* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASTRONAUT SUNITA WILLIAMS
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9788177668674
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUNITA WILLIAMS STAYED IN THE SPACE FOR 6 MONTHS; SHE HAD ATTRACTED ATTENTION OF MANY DURING THIS STAY OF 6 MONTHS. SHE HAS A WORLD RECORD OF SPACEWALK OF 29 HOURS AND 17 MINUTES; SHE IS FIRST FEMALE ASTRONAUT TO HAVE SUCH RECORD. THIS IS THE STORY OF AN EXCEPTIONAL WOMAN. POSITIVE THINKING, DEVOTION, DEDICATION, AND COMPETITIVE THINKING ALL THESE TURNED THE SMALL GIRL INTO AN ASTRONAUT WHO ACTUALLY WANTED TO BE A VETERINARY DOCTOR. SHE WAS BROUGHT UP VERY CAREFULLY IN A LOVING FAMILY. HER FAMILY ALWAYS ENCOURAGED HER TO PURSUE HER SUCCESS, THEY WERE VERY PROUD OF HER SUCCESS. SUNITA LEFT NO STONE UNTURNED WHILE ACHIEVING IT. SHE STRUGGLED HARD FOR IT. HER FATHER, DR. DEEPAK PANDYA IS A WELL KNOWN NEUROANATOMIST; HE PRESERVES THE VALUES OF AMERICA AND CULTURE OF INDIA. HER MOTHER URSALENE BONNY PANDYA HAS EUROPEAN CULTURE. SUNITA HAS LOVED THE OCEANS, BEEN TO THE OCEAN FLOORS, FOUGHT A WAR, PURSUED THE CAMPAIGNS FOR HUMANITY, GONE BEYOND THE SKY INTO THE SPACE AND HAS NOW COME BACK TO REST ON THE EARTH. SHE HERSELF IS A LIVING LEGEND.
सुनीता विल्यम्स हिनं अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात, जगभरातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २९ तास १७ मिनिटांचा स्पेसवॉक करून तिनं महिलांच्या अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे. समर्पण, निष्ठा, स्पर्धात्मक विचारधारा, आणि सकारात्मक दृष्टीकोणामुळं, पशुवैद्य बनण्याची इच्छा असलेल्या मुलीचं रुपांतर झालं एका यशस्वी अंतराळवीरामध्ये! आणि आता ती झाली आहे एक आदर्श! सुनीता एका प्रेमळ कुटुंबात लहानाची मोठी झाली, सुनीताच्या यशाचा अभिमान बाळगणा-या कुटुंबानं तिच्यातला उपजत गुणांना वाव दिला, पाठिंबा दिला आणि सुनीतानं अपरिमित कष्ट करून उत्तमतेकडे वाटचाल केली. अमेरिकन भूमीची मुल्यं जपणा-या, आणि भारतीयत्वाच्या खुणा दाखवणा-या सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे एक नावाजलेले न्युरोअ‍ॅनाटामिस्ट, तर आई उर्सालिन बोनी पंड्या या युरोपियन वारसा जपणा-या! सुनीता सागरात रमली आहे, समुद्रतळाशी जाऊन आली आहे, लढाईवर गेली आहे, मानवतावादी मोहिमांसाठी गेली आहे, अवकाशात उसळी मारून पुन्हा पृथ्वीवर विसावली आहे - ती एक चालतीबोलती आख्यायिका आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#29 HOURS 17 MINUTES #SPACEWALK #DR.DEEPAKPANDYA #URSLEEN BONI #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #SUNITA WILLUMS #ANTARALVEER #ASTRONAUTS #CHITRAWALIMBE #CAPT S.SESHADRI # AR#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #ARADHIKA SHARMA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2007

