THE NOVEL `ANASAR`, BY THE RENOWNED GUJARATI WRITER VARSHA ADALJJA, IS AN ARTWORK THAT INSPIRES EVERY SENSITIVE PERSON AND WANTS TO CHECK THE VALUE OF LIFE.
`ANASAR` IS GOD`S HOUR!
EVERYBODY HAS A GOD BELL IN MIND. IN THE MIND, THERE IS A CONTINUATION OF OUR INCLINATIONS. WHEN THE SENSITIVE PERSON`S MIND COMES FIRST IN THE SOUND OF THE HOUR`S SOUND AND WHEN THE STRUGGLE CHALLENGES THE EXISTENCE, IT WILL TAKE A TOLL ON THAT HOUR AND THE PERSON`S `MAN` HAS TO FACE!
THE STRUGGLE OF A MAN WHO HAS EXPERIENCED SUCH A SICK MAN IS A STORY OF A SICK PERSON.
MAN`S MIND IS UNINTELLIGIBLE AND MYSTERIOUS, MAN`S APPEARANCE, AND BEING `VERY HEART` COMES VERY RARELY `UNITE`; AND WHEN IT COMES TOGETHER, A `AVATARA MAN` IS MANIFESTED - AND THAT IS `SAMBHAVAMY YUGA YUGA`.
BUT WITHOUT LOOKING AT THE PERSON`S `WAITING`, SUCH A PERSON IS THINKING LIKE `MAN` AND LIVING IS ONE OF THE MOST IMPORTANT THINGS.
THAT IS WHY MOTHER TERESA SAYS:
`THE MOST DREADED DISEASE IN THE WORLD IS NOT CANCER OR LEPROSY; BUT IN THE WORLD, THERE IS NO NEED FOR ME, I AM NOT INTERESTED IN ANYONE AND NO ONE CARES ABOUT ME, IT IS THE MOST FORMIDABLE DISORDER.
प्रसिद्ध गुजराती लेखिका वर्षा अडालजा यांची ‘अणसार’ ही कादंबरी म्हणजे प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला अंतर्मुख करणारी आणि जीवनमूल्यंच तपासून पाहण्यास उद्युक्त करणारी कलाकृती आहे.
‘अणसार’ म्हणजे देवाची घंटा!
प्रत्येकाच्या मनात एक देवाची घंटा असते. मनात सद्-असद् प्रवृत्तींचा संघर्ष चालू असतो. संवेदनशील व्यक्तीच्या मनात जेव्हा त्या देवाच्या घंटेच्या आवाजाची प्रथम चाहूल येते आणि तो संघर्ष अस्तित्वलाच आव्हान देतो, तेव्हा त्या घंटेला टोल ऐकू येतो आणि माणसाचं ‘माणूस’पणच पणाला लागतं!
‘माणूस’पण असंच पणाला लागलेल्या एका आजारी रूपाची ही संघर्ष कहाणी.
माणसाचं मन हे अमूर्त आणि अनाकलनीय असतं, माणसाचं ‘दिसणं’, आणि मनाचं ‘असणं’ हे फार फार क्वचित ‘एकत्र’ येतं; आणि एकत्र येतं, तेव्हा एक ‘अवतारी पुरुष’ प्रगट होत असतो - आणि तो तर ‘संभवामि युगे युगे’ असा असतो.
परंतु अशा अवतारी पुरुषाची ‘वाट’ न पाहता, माणसानं ‘माणसा’सारखं विचार करणं आणि जगणं ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
म्हणूनच मदर तेरेसा म्हणतात :
‘जगातला सर्वात भयानक रोग कॅन्सर किंवा कुष्ठरोग नाही; परंतु जगात कोणाला माझी गरज नाही, मी कोणाला आवडत नाही आणि कोणालाही माझी पर्वा नाही, अशी भावना मनात निर्माण होणं, ही सर्वात महाभयंकर व्याधी आहे.’