* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANNA AND THE KING OF SIAM
  • Availability : Available
  • Translators : MANIK PHATAK
  • ISBN : 9788184984941
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ANNA LEONOWENS, A PROPER ENGLISHWOMAN, WAS AN UNLIKLEY CANDIDATE TO CHANGE THE COURSE OF SIAMESE (THAI) HISTORY. A YOUNG WIDOW AND MOTHER, HER SERVICES WERE ENGAGED IN THE 1860`S BY KING MONGKUT OF SIAM TO HELP HIM COMMUNICATE WITH FOREIGN GOVERNMENTS AND BE THE TUTOR TO HIS CHILDREN AND FAVORED CONCUBINES. STEPPING OFF THE STEAMER FROM LONDON, ANNA FOUND HERSELF IN AN EXOTIC LAND SHE COULD HAVE ONLY DREAMED OF LUSH LANDSCAPE OF MYSTIC FAITHS AND CURIOUS PEOPLE, AND KING`S PALACE BUSTLING WITH ROYAL PAGEANTRY, ANCIENT CUSTOM, AND HAREMS. ONE OF HER PUPILS, THE YOUNG PRINCE CHULALONGKORN, WAS PARTICULARLY INFLUENCED BY LEONOWENS AND HER WESTERN IDEALS. HE LEARNED ABOUT ABRAHAM LINCOLN AND THE TENETS OF DEMOCRACY FROM HER, AND YEARS LATER HE WOULD BECOME SIAM`S MOST PROGRESSIVE KING. HE GUIDED THE COUNTRY`S TRANSFORMATION FROM A FEUDAL STATE TO A MODERN SOCIETY, ABOLSHING SLAVERY AND MAKING MANY OTHER RADICAL REFORMS. WEAVING METICULOUSLY RESEARCHED FACTS WITH BEAUTIFULLY IMAGINED SCENES, MARGRET LANDON RECREATES AN UNFORGETTABLE PORTRAIT OF LIFE IN A FORGOTTEN EXTOTIC LAND. WRITTEN MORE THAN FIFTY YEARS AGO, AND TRANSLATED INTO DOZENS OF LANGUAGES, ANNA AND THE KING OF SIAM (THE INSPIRATION FOR THE MAGICAL PLAY AND FILM THE KING AND I)CONTINUES TO DELIGHT AND ENCHANT READERS AROUND THE WORLD.
अ‍ॅना ही पाश्चात्त्य संस्कृतीत वाढलेली, मानवतावादी मूल्ये जपणारी स्त्री; सयामसारख्या (आताचा थायलंड) बुरसटलेल्या, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा असलेल्या, रूढी-प्रथांना महत्त्व देणा-या गुलामांच्या देशात इंग्रजी शिकवायला जाते. सयाममध्ये अ‍ॅनाला जुळवून घेणे फार जड जाते, पण तरी व्यक्तिगत आयुष्यातली सुखदु:खे भोगत, ती तिच्या इतरांचे कष्ट दूर करण्याच्या मनोवृत्तीला, ऊर्मीला थांबवू शकत नाही. तिचे उदार अंत:करण आणि अन्यायाविरुद्ध उभे ठाकण्याची वृत्ती यांमुळे सयामचा राजा आणि राजपुत्र प्रभावित होतातच; पण तिच्या पश्चात सयामी जनताही तिची ऋणाईत राहते. तिच्या शिकवणुकीच्या प्रभावामुळेच राजपुत्र सयाममधील अयोग्य चालीरीतींना कायमची तिलांजली देतो आणि सयामला नवी दिशा दाखवतो. जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वीच्या कालखंडातली ही हकिकत म्हटली तर अद्भुत; म्हटली तर वास्तववादी अंधारात चाचपडणा-या एका समाजाची; मानवतेसाठी संघर्ष करणा-या एका स्त्रीची.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANNAANISIAMCHARAJA #ANNAANDTHEKINGOFSIAM #अ‍ॅनाआणिसयामचाराजा #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MANIKPHATAK #MARGARETLANDON "
Customer Reviews
  • Rating StarDAILY GOMANTAK, SHABDSOHALA 24-4-2014

