उत्तर देताना विक्रमादित्य म्हणतो, आज स्वार्थी वृत्ती वाढली आहे. प्रत्येकजण फक्त स्वत:चा विचार करतो. ‘नजरेतील सौंदर्य’ या कथेत स्त्रीची हरप्रकारे विटंबना करण्याच्या वृत्तीवर, समाजाच्या अवमूल्यनावर प्रकाश टाकला आहे. माणसाच्या मनाचा ठाव अजूनही पूर्णपणे लागलेला नाही. त्याच्या मनातील विचार, विकार अनाकलनीय असतात. ‘शी इज अब्सोल्युटली नॉर्मल’ या कथेत हेच समोर येतं . आपल्यासारखीच दुसरी व्यक्तीही दु:खी आहे हे बघण्यात माणसाला कुठेतरी समाधान वाटत असते ‘सांत्वन’ या कथेत विवाहबाह्य संबंधावर भाष्य आहे. पत्नीला पतीचे हे संबंध माहीत असूनही ती त्याचा उच्चारही करत नाही. त्याच्या मृत्यूनंतर ‘तिला’ भेटायला जाते. ‘तिच्या’ समाजातील स्थानची जाणीव करून देते. पत्नी सांगते. ‘‘मलाही मदतीचा हात देणारे भेटले, पण माझा तोल व डौल डळमळला नाही. पण माझ्या लेखी माझा पती कधीच परिघाबाहेर गेला आहे.’’ ‘औटघटकेचं राज्य’ कथा आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या बालकांवर, मुलांवर होणाऱ्या अनिष्ट परिणामांकडे पालकांचं लक्ष वेधते. पालक आपल्या अपेक्षांचं अवास्तव ओझं मुलांवर लादतात. पैसा मोजून यश विकत घेतात हे सत्य समोर आल्यावर कोवळ्या मनावर आघात होतो. ‘जे घडणे असते ते तेथे मी घडते’ कथेत शोषक व शोषितांच्या कथा व व्यथा आहेत. आज मोबाईल, इंटरनेट, पेâसबुक वगैरे आधुनिक तंत्रज्ञानामुळे कित्येक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. त्यांची उपयुक्तता ही वादातीत आहे; पण त्यामुळे माणसामाणसातील सुसंवाद जिव्हाळा कमी होत चालला आहे ही त्याची दुसरी व दुखरी बाजू ‘एक अबोल हुंकार’ कथेत व्यक्त झाली आहे. आज माणसाची जीवनशैली बदलून गेली आहे. कोणतीही गोष्ट कष्टाने, मेहनतीने मिळवण्यापेक्षा सुलभतेने मिळवणे, त्यातील थ्रिल अनुभवणे महत्त्वाचे वाटते हे ‘थ्रिल’ कथेत येते. एक यशस्वी उद्योजक, प्रसिद्धी, पैसा, यश, सुविद्य, सुस्वरूप पत्नी अशा सर्व सुखांत मग्न असलेल्या ‘त्याला’ अनेक वर्षानंतर एक विदारक सत्य समोर येते. त्याच्या पत्नीचे त्याच्याच एका मित्रावर (एकेकाळी) असणारे प्रेम. हे समजल्यावर त्याचा भ्रमनिरास होतो व तो आतून मोडून पडतो. ‘काडी’सारखा. ‘मानवांची मानगूट’ ही एक दुर्दैवी प्रेमकहाणी. प्रेयसीवर उत्कट प्रेम करणाऱ्या प्रियकराचा भीषण अपघात होतो. त्याला कारण ठरले प्रेयसीचे मस्करीचे बोलणे. त्याबद्दल स्वत:ला माफ करू न शकलेली प्रेयसी आत्महत्येचा प्रयत्न करते, पण त्यातून ती वाचते. दुर्दैवाने प्रियकराचा अंत होतो आणि मग आयुष्यभर मनात जळत राहण्यावाचून पर्याय उरत नाही. वेताळाच्या या गोष्टीनंतर विक्रमादित्य म्हणतो, ‘‘मी हरलो आहे. तरुणांची मानसिकता मी ओळखू शकत नाही. मला या सत्यकथा ऐकवत नाहीत. माझी जिद्द संपली आहे.’’ माणसांचे आजचे समस्याग्रस्त जीवन, भयानक परिस्थिती, त्याची हताशता यावर प्रखर प्रकाश टाकते. आजच्या माणसापुढे उभ्या असलेल्या प्रश्नांच्या अक्राळविक्राळ प्रश्नांना उत्तरे नाहीत, असे लेखिकेला सुचवायचे असावे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more