    सुनीताचे पंख मुलींना... अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या कर्तबगारीने भारतीय मुलींना भारावून टाकले आहे. त्यामुळेच त्यांना कॅ. एस. शेषाद्री व आराधिका शर्मा यांनी लिहिलेली सुनीताची अंतराळभरारीची कहाणी वाचायला आवडेल. खरे तर राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंताळवीर. अवकाशात भरारी घेऊन परतला तेव्हापासून भारतीयांना या क्षेत्राची ओढ वाटू लागली. कल्पना चावला हिचा अंतराळयानाबरोबर दुर्दैवी मृत्यू भारतीयांना दु:खी करून गेला. त्या पार्श्वभूमीवर सुनीताचे यश भारतीयांसाठी आनंदउधाण आणणारे ठरले. कल्पना जशी पूर्णत: भारतीयच होती, तशी सुनीता नाही. सुनीता जन्माने अमेरिकनच. पण संस्काराने भारतीय मन घेऊन वावरणारी. म्हणूनच तिने अंतराळात जाताना गणेशमूर्ती, भगवद्गीता सोबत ठेवली होती. बर्गरपेक्षा सामोसा तिला आवडतो. या तिच्या भारतीय मनामुळे तिने भारतीयांमध्ये विशेष भावनिक जवळीक निर्माण केली. तिची कथा आपल्याही मुलींनी वाचावी असे जागरूक माता-पित्यांना नक्की वाटेल. -धरित्री जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 05-08-2007

    तुमच्या घरातल्या सुनीतासाठी… राकेश शर्मा पहिला भारतीय अंतराळवीर, अंतराळातून ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगितल्यावर भारतीयांना अंतराळ स्वप्नं पडायला लागली. ही स्वप्नं पाहणाऱ्या पिढीची प्रतिनिधी ्हणजे कल्पना चावला. तिचा अंतराळ प्रवासातच दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी तिनं स्वप्नं प्रत्यक्षात येऊ शकतात असा विश्वास दिला. या विश्वासाला वास्तवाचं कोंदण दिलं सुनीता विल्यम्सनं. खरंतर सुनीता ही कल्पनासारखी जन्माने भारतीय नाही. पण सुनीताला टिपिकल भारतीय समोसा आवडतो. भगवतगीता आणि गणपतीची मूर्ती घेऊन ती अंतराळात गेली होती या सगळ्या तिच्या गोष्टी भारतीयांना विशेषत: शहरी, मध्यमवर्गीयांना खास जोडून घेणाऱ्या ठरल्या. जागतिकीकरणाचा प्रवाह अनुकूल ठरलेल्या या वर्गाला आताच्या काळात आपल्या मुलीनं लग्न करून निव्वळ सुखाचा संसार करावा असं वाटत नाही. स्वप्न पाहणाऱ्या भरारी घेऊ इच्छिणाऱ्या मुलीच्या पंखांना बळ देण्याची मानसिकता या वर्गात आता यायला लागली आहे. आजच्या तमाम जागरूक पित्यांना आपल्या मुलीनं सुनीता विल्यम्स व्हावं, सानिया मिर्झा व्हावं असं वाटत असतं. आपल्या मुलीही असं काही बनू शकतात हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हायला या उदाहरणामुळेच मदत झाली आहे. कॅप्टन एस, शेषाद्री आणि अराधिक शर्मा यांनी लिहिलेलं आणि चित्रा वाळिंबे यांनी अनुवाद केलेलं मेहता प्रकाशनाचं अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे पुस्तक आपल्या घरात कर्तबगारीची बाळपावलं टाकणाऱ्या चिमुकलीसाठी वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    प्रकाशक एखाद्या ताज्या घटनेवर किती झटपट पुस्तकं काढतात याचे उदाहरण म्हणजे सुनीता विल्यमचे चरित्र, अवघ्या तीन आठवड्यात ते प्रसिद्ध झाले. अंतराळात १९४ दिवंस १८ तास १५ मिनिटे राहून विक्रम करणारी सुनीता विल्यम्स ही २२ जून २००७ रोजी पहाटे १ वाजून ११ मििटांनी कॅलिफोर्नियातील एडवर्डस एअर बेसवर सुखरुप उतरली; तेव्हा जगभराच्या लक्षावधी चाहत्यांना हायसे वाटले असणार! या आधी पेâब्रुवारी २००३ मध्ये कल्पना चावला अंतराळात राहून पृथ्वीजवळ पोहोचली; पण कोलंबिया अवकाश यान पेटून तिचा इतर सहा अंतराळवीरांसह अंत झाला होता. त्यामुळे सुनीताच्या बाबतीत तसे काही घडू नये अशी सर्वांच्याच मनात धाकधूक होती. तिचे अटलांटिस अवकाश यान फ्लोरिडामध्ये उतरणार होते; तेथे त्यावेळी ८००० पुâटांवर ढगांची दाटी असल्याने उतरविणे शक्य नव्हते; तेव्हा चोवीस तासांनी ते कॅलिफोर्नियात उतरविण्यात आले आणि १३ जुलैला सुनीताचे चरित्र मराठीतही आले. प्रकाशकांच्या तत्परतेची ही एक अभिनंदनीय झलकच होय! या विक्रमी अंतराळकन्येबद्दल भारतीयांना आत्मीयता वाटणे स्वाभाविकच आहे. कारण तिचा जन्म अमेरिकेत झाला असला आणि ती सध्या अमेरिकन नागरिक असली तरी तिचे वडील डॉ.दीपक पंड्या हे भारतीयच आहेत गुजरातमधील अहमदाबादजवळचे मंगरोळ हे त्यांचे गाव. डॉ. दीपक पंड्या यांनी १९५८ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले. तेथून ते अमेरिकेतील आहायो येथील युक्लीड हॉस्पिटलमध्ये उमेदवारी करुन अमेरिकेतच स्थायिक झाले. डॉ. दीपक पंड्या यांचे बोनी उर्सालिन त्यालोकार या स्लोव्हेनिअन मुलीवर प्रेम बसले. त्यांचा विवाह झाला मिळवून ‘नेव्हल एव्हिएटर’ म्हणून ती काम करु लागली (१९८९). त्याआधी नेव्हल अॅवॅâडमीमध्येच तिच्या बरोबर असणारा वर्गमित्र मायकेल विल्यम्स याच्याशी तिचे लग्न झाले. हेलिकॉप्टर पायलट म्हणून तिने काम सुरू केले. एअरक्राफ्ट हँडलर, असिस्टंट एअर बॉस ही पदेही तिने भूषविली, परंतु अंतराळवीर बनण्याचे तिचे स्वप्न होते. १९९८ मध्ये २३०० फ्लाइट तासाच्या उड्डाणांचा अनुभव गाठीला बांधून ती अंतराळवीर म्हणून ‘नासा’मध्ये पोहोचली.... अवकाश प्रकलपासाठी तिची निवड झाली. ९ डिसेंबर २००६ रोजी स्पेसशटलने तिने उड्डाण केले; डिसेंबर २००६ रोजी अवकाश स्थानकांत ती पाहोचली. सहा महिन्यांवर तेथे ती राहिली, सुखरुप परत आली . सुनीता विल्यम्स हे पुस्तक तसे छोटे आहे. ११ ऐंशी पृष्ठांचा मजवूâर. ३२ पृष्ठे छायाचित्रे पत्रकारितेच्या अंगाने त्याचे लेखन झाले आहे. त्यात सुनीताचे वडील दीपक पंड्या सुनीताचा भाऊ जय (बोनी) पंड्या, पती, सासू, वृत्तपत्रातील बातम्या, इंटरनेट वगैरेंच्या मदतीने बरेच तपशील दिले गेले आहेत. कॅप्टन एस. शेषाद्री आणि अराधिका शर्मा यांनी मूळ इंग्रजी पुस्तक ‘रुपा प्रकाशन’ साठी तयार केले. चित्रा वाळिंबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. सुनीता विल्यम्स ही आजच्या तरुणतरुणींना महत्त्वाकांक्षेचे क्षितिज विस्तारण्याचा संदेश देते. ‘साहसी बना, उत्तम आरोग्य ठेवा. सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात करा. पुढे जात रहा.’ अंतराळ स्थानकावर राहताना तिला काय जाणवले? ‘पृथ्वी विशाल आहे. सुंदर आहे. तिला सीमा नाहीत. कुंपणं नाहीत. एखाद्या विशिष्ट भूप्रदेशासाठी लोक का भांडतात, लढाया करतात हेच अनाकलनीय वाटते. त्यामुळेच हे पुस्तक प्रेरणादायक आणि प्रबोधनपर वाटेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more