    ही मार्गारेट लॅन्डन यांची कादंबरी १९४४ साली प्रसिद्ध झाली आणि अल्पावधीत जगभरात तिच्या लक्षावधी प्रती विकल्या गेल्या. वीसपेक्षा अधिक भाषांमध्ये तिची भाषांतरे झाली. या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘अॅना आणि सयामचा राजा’ या नावाने माणिक फाटक यांनी केला आहे व ेहता पब्लिशिंग हाऊसने तो प्रकाशित केला आहे. ही कादंबरी म्हणजे एका वेगळ्या काळातील आणि वेगळ्या जगाची अद्भुत सत्यकथा होय. १८६० साली अॅना लिऑनओवेन्स दरबारात गव्हर्नेस म्हणून गेली. राजाच्या अनेक राण्या आणि त्यांची सदुसष्ट मुले यांना शिकवणे, याशिवाय राजाचा इतर देशांशी चाललेला पत्रव्यवहार पाहणे, तसेच अनेक मोठ्या मेजवान्यांची तयारी करणे अशी अनेक कामे ती करत असे. अॅना पाश्चात्त्य संस्कृतीत वाढलेली, मानवतावादी मूल्ये जपणारी स्त्री. सयामसारख्या (आताचा थायलंड) बुरसटलेल्या, व्यक्तिास्वातंत्र्यावर गदा असलेल्या, रूढी-प्रथांना महत्त्व देणा-या गुलामांच्या देशात जुळवून घेणे तिला फार जड जाते. सुरुवातीची अनास्था, अनिश्चितता, नंतर कामाचे ओझे, अधूनमधून होणारे उद्रेक, महिनोनमहिने साचत जाणारी भीती आणि अनेक अगम्य विरोधकांशी सतत लढत राहणे फार थकवणारे होते. मात्र सुस्पष्ट विचार, तत्त्वनिष्ठ-निर्भय वागणं, उदार अंत:करण, शोषितांबद्दलची अपार करुणा, अन्यायाविरूद्ध उभे ठाकण्याची वृत्ती या गुणांच्या सहाय्यानं अॅनानं अनेकांच्या मनात आदाराचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं स्थान मिळवलं. राजा व राजपुत्रही या गुणांमुळे प्रभावित झाले. सयाममध्ये स्त्रीवरील अन्याय अत्याचाराचं फार भयानक स्वरूप अॅनाला दिसलं... ते विद्रूप वास्तव ‘ला ओर’च्या रूपानं समोर आलं, तेव्हा न राहवून तिनं या क्रूरपणाला तोंड देत ती गुलामांसाठी ‘गोरी देवता’ ठरली. मात्र या घटनेचे त्याचवेळी तिच्यासाठी शाही घराण्यात अनेक शत्रू निर्माण झाले. राजाच्या अनेक राण्या, रखेली, राजकन्या, राजपुत्र, त्या सर्वांच्या गुलाम स्त्रिया या सर्वांच्याच हकिगत अजब आहेत. राजाच्या लहरीने कोणावर कधी कोणता प्रसंग ओढवेल, कोणाला कधी अत्यंत अमानुष क्रोर्याला सामोरे जावे लागेल याचा काही अंदाजच बांधता येत नाही. गुलाम आणि आश्रितांनी दरबारात कायम गुडघे आणि कोपर टेवूâन, डोवंâ खाली घालून बसायचं, तसंच सरपटत मागे पुढे करायचं हे सगळं फार विचित्र वाटतं. जेमतेम १६ वर्षांची, कोमल सुंदर तपतीम ही रखेल, तिच्यावर ओढवलेला अनवस्था प्रसंग, आपल्या चुकांबद्दल तिनं केलेलं अत्यंत स्पष्ट, विचारपूर्ण, ठाम आणि प्रांजल निवेदन आणि आपण पाप मात्र केलेलं नाही हे सत्य निग्रहानं मांडण्याचं तिचं धैर्य अचंबित करतं. राजवाड्यातलं अनेक प्रकारचं आणि अनेक स्तरांवरचं राजकारण, स्वत:चं काम चोख करत असतानाही अॅनावर ओढवलेले दुर्धर प्रसंग, हे सर्व तिच्या सहनशीलतेचा अंत पाहणारंच! पण चुला लाँग कोर्ण आणि इतर विद्यार्थी यांच्यात नवविचार रुजविण्यात तिला आलेलं यश आणि तिची विद्यार्थीनी असलेली राणी सोन क्लीन हिला, तिच्या सर्व गुलाम स्त्रिया, पुरुष, मुलं यांना मुक्त करण्याची तिच्या शिकवणुकीतून मिळालेली प्रेरणा हे फार समाधान देणारं! तिथून निघून जाताना अॅनाला सर्वांच्या प्रेमाचं आणि आदरभावनेचं जे दर्शन घडलं ते अभूतपूर्वच होतं. त्याने ती हेलावून गेली आणि राजाने स्वत: तिच्याबद्दल भावना बोलून दाखवल्या, तेव्हा तिचे डोळे भरून आले. त्यांचे संबंध मालक-नोकर असे नव्हते, तर सर्व मतभेदांपलिकडे जाऊन एका मित्रत्वाचं नातं जुळलं होतं. पुढे राजपुत्र चुला लाँग कोर्ण, राजा म्हणून नियुक्त झाल्यावर राज्यात अनेक बदल केले. हळूहळू सयाममधील वेठबिगारी आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टींचे पूर्णपणे उच्चाटन केले. हे अॅनाच्या प्रयासांचे, कष्टाचे फळ होते. ही कादंबरी वाचणे हा निश्चितच एक विलक्षण अनुभव आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more