* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983234
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS VERY TRUE THAT IF YOU ARE INTERESTED IN ASTRONOMY THEN THE STUDY OF MATHS AND PHYSICS IS ESSENTIAL. SOME MAY FIND THESE SUBJECTS VERY INTRICATE AND COMPLICATE YET THERE IS NO OTHER ALTERNATIVE TO THIS. STILL, THERE ARE PEOPLE WHO ARE INTERESTED IN THE SPACE JUST FOR THE SAKE OF INTEREST. FOR PEOPLE WITH SUCH OPEN MINDS, THIS BOOK IS A BLESSING. AS WE TURN PAGES AND MOVE FORWARDS ON THE PATH OF LINES BASED ON THE CELESTIAL BODIES, WE COME TO KNOW MORE AND MORE ABOUT THEM. IN HER FLOWING STYLE, THE AUTHOR INTRODUCES US TO ALL THE MEMBERS OF THE PLANETARY SYSTEM. THE BOOK DOES NOT END HERE. THERE ARE MANY PLANETS OUTSIDE OUR PLANETARY SYSTEM. THE WAY TO LEARN MORE ABOUT THEM IS DIFFERENT. THE AUTHOR TAKES US THERE REVEALING THE FACTS ABOUT THEM. SHE MAKES HER INFORMATION INTERESTING BY SHADING IN VIBRANT COLOURS. THE ARTICLES INCLUDED IN THIS BOOK ARE BASED ON VARIETY OF TOPICS SUCH AS VARIOUS TYPES OF BINOCULARS, THE UNIVERSE THAT OPENS BEFORE US THROUGH THESE BINOCULARS, THE MIRACLES LIKE GRAVITATIONAL LENSES ETC. SHE HAS EVEN USED THIS OPPORTUNITY TO PRESENT THE STEADY STATE OF UNIVERSE AND THE BING BANG CONCEPT WHICH HAVE NOT YET BEEN UNDERSTOOD FULLY BY THE GREAT MANY SCIENTISTS.
खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा झाल्यास किचकट गणित व भौतिकशास्त्र अशा गंभीर विषयांना तोंड द्यावे लागते. मात्र खगोलशास्त्रातील गणित व भौतिकशास्त्र वगळून जर त्यातील फक्त मनोरंजक माहिती मिळवायची इच्छा असेल, तर त्याने प्रस्तुत पुस्तक जरूर वाचावे. हलक्या पुÂलक्या भाषेत खगोलशास्त्राशी तोंडओळख करून देता देता लेखिका आपल्या सूर्यमालेतील सभासदांविषयी माहिती देते. तसेच सूर्यमालेबाहेरील विविध परग्रह, ते शोधण्याच्या पद्धती, तारे व ताNयांचे रंग यासंबंधी माहिती देते. विविध प्रकारच्या दुर्बिणी, त्यातून होणारे ब्रह्मांडाचे दर्शन, गुरुत्वीय भिंगांसारखे चमत्कार, तर विश्वनिर्मितीसंबंधी अजूनही समाधानकारक विवेचन न मिळाल्याने शास्त्रज्ञांनी मांडलेले ‘बिग बँग’, ‘स्टेडी स्टेट युनिव्हर्स’ इ. सिद्धान्त विविध लेखांद्वारे लेखिकेने मांडले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANTARIKSHACHYAANTRANAGAT #ANTARIKSHACHYAANTRANAGAT #अंतरिक्षाच्याअंतरंगात #SCIENCE #MARATHI #LEENADAMALE #लीनादामले "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more